मुंबई :ठाकरे बंधूंच्या सभेनंतर आज महायुतीची जाहीर सभा मुंबईतील (Mumbai) शिवाजी पार्क मैदानावर होत मुख्यमंत्री देवेंद्रफडणवीस अन्उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या (Eknath Shinde) प्रमुख उपस्थितीत ही सभा झाली. यावेळी बोलताना एकनाथ शिंदेंनीबाळासाहेबांचे नाव घेत सभेला सुरुवात केली. शिवसनेचं आणि शिवतीर्थचंअतुट नातं आहे, आजूबाजूला असलेल्या तिन्ही महापुरूषांच्या साक्षीने ही सभा होत आहे. ही प्रचारसभा नाही तर परिवर्तनाची सभा आहे, काल इथे सभा झाली ती टिका-टोमणे झाले. आम्ही त्यांना उत्तर देणार नाही, आम्ही कामाचा लेखाजोखा आणि पुढील 5 वर्षात काय करणार ते सांगणार आहे, असे म्हणत फक्त विकास आणि विकास हाच आपला अजेंडा आहे, असे म्हटले. मात्र, निवडणुकांवेळहोणाऱ्यासभांवरुन राज ठाकरेंना (Raj Thackeray) टोलाही लगावला.
काही लोकांना केवळ निवडणुका आल्या की, मराठी माणूस दिसतो. इतरवेळीनेटफ्लिक्स आणि निवडणुका आल्या की पॉलिटिक्स हेच कळतं, यांच्याच काळात मराठी माणूस बाहेर फेकला गेला, असे म्हणत एकनाथ शिंदेंनी नाव न घेता राज ठाकरेंवर शिवाजी पार्क मैदानातून टोला लगावला. मराठी माणसाचं अस्तित्व कधीच धोक्यात नव्हतं, आजही नाही आणि उदयाही नाही, असेही शिंदेंनी म्हटले.
मुंबईच हीत जपायला आम्ही समर्थ आहोत, एकनाथ शिंदे मराठी नाही का, फडणवीस मराठी नाहीत का?. 20 वर्षापूर्वी एकत्र का नाही आलात, जेव्हा दोघं एकत्र यावेत ही बाळासाहेबांची इच्छा होती, तेव्हा एकत्र आला नाहीत. आता, स्वत:च्या स्वार्थासाठी एकत्र आला आहात, असा टोलाही एकनाथ शिंदेंनी लगावला.
हेही वाचा
