नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election 2024) रणधुमाळीला सुरुवात झाली आहे. विरोधकांकडून ईव्हीएम (EVM) मतदान प्रक्रिया आणि केंद्र सरकारवर आरोप करत विरोध केला जात आहे. विरोधी पक्षांनी ईव्हीएम (EVM) आणि व्हीव्हीपॅट (VVPAT) पडताळणीची मागणी केली जात होती. यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात याचिकाही दाखल केली होती. यानंतर आता सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला (Election Commission) नोटीस बजावली आहे. ईव्हीएम मशीनसोबत व्हीव्हीपॅट पावत्यांची पडताळणी करण्याबाबत सूप्रीम कोर्टाने निवडणूक आयोगाला नोटीस पाठवली आहे.


EVM आणि VVPAT च्या सर्व पावत्यांची पडताळणीसाठी याचिका


सामाजिक कार्यकर्ते अरुण गवळी यांनी ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट पडताळणी करण्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर सोमवारी सुनावणी पार पडली. याचिकेची दखल घेत सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला नोटीस बजावली आहे. सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोग आणि केंद्र सरकारला ईव्हीएम मशीनमधील मते आणि व्हीव्हीपॅट मशीनमधील सर्व पावत्या पडताळणी संदर्भात नोटीस बजावली आहे. आता केंद्र सरकार आणि निवडणूक आयोगाला या नोटीसीवर उत्तर द्यावं लागणार आहे. ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट पडताळणी शक्य आहे का, हे केंद्र सरकार आणि निवडणूक आयोगाकडून अपेक्षित आहे.


सर्वोच्च न्यायालयाकडून निवडणूक आयोगासह केंद्र सरकारला नोटीस


ईव्हीएमला विरोध होत असतानाही केंद्र सरकार आणि निवडणूक आयोग ईव्हीएमद्वारे मतदान घेण्यावर ठाम आहे. दरम्यान, ईव्हीएम आणि सर्व व्हीव्हीपॅट स्लीपची पडताळणी करण्याची मागणी याचिकाकर्त्यांनी केली होती. सर्वोच्च न्यायालयात दाखल याचिकेत निवडणूक आयोगाच्या निर्देशाला आव्हान देण्यात आलं आहे. निवडणूक आयोगाच्या निर्देशाला आव्हान देत सर्व ईव्हीएमला व्हीव्हीपॅट जोडून त्यातील मतांची पडताळणीची मागणी करण्यात आली आहे. विरोधकांकडूनही वारंवार ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट पडताळणीची मागणी करण्यात आली आहे. 


व्हीव्हीपॅट काय आहे?


व्हीव्हीपॅट एक स्वतंत्र मत पडताळणी यंत्र आहे. व्हीव्हीपॅट मशील ईव्हीएमला जोडल्यानंतर मतदाराला मतदानाची पावती मिळते. यामुळे आपले मत आपण योग्य उमेदवाराला दिलं आहे का, हे तपासता येतं. 


सध्या निवडणूक आयोगाकडून सर्व ईव्हीएमला व्हीव्हीपॅट मशीन जोडण्यात येत नाही. कोणत्याही पाच ईव्हीएमला रँडम पद्धतीने व्हीव्हीपॅट मशीन जोडून पडताळणी केली जाते. पण, याचिकाकर्त्यांनी सर्व ईव्हीएमला व्हीव्हीपॅट जोडून मतांची पडताळणी करण्याची मागणी केली आहे.


महत्त्वाच्या इतर बातम्या :


मोठी बातमी : तिकीट कापलेले भाजप खासदार थेट संजय राऊतांच्या भेटीला, ठाकरे गटात प्रवेश करुन मैदानात उतरणार?