Solapur Municipal Election 2026 : राज्यातनुकत्याचपार पडलेल्या महापालिका निवडणुकीमध्ये खासदार ओवैसींच्या (Asaduddin Owaisi) एमआयएमचा (AIMIM) मोठा करिश्मा पाहायला मिळाला. अनेक महाालिकांमध्ये एमआयएमने मुसंडी मारल्याचं चित्र पाहायला मिळालं. राज्यातील 29 पैकी 13 महापालिकांमध्ये एमआयएमने 125 जागा जिंकल्या आहेत. तर छत्रपती संभाजीनगरमध्ये सर्वाधिक म्हणजे 33 नगरसेवक विजयी झाले आहेत. 

सोलापूर, धुळे आणि नांदेडमध्ये एमआयएमचे प्रत्येकी 8, 10 आणि 15 असे एकूण 33 उमेदवार विजयी झाले आहेत. तर मुंबई महापालिकेमध्येही एमआयएमने मुसंडी मारत तब्बल 8 जागांवर विजय मिळवला आहे. मुस्लिमबहुल परिसरात समाजवादी पार्टीला मागे सारत अनेक ठिकाणी एमआयएमची सरशी झाल्याचं दिसून आलं. परिणामीआता सोलापूर महापालिका (Solapur Mahapalika) निवडणुकीतही मिळालेल्याघवघवीत यशानंतर एमआयएम पक्ष आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या रिंगणात देखील उतरणार आहे. सोबतच पंचायत समिती निवडणुका स्वबळावर लढवणार असल्याचानिर्धारहीत्यांनीकेलाय.

Solapur Election 2026 : कोणी नाराज असतील तर आमच्याशी संपर्क साधावा,आम्ही एबीफॉर्म देऊ

सोलापुरात जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीसाठी 20-25 जागा लढण्याची तयारी असल्याची माहिती एमआयएमचे जिल्हाध्यक्ष शौकत पठाण यांनी दिली. ग्रामीण भागातील पिण्याच्या पाण्यासह शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी एमआयएम पक्ष निवडणुकीला स्वबळावर सामोरे जाणार असल्याची माहिती एमआयएमचे शहर जिल्हाध्यक्ष शौकत पठाण यांनी दिली आहे. सोलापूर महानगरपालिकेत 8 नगरसेवक निवडून आल्यामुळे भाजपला एमआयएमच्या रूपाने विरोधक असणार आहे. या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्ह्यातील सांगोला, अक्कलकोट, करमाळा, मंगळवेढा, पंढरपूर, उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर यासह अन्य तालुक्यांमध्ये एमआयएम पक्ष आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुका स्वबळावर लढविणार आहे.

दरम्यान, इतर पक्षातील कोणी नाराज असतील तर त्यांनी 20 तारखेपर्यंत आमच्याशी संपर्क साधावा, आम्ही आमच्या एमआयएम पक्षाचा एबी फॉर्म त्यांना देऊ, अशी माहिती जिल्हाध्यक्ष शौकत पठाण यांनी दिली आहे.

इतर महत्वाच्या बातम्या