नाशिक : महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीसाठी 288 मतदारसंघांमध्ये मतदान पार पडलं. महाराष्ट्रात एकूण 62.87 टक्के मतदानाची नोंद झाली आहे. नाशिक जिल्ह्यातील नांदगाव मतदारसंघ राज्यभर चर्चेत राहिला आहे. शिवसेना आमदार आणि उमेदवार सुहास कांदे यांनी अपक्ष उमेदवार समीर भुजबळ यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याच्या आरोपावरुन नांदगाव विधानसभा मतदारसंघ राज्यभर चर्चेत आला होता. त्यानंतर पुन्हा एकदा नांदगाव मतदासंघ पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या शहरप्रमुखांना मारहाण झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. आमदार सुहास कांदे यांच्या समर्थकांनी मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात येत आहे. 


 मनमाड शहरात मारहाणीची घटना घडली आहे. मनमाड शिवसेना ( ठाकरे गट ) शहर प्रमुखाला मारहाण झाल्याचा प्रकार घडला आहे. आ. सुहास कांदे समर्थकांकडून मारहाण झाल्याचा आरोप करण्यात आला असून मनमाड पोलीस स्थानकात रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.


नांदगाव मतदार संघातील मनमाड शहरात सायंकाळी उशिरा एक मारहाणीची घटना घडली. मतदानाची वेळ संपल्यानंतर सेंट झेवियर हायस्कूल येथे गेट बंद करण्याच्या प्रकरणावरून शिवसेना उबाठा गटाचे शहरप्रमुख यांना मारहाण झाल्याची घटना घडली आहे. ही मारहाण आमदार सुहास कांदे यांच्या कार्यकर्त्यानी केल्याचा आरोप ठाकरे गटाकडून करण्यात आला आहे.  रात्री उशिरा मनमाड पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्याचे काम सूरू होते..


दरम्यान, आज सकाळ पासून मनमाड शहरात शांततेत मतदान सुरू होते मात्र सायंकाळी किरकोळ वादातून झालेल्या प्रकारामुळे मतदानाला गालबोट लागले. 


मनमाडमध्ये कोण कोण रिंगणात?


नांदगाव मतदार संघ हा राज्यात चर्चेत राहिल्याने मतदान केंद्रावर पोलिसांचा तगडा बंदोबस्त लावण्यात आला होता. नांदगाव विधानसभा मतदारसंघात चौरंगी लढत होत असून शिवसेना ( शिंदे गट ) आमदार सुहास कांदे, अपक्ष उमेदवार माजी खासदार समीर भुजबळ, शिवसेना ( ठाकरे गटाचे ) गणेश धात्रक, अपक्ष डॉ.रोहन बोरसे यांच्यात लढत होत आहे.



नांदगांव विधानसभा मतदारसंघात मतदानाच्या दिवशी महायुतीचे उमेदवार सुहास कांदे आणि अपक्ष उमेदवार समीर भुजबळ समोरासमोर आल्यानं सकाळी राडा झाला होता. सुहास कांदे हे मतदारांना डांबून ठेवत बोगस मतदान करण्यासाठी घेऊन जात असल्याचा  आरोप समीर भुजबळ यांनी केला. तसेच मतदारांना पुढे जाऊ देणार नाही, असा इशारा दिल्यानंतर सुहास कांदे आणि समीर भुजबळ समोरा समोर आल्याचं पाहायला मिळालं. 


इतर बातम्या : 


महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये निकराची झुंज; 'या' तीन EXIT पोलनुसार अपक्षांकडे सत्तेच्या 'चाव्या' जाणार!