Supriya Sule on Devendra Fadnavis : भारतीय जनता पक्षाने ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले ते सगळे भाजपमध्ये आहेत. 70 हजार कोटींच्या भ्रष्टाचाराचे आरोप ज्यांच्यावर आहेत, त्यांना देवेंद्र फडणवीस यांनी सही करून कशी दाखवली? असा थेट सवाल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी (Supriya Sule on Devendra Fadnavis) केला. सुप्रिया सुळे आज (4 नोव्हेंबर) कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. यावेळी पत्रकार परिषद बोलताना सुप्रिया सुळे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर घणाघाती हल्लाबोल केला.


फाईल विरोधकांना कशी काय दाखवली जाते?


सुप्रिया सुळे म्हणाल्या की, फडणवीस यांनी राज्यातील सगळ्या जनतेला फसवलं आहे, त्यांनी महाराष्ट्राची माफी मागितली पाहिजे. याचे उत्तर त्यांना द्यावे लागेल असे त्यांनी सांगितलं. ज्यांच्यावर आरोप आहेत त्यांच्या संदर्भातील फाईल विरोधकांना कशी काय दाखवली जाते? अशी विचारणा सुद्धा त्यांनी केली. त्या पुढे म्हणाल्या की, दिल्लीच्या अदृश्य शक्तीला आपण कशाला घाबरायचं, लढायचे की घाबरायचं हे बघा असं त्या म्हणाल्या. भारतीय जनता पक्षाने रोज नवाब मलिक यांच्यावर टीका केली होती. देवेंद्र फडणीस यांनी तर त्यांच्या विरोधात पत्र काढलं होतं. आम्ही त्यांच्याकडे लढावू नेते म्हणून बघत होतो, अशी टीका सुद्धा सुप्रिया सुळे यांनी केली.


बारामतीची जनता ठरवेल कोणाला मत द्यायचं आहे


अजितदादा यांनी बारामतीमध्ये केलेल्या आवाहनावर बोलताना सुद्धा सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली. निवडणुकीत सगळ्यांनाच मत मागण्याचा अधिकार आहे. तसेच दादा त्यांच्यासाठी मते मागत असतील. मात्र, बारामतीची जनता ठरवेल कोणाला मत द्यायचं आहे, असेही सुप्रिया सुळे म्हणाल्या. राज्याचा मुख्यमंत्री महिला होऊ दे किंवा पुरुष होऊ दे पण राज्याला पुढे घेऊन जाणारा मुख्यमंत्री असला पाहिजे अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. महिला आरक्षणावर बोलताना त्या म्हणाल्या की, या अधिवेशनात विधेयक येईल, असं वाटलं होतं. मात्र, तसं झालं नाही. येणाऱ्या अधिवेशनात बिल पास होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. 


जयश्री थोरात यांच्याबद्दल कोणी माफी मागितली का? 


शायना एनसी यांच्यावर केलेल्या वक्तव्यावरून अरविंद सावंत यांनी तातडीने मागितली मागितल्याच त्यांनी सांगितले. मात्र, सत्तेतील लोक महिला महिलांचा वारंवार अपमान करत असताना कोणी माफी मागत नसल्याची टीका त्यांनी केली. जयश्री थोरात यांच्याबद्दल कोणी माफी मागितली का? अशी विचारणा सुद्धा त्यांनी केली. हे सगळे घडत असताना मुख्यमंत्री काहीच बोलत नाहीत, अशा पद्धतीची निवडणूक मी पहिल्यांदाच बघत आहे. अदृश्य शक्तीमुळे राज्यात पक्षांची संख्या वाढल्याची टीका सुद्धा सुप्रिया सुळे यांनी केली. 


इतर महत्वाच्या बातम्या