रावसाहेब दानवेंविरोधात निवडणूक लढवा, अर्जुन खोतकरांच्या घरी शिवसैनिकांचे आंदोलन
एबीपी माझा वेब टीम | 12 Mar 2019 01:04 PM (IST)
भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या विरोधात राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी निवडणूक लढवावी या मागणीसाठी शेकडो शिवसैनिकांनी खोतकर यांच्या घरी ठिय्या आंदोलन सुरु केले आहे.
जालना : भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या विरोधात राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी निवडणूक लढवावी या मागणीसाठी शेकडो शिवसैनिकांनी खोतकर यांच्या घरी ठिय्या आंदोलन सुरु केले आहे. अर्जुन खोतकर यांनी जालना लोकसभेची निवडणूक लढवावी या मागणीसाठी शेकडो शिवसैनिक त्यांच्या घरासमोर जमले आहेत. दानवे आणि खोतकर वाद मिटवण्यासाठी अनेक बैठका झाल्या, तरी अद्याप जालन्यातून नेमकं कोण लढणार हा प्रश्न सुटला नसल्याचं दिसत आहे. काही दिवसांपूर्वी जालना येथे एका पुलाच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमावेळी दानवे आणि खोतकर एकाच व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी खोतकरांनी जालना लोकसभेची जागा मला सोडावी, मला तिथे निवडणूक लढू द्यावे, असे थेट आवाहन दानवेंसमोर केले होते. खोतकरांचं बंड शमवण्याचं दानवेंसमोर आव्हान | स्पेशल रिपोर्ट | जालना | एबीपी माझा