Shivsena Cabinet Minister Maharashtra Goverment मुंबई: नागपूर अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळाचा विस्तार (Shivsena Cabinet Minister) होणार आहे. सर्व मंत्र्यांच्या कामाचं मुल्यांकन करुन निर्णय घेतला जाईल, तिन्ही पक्षांना मंत्रिपदं द्यायची असल्यानं काही प्रमाणात मागे पुढे होईल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. तसेच मंत्रिमंडळ विस्ताराबाबत उद्या महायुतीच्या नेत्यांची बैठक असल्याचंही समोर आलं आहे. आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक पार पडली असून यामध्ये 7 कॅबिनेट आणि 3 राज्यमंत्रिपदाचे चेहरे निश्चित झाल्याचं सूत्रांची माहिती आहे. याचदरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवसेनेकडून मंत्रिपद देताना कठोर निकष लावणार असल्याचं देखील सांगण्यात येत आहे. 


एकनाथ शिंदे कठोर निकष लावून मंत्रिपदाची माळ गळ्यात घालणार असल्याचं सूत्रांच्या माहितीनूसार समोर आलं आहे.  पक्ष संघटना वाढवणारे आणि जे पात्र असतील त्यांनाच मंत्रिमंडळात स्थान दिले जाणार आहे. शिवसेना पक्ष संघटना वाढीसाठी योगदान काय?, याचा विचार मंत्रिपद देताना केला जाणार आहे. निवडणुकीच्या प्रचारात किती साथ दिली याचा विचारसुद्धा केला जाणार आहे. तसेच ज्येष्ठतेच्या मुद्द्यावर मंत्रिपद दिलं जाणार नाही, अशीही माहिती समोर आली आहे. तर यंदाच्या मंत्रिमंडळातून शिवसेनेच्या तीन विद्यामान मंत्र्यांचा पत्ता कट होणार आहे. सूत्रांच्या माहितीनूसार यामध्ये दीपक केसरकर, अब्दुल सत्तार आणि तानाजी सावंत यांना मंत्रिमंडळातून डच्चू मिळण्याची शक्यता आहे.


शिवसेनेच्या मंत्र्यांची संभाव्य यादी-


1. एकनाथ शिंदे
2. उदय सामंत 
3. शंभूराज देसाई 
4. गुलाबराव पाटील 
5. संजय शिरसाट 
6. भरत गोगावले 
7. प्रकाश सुर्वे 
8. प्रताप सरनाईक 
9. राजेश क्षीरसागर 
10. आशिष जैस्वाल 
11. निलेश राणे


गृह खातं कोणाला मिळणार?


गृह खातं शिवसेनेच्या वाटेला यावं, यासाठी एकनाथ शिंदे आग्रही आहेत. याचदरम्यान देवेंद्र फडणवीस यांनी महत्वाचं विधान केलं आहे. आम्हा तिन्ही पक्षांना जास्तीत जास्त मंत्रिपदं मिळावीत असं वाटतं. जेव्हा एखाद पक्ष चालवायचा असतो तेव्हा नेत्यांना संतुष्ट करावं लागतं. त्यामुळे खातेवाटपावर आमची चर्चा चालू आहे. आमची ही चर्चा आता जवळ-जवळ संपत आली आहे. आमचं मंत्रिपदांचं वाटप जवळजवळ पूर्ण झालं आहे, असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. गृहखातं, महसूल या खात्यांना थोडं महत्त्व असतं. आमच्या महायुतीत तीन पक्ष आहेत. या तिन्ही पक्षांचा योग्य तो सन्मान देण्यात आला आहे, असं फडणवीस यांनी सांगितलं. तसेच गृहखातं तुमच्याकडेच असेल का? या प्रश्नावर बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी स्मीतहास्य केलं आणि याबाबत जेव्हा निर्णय होईल तेव्हा मी तुम्हाला सांगेन, असं उत्तर दिलं. 


उदय सामंत काय म्हणाले?, VIDEO:



संबंधित बातमी:


राजन विचारे, बाळासाहेब थोरात, राजेश टोपे ते क्षितीज ठाकूर...; ईव्हीएम-व्हीव्हीपॅट मशीनच्या पडताळणीसाठी कोणी कोणी अर्ज केले?