Solapur : सोलापूर जिल्हा परिषद निवडणूक निकाल: ZP च्या 68 आणि पंचायत समितीच्या 136 जागांवर कोणाची बाजी?
Solapur ZP Election Result : काही ठिकाणी भाजप विरोधात शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्र आले आहेत, तर काही ठिकाणी दोन्ही शिवसेना एकत्र आल्याचं चित्र सोलापुरात पाहायला मिळालं.

सोलापूर : राज्यातील जिल्हापरिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीचा (Election Results) निकाल आज जाहीर होत असून सोलापूर जिल्हा परिषदेकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे. सोलापूर जिल्हा परिषदेच्या एकूण 68 तर पंचायत समितीच्या 136 जागांसाठी ही निवडणूक होत आहे. येथील निवडणुकीत भाजपने सर्वाधिक उमेदवार उभे केले आहेत. तर, अजित पवारांची राष्ट्रवादी, शरद पवारांची राष्ट्रवादी, शिंदेची शिवसेना, काँग्रेस, ठाकरेंची शिवसेना अशी अनुक्रमे उमेदवारांची संख्या आहे. त्यामुळे, येथील निवडणुकीच्या निकालाची उत्सुकता जिल्ह्यातील 11 तालुक्यांना आहे.
सुरुवातीला हाती आलेल्या निकालात भाजपने आघाडी घेतली असून जिल्हा परिषदेच्या 68 पैकी 19 जागांवर भाजपचे उमेदवार विजयी झाले आहेत. तर, पंचायत समितीच्या 136 पैकी 40 जागांवर भाजप उमेदवार विजयी झाले आहेत. त्यानंतर, शिंदेंची शिवसेना दुसऱ्या क्रमांकावर आहे.
सोलापूर जिल्हा परिषद 2026
सोलापूर जिल्हा परिषद पक्षीय बलाबल ::- 68/68
भाजपा - 38
राष्ट्रवादी अजित पवार - 11
राष्ट्रवादी शरद पवार - 5
शिवसेना (शिंदे गट) - 8
शेकाप - 3
करमाळा स्थानिक आघाडी - 2
तीर्थक्षेत्र विकास आघाडी 1
सोलापूर पंचायत समिती पक्षीय बलाबल ::- 136/136
भाजपा - 76
राष्ट्रवादी अजित पवार - 19
राष्ट्रवादी शरद पवार - 11
शिवसेना (शिंदे गट) - 14
शेकाप - 9
करमाळा स्थानिक आघाडी - 4
तीर्थक्षेत्र आघाडी - 3
सोलापूर जिल्हा :
पंचायत समिती तालुका निहाय :
करमाळा -
- भाजप - 2
- राष्ट्रवादी - 2
- स्थानिक - 4
माढा -
- भाजप - 4
- राष्ट्रवादी - 5
बार्शी -
भाजप - 10
सोलापूर उ. -
भाजप - 5
राष्ट्रवादी - 1
मोहोळ -
राष्ट्रवादी - 4
भाजप - 7
पंढरपूर -
भाजप - 8
राष्ट्रवादी SP - 4
माळशिरस -
भाजप - 6
राष्ट्रवादी 3
सांगोला -
- शिवसेना - 2
- भाजप 1
- स्थानिक आघाडी - 4
मंगळवेढा -
भाजप - 4
स्थानिक आघाडी - 3
सोलापूर द. -
भाजप - 6
काँग्रेस - 1
अक्कलकोट -
भाजप - 8
शिवसेना - 2
सोलापूर जिल्हा परिषद जागा आणि उमेदवार
एकूण जागा - 68
एकूण उमेदवार - 271
कोणत्या पक्षाचे किती उमेदवार :-
भाजप- 59
शिवसेना - 24
राष्ट्रवादी - 26
ठाकरे गट - 8
काँग्रेस - 18
श गट - 21
वंचित - 11
स्थानिक गट - 15
पंचायत समितीची माहिती :-
जिल्ह्यातील एकूण पंचायत समित्या - 11
एकूण जागा - 136
एकूण उमेदवार - 485





















