Dharashiv News धाराशिव : शिवसेनेतील (Shivsena) गद्दारांचा एक गट भाजप (BJP) आमदाराच्या खिशात असल्याचं वक्तव्य शिंदेंचे आमदार आणि माजी मंत्री तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांनीकेलंय. धाराशिवमध्ये (Dharashiv News) आयोजित विजय संकल्प मेळाव्यात तेबोलतहोते. मात्रत्यांच्याया वक्तव्यानेनव्याचर्चेलातोंडफुटलंआहे. यावेळी भाजप आमदार राणाजगजीतसिंह पाटील (Ranajagjitsinha Patil) यांच्या विरोधातही तानाजी सावंत आक्रमक झाल्याचे पाहायला मिळालंय. तर दुसरीकडे शिवसेनेतील (Shivsena) एक गट भाजपसोबत युती करण्यासाठी अनुकूल असल्याची चिन्ह आहेत. त्यामुळे जिल्हा परिषद निवडणुकीच्या तोंडावर धाराशिवमध्ये शिवसेनेत अंतर्गत गटबाजी उफाळण्याची दाटशक्यताराजकीयवर्तुळातूनवर्तवलीजात आहे.

Continues below advertisement

नगरपरिषद निवडणुकीनंतर जिल्हा परिषदेतही असंच चित्र पाहायला मिळत आहे. कळंब नगर परिषदेत भाजप शिवसेना युती झाली. मात्र भूम, परंडा नगरपरिषदेमध्ये भापकडून सर्वपक्षीयांसोबत मिळून तानाजी सावंत यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न झाला होता. त्यामुळेयाअंतर्गतकलहाचेआणिराजकीय समीकरणांचेआगामीकाळातनेमकेकायपरिणामहोतातहेपाहणंमहत्वाचेठरणारआहे.

Dharashiv Operation Lotus: धाराशिव जिल्ह्यात ठाकरेसेनेला मोठा धक्का, शेकडो पदाधिकारी भाजपच्या गळाला

Continues below advertisement

नुकत्याच पार पडलेल्या नगरपरिषद निवडणुकीत भाजपला (BJP) घवघवीत यश मिळालंय. मात्र त्यानंतरही भाजपकडून आगामी जिल्हा परिषद निवडणुकीसाठी ऑपरेशन कमळ (Operation Lotus) सुरूच आहे. भाजपच्या ऑपरेशन कमळचा सर्वाधिक फटका शिवसेना ठाकरे गटाला (Uddhav Thackeray) बसतोय. खासदार ओमराजे निंबाळकर (Omprakash Rajenimbalkar) यांना झटका देत आमदार राणाजगजीतसिंह पाटील (Ranajagjitsinha Patil) यांनी शिवसेनेतील अनेक नेत्यांना भाजपात प्रवेश दिलाय. नगरपरिषद निवडणुकीच्या निकालानंतर जवळपास आठ ते दहा पक्षप्रवेश ठाकरे गटातून भाजपमध्ये झाले आहे.निवडणुकीतील यशानंतरही भाजपकडून ऑपरेशन कमळ सुरूच, ठाकरे सेनेचे पदाधिकारी भाजपच्या गळाला

दरम्यान, भाजपच्या ऑपरेशन कमळचा सर्वाधिक फटका हा ठाकरेंच्या शिवसेनेला बसतोय. खासदार ओमराजे निंबाळकर यांना आमदार राणाजगजितसिंह पाटील पिता पुत्राकडून निवडणुकीच्या तोंडावर हा झटका देण्यात आला असून जिल्ह्यातील अनेक गावातील प्रमुख कार्यकर्ते भाजपात पक्ष प्रवेश करत आहे. यात सांजा, कनगरा, रामवाडी, गावसुद, बेंबळी, धारूर , तामलवाडी अशा विविध गावातील ठाकरे सेनेचे पदाधिकारी भाजपच्या गळाला लागले आहे.

संबंधित बातमी: