अंतिम मतदार यादीत अधिकच्या मतदारांची नोंदणी; काँग्रेस उमेदवाराचा भाजप अन् निवडणूक प्रशासनावर गंभीर आरोप
दक्षिण नागपूर विधानसभा मतदारसंघात अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होण्याच्या काही दिवस आधी 28 हजार नावे मतदार यादीत जोडण्यात आल्याचा आरोप दक्षिण नागपूरमधील काँग्रेस उमेदवार गिरीश पांडव यांनी केला आहे.
South Nagpur Vidhan Sabha Election 2024 Result : दक्षिण नागपूर विधानसभा मतदारसंघात अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होण्याच्या काही दिवस आधी 28 हजार नावे मतदार यादीत जोडण्यात आले होते. आणि याच 28 हजार अधिकच्या मतदारांच्या जोरावर भाजपने निवडणूक जिंकल्याचा आरोप दक्षिण नागपूरमधील काँग्रेस उमेदवार गिरीश पांडव यांनी केला आहे.
भाजपनं अखेरच्या काही दिवसात मोठ्या प्रमाणावर नवे मतदार नोंदवण्याची युक्ती फक्त दक्षिण नागपुरातच वापरली नाही, तर राज्यभरातील सर्वच मतदारसंघात भाजपने अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होण्याच्या काही दिवसापूर्वी मोठ्या संख्येने मतदारांची नोंदणी केली. त्या कामी त्यांना प्रशासनाने ही साथ दिली, असा आरोपही पांडव यांनी केला आहे.
विशेष म्हणजे गिरीश पांडव यांनी दक्षिण नागपूर मधील पाच टक्के ईव्हीएमची फेर मतमोजणीसाठीचा अर्ज आधीच प्रशासनाकडे केला आहे. भाजप सारखंच काँग्रेस पक्षातील कार्यकर्त्यांनी ही अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होण्याच्यापूर्वी त्यामध्ये नवीन मतदार नोंदवण्यासाठी अर्ज केले होते. मात्र प्रशासनाने काँग्रेसचे मतदार नोंदणीचे अर्ज बाद ठरवले आणि भाजपच्या कार्यकर्त्यांनी दिलेल्या मतदारांची नावे यादीत मोठ्या प्रमाणावर जोडली, असा आरोपही पांडव यांनी केला आहे. दरम्यान, यासंदर्भात न्यायालयात दाद मागण्याचे संकेत ही पांडव यांनी दिले आहेत.
विदर्भातील पराभूत उमेदवारांचे निवडणूक आयोगाकडे चालेंज अर्ज
विदर्भातील पराभूत उमेदवारांपैकी आतापर्यंत पर्यंत तीन उमेदवारांचे आयोगाकडे चालेंज अर्ज दाखल करण्यात आले आहे. मात्र या प्रक्रियेत ईवीपॅड ची मत मोजणी होणार का या बद्दल शंका आहे? निवडणूक अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, उमेदवारांनी जे अर्ज केले त्यानुसार त्यांना ईव्हीएम मशीन व मेमरी चिप तपासून दिली जाईल. EVPAT ची मोजणी होणार नाही, असे सांगण्यात आले आहे.
विदर्भात काँग्रेस पक्षाचे नागपूर दक्षिणचे उमेदवार गिरीश पांडव, अमरावती विधानसभेचे सुनील देशमुख व राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे तुमसर विधानसभेचे चरण वाघमारे यांनी EVM तपासणी साठी अर्ज केले आहेत. मतदानाच्या दिवशी सायंकाळी 5 ते 11:30 दरम्यान वाढलेल्या मतदानाला घेऊन आक्षेपसह अर्ज केले आहेत. गिरीश पांडव यांनी VVPAT मध्ये नोंदविलेला डेटा, मेमरी व्हेरिफिकेशन जुळविण्यासाठी 3 लाख रुपये भरले आहे. मात्र VVPAT ची मोजणी होणार का? याबद्दल शंका आहे.
हे ही वाचा