Dharashiv ZP Election 2026: डॉक्टर पद्मसिंह पाटलाच्या (Padamsinh Patil) कुटुंबीयांना सोडलं तर दुसऱ्या कोणाला अक्कल नाही? बाकी सगळे बिन आकली आहेत अशा तीव्र शब्दांत ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर (Omraje Naik Nimbalkar) यांनी जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर (Dharashiv ZP Election 2026) पहिल्याच प्रचार सभेत अर्चना पाटील (Archana Patil) यांच्या उमेदवारीवर जोरदार हल्लाबोल केला आहे. राजकारण ही एका घराची मक्तेदारी नसावी, नेते मंडळीच्या नातेवाईकांनाच तिकीट देण्याची पद्धत योग्य नाही, असं स्पष्ट मत ओमराजे निंबाळकर यांनी मांडलं.
Omraje Nimbalkar : राजकारण ही एका घराची मक्तेदारी नसावी, नातेवाईकांनाच तिकीट देण्याची पद्धत योग्य नाही
भाजपने नेत्यांच्या नातेवाईकांना तिकीट न देण्याचा घेतलेला निर्णय आपल्याला आवडल्याचं सांगत, बसवराज पाटील यांनी स्वतःच्या मुलाला उमेदवारी न दिल्याचं उदाहरणही त्यांनी दिलं. इकडेही सांगण्यात आलं होतं, पण “मला यांची नियती आणि नियत माहिती आहे,” असा टोला ओमराजे निंबाळकर यांनी लगावला. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासाठीच हे सुरू आल्याचे अधोरेखित करत तुम्ही आम्ही काय गुलाम आहेत काय असा सवालही खासदार ओमराजे निंबाळकर यांनी केला. (Omraje Naik Nimbalkar Vs Ranajagatsinh Patil)
दरम्यान, अर्चना पाटील यांनी तेर आणि केशेगाव या दोन गटांतून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. पक्षाच्या आदेशानुसार उमेदवारी मागे घेतली जाईल, अशी चर्चा असतानाच त्यांनी अचानक केवळ एकाच गटातून अर्ज मागे घेत, तेर गटातून आपली उमेदवारी कायम ठेवली आहे. या पार्श्वभूमीवर पाटील कुटुंबीयांचे पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेले धाराशिवचे ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी हल्लाबोल केल्याने राजकीय वातावरण तापले असून त्याला अर्चना पाटील काय उत्तर देणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
Dharashiv ZP Election 2026: लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर अर्चना पाटील पुन्हा निवडणुकीच्या आखाड्यात
दरम्यान, भाजप आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांच्या पत्नी अर्चना पाटील यांची उमेदवारी कायम आहे. अर्चना पाटील जिल्हा परिषदेच्या तेर गटातून भाजपकडून निवडणूक रिंगणात आहेत. जिल्हा परिषद निवडणुकीतून माघार घेण्याची चर्चा निष्फळ ठरलीआहे.उमेदवारी फायनल होताच भाजप कार्यकर्त्यांकडून पोस्टरबाजी करण्यातआलीअसून लागा तयारीला, लढणार जिंकणार अशाअशायाचेपोस्टर सोशल मीडियावर व्हायरलकरण्यातआलंय. लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर आता जिल्हा परिषद निवडणुकीच्या आखाड्यात अर्चना पाटील उतरल्याआहेत.
