Sindhudurg ZP Election Result 2026: तळकोकणात राणे ब्रँडचीच हवा; कोकणी जनतेने ठाकरेंच्या शिवसेनेला नाकारलं, कोणत्या पक्षाला किती जागा?
Sindhudurg ZP Election Result 2026: संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या सिंधुदुर्ग जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत ‘राणे ब्रँड’चीच हवा असल्याचे दिसून आले आहे.

Sindhudurg ZP Election Result 2026: संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या सिंधुदुर्ग जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत तळकोकणात ‘राणे ब्रँड’ची हवा कायम असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. जिल्हा परिषद निवडणुकीत महायुतीने बहुमत गाठत सत्ता आपल्या हातात ठेवली, तर ठाकरे गटाची शिवसेना कोकणी जनतेने जवळपास फेटाळल्याचे चित्र निकालातून समोर आले आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 50 जिल्हा परिषद आणि 100 पंचायत समिती जागांसाठी झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत शनिवारी सरासरी 61.98 टक्के मतदान झाले. ग्रामीण भागात मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळाला, ज्यामुळे दुपारनंतर मतदानाचा टक्का लक्षणीय वाढला. जिल्ह्यातील 561,105 मतदारांपैकी 347,749 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यामध्ये 180,327 पुरुष आणि 167,422 महिला मतदारांचा समावेश आहे.
Sindhudurg ZP Election Result 2026: तालुकानिहाय मतदान
सावंतवाडी तालुक्यात सर्वाधिक 69.54 टक्के, तर वेंगुर्ला तालुक्यात 69.03 टक्के मतदान झाले. वैभववाडी तालुक्यात सर्वात कमी 54.79 टक्के मतदानाची नोंद झाली.
Sindhudurg ZP Election Result 2026: राणे ब्रँडचा प्रभाव, महायुतीला स्पष्ट बहुमत
सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेत महायुतीने स्पष्ट बहुमत गाठले असून, भाजप आणि शिंदे गटाच्या शिवसेनेने मिळून सत्तेवर आपली पकड मजबूत केली आहे. विशेषतः मंत्री नितेश राणे यांचे वैभववाडी आणि तळकोकणातील वर्चस्व या निकालातून अधोरेखित झाले आहे.
Sindhudurg ZP Election Result 2026: ठाकरे सेनेची पिछेहाट, अपक्षांची बाजी
या निवडणुकीत सर्वाधिक धक्का बसला तो शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाला. ठाकरे गटाच्या शिवसेनेपेक्षा अपक्ष उमेदवारांनी अधिक जागा जिंकत मतदारांचा कल बदलल्याचे स्पष्ट केले आहे. तळकोकणात एकेकाळी प्रभावी असलेली ठाकरे सेनेची जादू या निकालात ओसरल्याचे चित्र आहे.
Sindhudurg ZP Election Result 2026: सिंधुदुर्ग जिल्हा परिषद निकाल (आतापर्यंतचे चित्र)
एकूण जागा : 50
आतापर्यंत निकाल हाती आलेल्या जागा : 36
भाजप : 21
शिवसेना (शिंदे गट) : 08
शिवसेना (उबाठा) : 02
राष्ट्रवादी काँग्रेस : 00
काँग्रेस : 00
अपक्ष : 05
या आकडेवारीवरून महायुतीचा वरचष्मा स्पष्ट होत असून, विरोधकांची संख्या अत्यल्प राहिली आहे.
Vaibhavwadi Election Result 2026: वैभववाडी पंचायत समितीवर भाजपची एकहाती सत्ता
वैभववाडी पंचायत समितीवर भाजपने सर्व जागांवर विजय मिळवत एकहाती सत्ता स्थापन केली आहे. हा विजय मंत्री नितेश राणेंच्या नेतृत्वाला मिळालेला मोठा कौल मानला जात आहे.
भुईबावडा: देवानंद पालांडे
कोळपे: सुवर्णा संसारे
खांबाळे: मंगेश लोके
लोरे: सिद्धेश रावराणे
उंबर्डे: साची कोलते
कोकिसरे: साधना नकाशे (बिनविरोध)
Sindhudurg ZP Election Result 2026: महायुतीचा जल्लोष
निकाल जाहीर होताच संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात महायुतीच्या कार्यकर्त्यांनी ढोल-ताशा, डीजेच्या तालावर गुलाल उधळत जोरदार जल्लोष केला. ठिकठिकाणी फटाके, मिरवणुका आणि घोषणा देत विजय साजरा करण्यात आला.
Nitesh Rane: काय म्हणाले नितेश राणे?
पत्रकार परिषदेत नितेश राणे म्हणाले की, महायुतीला सिंधुदुर्ग जिल्ह्यात 46 ते 47 उमेदवार निवडून आणायचे प्रयत्न आहेत. अनेक ठिकाणी महायुतीचे उमेदवार पुढे आहेत. याआधी 50 पैकी 42 उमेदवार निवडून आले होते, आता देखील आता 46 जागा जिंकू. सत्तेच्या माध्यमातून ग्रामीण भागात विकास करू. आम्ही साडेचार लाख दरडोई उत्पन्न करण्याचा संकल्प हाती घेतला आहे. निवडून आलेले बंडखोर उमेदवार हे भाजपचेचे आहेत. मात्र अपक्ष उमेदवार निवडून आलेत, हे रवींद्र चव्हाण यांच्या नावाचा वापर करून आले. हे आम्हाला मान्य नाही. कमळ चिन्हाला विरोधात करत अपक्ष आले, याचा फटका महायुतीला बसला. अदृश्य हाताच्या नावाने जिल्ह्यात भाजपच्या उमेदवारांना पराभूत केलं. त्या अदृश्य हातांना बाजूला केलं जाईल, असा इशारा त्यांनी यावेळी दिला.
आणखी वाचा




















