Solapur: प्रकाश आंबेडकरांचे (Prakash Ambedkar) सुपुत्र आणि वंचित बहुजन आघाडी (Vanchit Bahujan Aghadi) युवा नेते सुजात आंबेडकर (Sujat Ambedkar) यांनी काँग्रेस खासदार प्रणिती शिंदेबाबत (Praniti Shinde) केलेल्या आरोपवार काँग्रेसने (Congress) आता प्रतिउत्तर देत हल्लाबोल केला आहे. सुजात आंबेडकर हे विचारानी परिपक्व, त्यांनी भाजपप्रमाणे बुद्धीभेदाचे राजकारण करू नये. प्रणिती शिंदेना भाजपमध्ये जायचं असतं तर त्या आज केंद्रात मंत्री असत्या, प्रणिती शिंदेच्या रक्तात काँग्रेस आहे. असे प्रतिउत्तर काँग्रेसचे प्रवक्ते प्रा. अशोक निंबर्गी यांनी दिले आहे.

Continues below advertisement

Congress : RSS बुद्धीभेदाचे राजकारण करते, तीच भाषा सुजात आंबेडकरांची

दरम्यान, वंचित बहुजन आघाडीला काँग्रेसतर्फे (Congress) पुन्हा एकदा ऑफर देखील देण्यात आलीय. 'सुजात आंबेडकर हे आपल्या भाषणातून भीमशक्तीच्या विचारांचा जागर करतील आणि आंबेडकरी चळवळीत घुसलेल्या मनुवाद्याना हुसकावून लावतील असं वाटलं’ पण भाजपा आणि एसएस (RSS) वर्षानुवर्षे ज्या पद्धतीने बुद्धीभेदाचे राजकारण करते, तीच भाषा सुजात आंबेडकर यांनी केलीय, असेही प्रा. अशोक निंबर्गी म्हणाले.

Continues below advertisement

Solapur Congress on VBA: ....तर त्यांच्यासाठी भाजप नेत्यांनी रेड कार्पेट टाकलं होतं

सुजात आंबेडकर यांनी एकप्रकारे काँग्रेसला भाजपची बी टीम म्हटलं. पण बी टीम कोण हे त्यांच्या बोलण्यावरून कळतं. प्रणिती शिंदेंना भाजपमध्ये जाणार अश्या वावड्या लोकसभा निवडणुकीच्या आधीपासून उठवल्या जातात. जर प्रणिती शिंदेंना भाजपमध्ये जायचं असतं तर त्यांच्यासाठी भाजप नेत्यांनी रेड कार्पेट टाकलेलं होतं, अनेक नेत्यांनी त्यांना ऑफर दिल्या ण प्रणिती शिंदे यांनी ठणकावून सांगितलं माझ्या रक्तात काँग्रेस आहे. जर त्यांनी ऑफर स्वीकारली असती तर त्या आज भाजपच्या खासदार असत्या आणि केंद्रात मंत्री देखील असत्या, पण त्या विचारांनी काँग्रेसच्या आहेत. सुशीलकुमार शिंदेच्या कार्यक्रमात फडणवीस, अडाणी आले म्हटलं, उद्या तुमचं लग्न असेल तर तुम्ही फडणवीस आणि पवार साहेबांना बोलवणार नाही का? असा सवालही अशोक निंबर्गी  (Ashok Nimbargi) यांनी केलाय.

 Ashok Nimbargi : मुंबईत काँग्रेससोबत युती आणि इथे काँग्रेस विरोधात बोलणे, ही दुटप्पी भूमिका

लग्न हा खासगी कार्यक्रम आहे. राजकारणाच्या पलीकडे काही संबंध असतात, मैत्री असते सुजात आंबेडकर हे बाळासाहेब यांचे सुपुत्र आहे. विचारानी परिपक्व आहेत, किमान त्यांनी अशी विधान करू नये. सोलापुरात वंचित सोबत युती करण्याचा आमचा प्रयत्न होता, पण वंचितच्या पदाधिकाऱ्यांकडून रिस्पॉन्स आला नाही. वंचित आमच्या सोबत नाही, याचं दुःख आम्हाला आज ही वाटतं. पण अजून ही आम्ही त्यांना ऑफर देतोय, जिथे वंचितची ताकद आहे, तिथे महाविकास आघाडी त्यांना मदत करेल. मुंबईत काँग्रेससोबत युती आणि इथे काँग्रेस विरोधात बोलणे ही भूमिका दुटप्पी आहे. आम्ही वंचितला सोबत घेण्याचे प्रयत्न केले, पण समोरून प्रतिसाद नाही. सोलापुरातील वंचितची भूमिका काय हे सुजात आंबेडकर यांनी जाणून घ्यावं, असेही अशोक निंबर्गी म्हणाले.

इतर महत्वाच्या बातम्या