एक्स्प्लोर

Someshwar Sugar Factory Election: ‘दादा असते तर तुम्ही अशी यादी दिली असती का?’; सोमेश्वर कारखान्याच्या निवडणुकीवरून जय पवारांचा पुरुषोत्तम जगतापांवर निशाणा

Someshwar Sugar Factory Election: सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जय पवार दौरा करत आहेत आणि शेतकऱ्यांशी संवाद साधत आहेत.

Someshwar Sugar Factory Election: श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या (Someshwar Sugar Factory Election) पंचवार्षिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलंच तापलं असून प्रचाराला मोठी गती मिळाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP) आणि शिवसेना (Shiv Sena) पुरस्कृत 'सोमेश्वर विकासपुरुष अजितदादा पवार पॅनेलच्या' उमेदवारांच्या प्रचारासाठी जय पवार (Jay Pawar) हे सोमवारी सोमेश्वर परिसरातील झंझावाती प्रचार दौऱ्यावर उतरले आहेत. या दौऱ्यादरम्यान पुरंदर तालुक्यातील जवळार्जुन येथे पोहोचल्यानंतर त्यांनी शेतकऱ्यांशी थेट संवाद साधत विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला.

Jay Pawar: ‘दादा असते तर तुम्ही अशी यादी दिली असती का?’

पुरंदर तालुक्यातील जवळार्जुन येथील सभेत बोलताना जय पवार म्हणाले की, आम्ही सर्वांनी एकत्र बसून माहितीचे एकच पॅनल तयार करायचं असं ठरवलं होतं. 28 तारखेला आम्ही सगळे एकत्र बसलो होतो आणि कारखान्यासंदर्भात चर्चा करत होतो. त्यावेळी चेअरमन आले आणि त्यांनी सांगितलं की, 16 लोक मला हेच पाहिजे आहेत आणि बाकीचे लोक नको आहेत. त्यावर वहिनी म्हणाल्या की, इतकी तुमची माणसं घेतल्यानंतर बाकीच्या उमेदवारांना कसं बसवायचं? दादा असते तर तुम्ही अशी यादी दिली असती का? दादांना मी बोलवलं तर साडेतीन ते चार तास वहिनींना वाट बघायला लावली. जर दादांनी ठरवलं असतं की,हे लोक पॅनलमध्ये पाहिजे आहेत तर तुम्ही त्यांना नको म्हणाला असता का? असा थेट सवाल उपस्थित करत त्यांनी पुरुषोत्तम जगताप यांच्यावर निशाणा साधला.  

Jay Pawar: पार्थ दादा आणि आम्ही जरा मोठे असतो तर...

आपल्या भाषणात पुढे बोलताना जय पवार म्हणाले की, आम्ही शिवतारे बापूंशी बोललो असता त्यांनी सांगितले की, आम्ही तुमच्यासोबत आहोत. शेतकऱ्यांसाठी आपण हा कारखाना चालवतो आणि अनेक वर्षे दादा सर्वांना एकत्रित घेऊन काम करायचे. मी पण दादांच्या मार्गदर्शनाखाली एक कारखाना चालवतो, जर दादांनी कारखान्याबाबत विचारलं तर मला योग्य उत्तर द्यावे लागायचे नाहीतर दादांचे फटके बसायचे. दादांचा फोटो बघून मन भरून येतं. पार्थ दादा आणि आम्ही जरा मोठे असतो तर बरं झालं असतं, आणखी आम्ही जोमाने काम करू शकलो असतो, अशा भावना देखील त्यांनी यावेळी व्यक्त केल्या.   

Someshwar Sugar Factory Election: 21 जागांसाठी 11 ऑक्टोबरला मतदान 

दरम्यान, श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या 2026 च्या पंचवार्षिक निवडणुकीत एकूण 21 जागांसाठी 11 ऑक्टोबर 2026 रोजी मतदान पार पडणार आहे. या निवडणुकीत तीन प्रमुख पॅनेल आमनेसामने आले आहेत. सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसोबत युती केली आहे. दुसऱ्या बाजूला, शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) पक्षाकडून युगेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली 'शेतकरी विकास पॅनेल' रिंगणात उतरले आहे. तर कारखान्याचे विद्यमान अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांनी बंडखोरी करत स्वतंत्र पॅनेल उभे केले असून त्यांना भाजपची साथ लाभली आहे. या तिहेरी लढतीमुळे सोमेश्वर कारखान्याची निवडणूक अत्यंत रंगतदार वळणावर आली आहे.

राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ

आणखी वाचा

Someshwar Sugar Factory Election: ‘अजितदादांचा फोटो वापरणारच’; निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या निर्णयाला पुरुषोत्तम जगतापांचे प्रत्युत्तर, म्हणाले...

मागील काही वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read More
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Gokul Chairman Election 2026 Rajesh Patil: जोपर्यंत अजितदादा मुख्यमंत्री होणार नाही, तोपर्यंत फेटा बांधणार नाही, भीष्मप्रतिज्ञा करणारे राजेश पाटील गोकुळच्या अध्यक्षपदाचे उमेदवार, धगधगती राजकीय कारकीर्द!
अजितदादा मुख्यमंत्री होणार नाही, तोपर्यंत फेटा बांधणार नाही, भीष्मप्रतिज्ञा करणारे राजेश पाटील गोकुळच्या अध्यक्षपदाचे उमेदवार, धगधगती राजकीय कारकीर्द!
Satara Bank News: अध्यक्षपदाचा तिढा वरिष्ठांना त्रास न देता स्थानिक पातळीवरच सोडवा; शंभूराज देसाईंचा जयकुमार गोरेंना टोला, सातारा जिल्हा बँक अध्यक्षपदाबाबत नेमकं काय म्हणाले?
अध्यक्षपदाचा तिढा वरिष्ठांना त्रास न देता स्थानिक पातळीवरच सोडवा; शंभूराज देसाईंचा जयकुमार गोरेंना टोला, सातारा जिल्हा बँक अध्यक्षपदाबाबत नेमकं काय म्हणाले?
Satej Patil on Gokul Chairman Election 2026: अखेर ज्याची भीती होती तेच झालं, महायुती सरकारकडून गोकुळवर 4 सरकारी संचालकांच्या नियुक्तीला मंजुरी, बंटी पाटलांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
अखेर ज्याची भीती होती तेच झालं, गोकुळवर 4 सरकारी संचालकांच्या नियुक्तीला मंजुरी, बंटी पाटलांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
Gokul Election 2026: गोकुळचे महायुतीचे संचालक पुन्हा सहलीवर; मुंबईमार्गे अलिबागला रवाना, गोकुळच्या अध्यक्ष निवडीचा पेच अद्यापही कायम, घडामोडींना वेग
गोकुळचे महायुतीचे संचालक पुन्हा सहलीवर; मुंबईमार्गे अलिबागला रवाना, गोकुळच्या अध्यक्ष निवडीचा पेच अद्यापही कायम, घडामोडींना वेग
Advertisement

व्हिडीओ

Satej Patil PC : धमक्या कुणाला देताय? मी सुद्धा पाटील, ३-३ मंत्र्यांना उत्तर UNCUT PC
Hasan Mushrif speech Gokul : ... ती बंटी पाटलांची शेवटची सभासमजा, 13 संचालकांना इशारा
Gokul Chairman Rajesh Patil: हसन मुश्रीफ भाषणाला उभे राहताच महायुतीचा उमेदवार जिंकला; गोकुळमध्ये काय घडलं?
Gokul Chairman Election 2026: गोकुळमध्ये शासननियुक्त 4 संचालक पोहोचले तेव्हा...काय घडलं?, VIDEO
Vivekanand Patil Gokul Morcha Speech : कोरमचं कौतुक सांगू नका, गोकुळ मोर्चातील धमाल भाषण
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai KEM Hospital: मुंबईला लाज आणणारी घटना, के.ई.एम. रुग्णालयातील लिफ्ट बंद; अपंग, प्लॅस्टर केलेल्या रुग्णांना सरपटत पायऱ्यांवरुन उतरण्याची वेळ
मुंबईला लाज आणणारी घटना, के.ई.एम. रुग्णालयातील लिफ्ट बंद; अपंग, प्लॅस्टर केलेल्या रुग्णांना सरपटत पायऱ्यांवरुन उतरण्याची वेळ
Supriya Sule :
"दादा, तुझ्याशिवायची ही पहिली भाऊबीज...", सुप्रिया सुळेंची अजितदादांच्या आठवणीत भावूक पोस्ट; जुना व्हिडीओ करत म्हणाल्या...
Laxman Hake : मराठा समर्थक अन् लक्ष्मण हाकेंच्या समर्थकांमध्ये तुंबळ हाणामारी; सोलापूरच्या आडेगावमधील बिरोबा यात्रेतील उपस्थितीवर आक्षेप, पोखरापूरमध्ये नेमकं काय घडलं?
मराठा समर्थक अन् लक्ष्मण हाकेंच्या समर्थकांमध्ये तुंबळ हाणामारी; सोलापूरच्या आडेगावमधील बिरोबा यात्रेतील उपस्थितीवर आक्षेप, पोखरापूरमध्ये नेमकं काय घडलं?
Video: पाडव्यादिनी सुनील तटकरे बारामतीत; सुनेत्रा पवारांसोबत 45 मिनिटे चर्चा, विलिनीकरणाच्या मुद्द्यावर स्पष्टच बोलले
Video: पाडव्यादिनी सुनील तटकरे बारामतीत; सुनेत्रा पवारांसोबत 45 मिनिटे चर्चा, विलिनीकरणाच्या मुद्द्यावर स्पष्टच बोलले
तुमचं पण दूध जातं का गोकुळात? पिट्याभाईची कमेंट, अध्यक्ष निवडीनंतर कलाकारांमध्येही गोकुळची चर्चा
तुमचं पण दूध जातं का गोकुळात? पिट्याभाईची कमेंट, अध्यक्ष निवडीनंतर कलाकारांमध्येही गोकुळची चर्चा
बारामतीत 10 हजार पणत्यांनी उजळला सनसेट पॉईंट; अजित दादांच्या आठवणीत बारामतीकर भावूक
बारामतीत 10 हजार पणत्यांनी उजळला सनसेट पॉईंट; अजित दादांच्या आठवणीत बारामतीकर भावूक
Ravindra Dhagekar and Chandrakant Patil: अहो चंद्रकांतदादा, सतेज पाटलांचे वडील स्कुटरवरुन फिरायचे, पण तुम्ही काय किर्लोस्करांचे नातू-बितू होतात का? रवींद्र धंगेकरांचा खोचक सवाल
अहो चंद्रकांतदादा, सतेज पाटलांचे वडील स्कुटरवरुन फिरायचे, पण तुम्ही काय किर्लोस्करांचे नातू-बितू होतात का? रवींद्र धंगेकरांचा खोचक सवाल
Maharashtra Live blog updates: टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणानंतर बॉलिवूड कलाकारांना मुंबई पोलिसांचा सुरक्षा अलर्ट
Maharashtra Live blog updates: टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणानंतर बॉलिवूड कलाकारांना मुंबई पोलिसांचा सुरक्षा अलर्ट
Embed widget