नाशिक : राज्यातील विधानसभा निवडणुकांसाठी अर्ज माघारी घेण्याचा शेवटचा दिवस असून बड्या नेत्यांच्या मध्यस्थीनंतर व शिष्टाईनंतर उमेदवारांकडून तलवार मान्य केली जात आहे. त्यातच, नाशिक जिल्ह्यातील देवळाली मतदारसंघातून चक्क भावाविरुद्ध बहिणीने उमेदवारी अर्ज दाखल केला होता. माजी मंत्री बबनराव घोलप यांनी शिवसेना शिंदे गटाला जय महाराष्ट्र करत मशाल हाती घेतली होती. त्यानंतर, शिवसेना ठाकरे पक्षाकडून त्यांच्या मुलाला विधानसभेची उमेदवारीही जाहीर झाली. महायुतीत नाशिक जिल्ह्यातील देवळाली मतदारसंघातून अजित पवार (Ajit Pawar) यांच्या राष्ट्रवादीने विद्यमान आमदार सरोज अहिरे (Saroj Ahire) यांना पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे. तर महाविकास आघाडीत (Mahavikas Aghadi) शिवसेना ठाकरे गटाने माजी आमदार योगेश घोलप (Yogesh Gholap) यांना उमेदवारी जाहीर केली आहे. मात्र, येथून त्यांच्या बहिणीने उमेदवारी अर्ज दाखल केला होता. अखेर भाऊबीजेच्या दुसऱ्यादिवशी त्यांनी अर्ज माघारी घेतला आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत उपनेतेपदाची जबाबदारी बबनराव घोलप यांच्याकडे होती. मात्र, त्यांनी राजीनामा देत ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. पण, त्यांच्या कन्या तनुजा घोलप यांनी महायुतीसोबतच राहणे पसंत केले. विशेष म्हणजे देवळाली विधानसभा मतदारसंघातून चक्क आपल्या भावाविरुद्धच उमेदवारी अर्ज भरला होता, अखेर त्यांनी अर्ज मागे घेतला आहे. तुनजा यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केल्याने त्यांना कौटुंबिक कलहाचा सामना करावा लागला होता. त्यामुळे, अर्ज माघारी घेताना तनुजा घोलप भावूक झाल्याचं पाहायला मिळालं. कारण, येथील मतदारसंघातून तनुजा घोलप यांचे बंधू योगेश घोलपही हेही महाविकास आघाडीतील शिवसेना ठाकरे गटाकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. त्यामुळेच, कौटुंबिक वाद त्यांच्या उमेदवारीने उफाळून आला होता. विशेष म्हणजे त्यांचे वडिल बबनराव घोलप यांनी थेट कायदेशीर नोटीसच मुलीला पाठवली होती. तुमचं लग्न झालेलं असल्याने तुम्ही माहेरचे नाव लावू नये, तुम्ही सासरचे नाव लावावे, अशा आशयाची नोटीस बबन घोलप यांनी त्यांच्या मुलीला बजावली होती.
माझ्या जन्मदाखल्यावर वडिलांचे नाव
माझ्या भावाला निवडणुकीसाठी बहीण म्हणून शुभेच्छा देते. मात्र, महायुतीतच राहून महायुतीचं काम करणार असल्याची भूमिका तनुजा घोलप यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज माघारी घेतल्यानंतर व्यक्त केली. तसेच, वडिलांनी पाठवलेल्या नोटीससंदर्भातही त्यांनी प्रतिक्रिया दिली. माझ्या जन्मदाखल्यावर आजही तनुजा बबनराव घोलप नाव असल्याने तेच वापरणार असल्याची तनुजा घोलप यांची भूमिका आहे. मात्र, वडिलांनी केलेल्या टीकेला कुठलेही उत्तर देणार नाही, पक्षश्रेष्ठींनी दिलेल्या आश्वासनानंतरच आपण माघार घेत असल्याचे तनुजा घोलप यांनी स्पष्ट केले.
हेही वाचा
सुनील शेळकेंचा गेम होणार?, मावळ पॅटर्नला राज ठाकरेंचाही मनसे पाठिंबा; बाळू भेगडेंनी घेतली भेट