Akola Municipal Corporation Election 2026: अकोला महापालिकेत सत्ता स्थापनेसाठी 'हाय व्होल्टेज पॉलिटिक्स' रंगतंये. अशातच उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे सर्व सहाही नगरसेवक नॉट रिचेबल आहेत, अशी मोठी चर्चा अकोल्यात आहेय. मात्र, सहाही नगरसेवक कुठेच गायब नाहीये. सोबतच आहोत. सर्वांचं एकमत आहे. ही निव्वळ अफवा असल्याचे सांगत आमदार नितीन देशमुखांनी (Nitin Deshmukh) एबीपीमाझाशीबोलतानासर्वांनाथेट कॅमेरासमोर उभं केलं. दरम्यान, अकोल्यातील पक्ष कार्यलयात सहा नगरसेवकांना बोलवत महत्वाची बैठक बोलावली आणि देशमुखांनी सहाही नगरसेवक सोबत आणि एकमत असल्याचे दाखवून दिले.

दरम्यान, भाजप आणि काँग्रेसकडून राजकीय जोडतोडीसाठी ताकदीचे प्रयत्न सुरुये. या सत्तेच्या खेळात अकोल्यात प्रत्येक नगरसेवक आणि अगदी छोट्या पक्षांनाही प्रचंड महत्व आलंये. तर सत्ता स्थापनेत महत्वाची आणि 'किंगमेकर'ची भूमिकाही वंचित आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनेची आहे. दरम्यान, लवकर आमचा निर्णय कळवणार असल्याची माहिती आमदार नितीन देशमुख यांनी दिलीय.

Akola Election 2026: कोणआहेत ठाकरे गटाचे सर्व 6 नगरसेवक?

1) अभय खुमकर : प्रभाग क्रमांक 4

2) सोनाली सरोदे : प्रभाग क्रमांक 8

3) मनोज पाटील : प्रभाग क्रमांक 8

4) सागर भारूका : प्रभाग क्रमांक 12

5) विजय इंगळे : प्रभाग क्रमांक 20

6) सुरेखा काळे : प्रभाग क्रमांक 20

अकोला महापालिकेतील एकूण पक्षीय बलाबल (Akola Municipal Corporation Election 2026)

एकूण जागा : 80 जाहीर निकाल : 80

भाजप : 38काँग्रेस : 21उबाठा : 06शिंदे सेना : 01अजित राष्ट्रवादी : 01शरद राष्ट्रवादी : 03वंचित : 05एमआयएम : 03अपक्ष : 02

Akola Election Result 2026: त्रिशंकू अकोला महापिलेकत सत्ता स्थापनेसाठी जोरदार राजकीय संघर्ष

अकोला महापालिकत त्रिशंकू परिस्थिती आहे. 80 सदस्यांच्या महापालिकेत कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले नाहीये. 38 जागा जिंकत भाजप सर्वात मोठा पक्ष ठरलाय. तर काँग्रेसही 21 जागा जिंकत दुसरा मोठा पक्ष ठरलाय. दोन्ही पक्षांकडून अकोला महापालिकेवर सत्ता स्थापनेचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत.

भाजप आणि काँग्रेसकडून राजकीय जोडतोडीसाठी निकराचे प्रयत्न

महापालिकेच्या निकालानंतर आता अकोला महापालिकेत सत्ता स्थापनेसाठी 'हाय व्होल्टेज पॉलिटिक्स' रंगतंये. या सत्तेच्या खेळात अकोल्यात प्रत्येक नगरसेवक आणि अगदी छोट्या पक्षांनाही प्रचंड महत्व आलंये. अकोल्यात भाजपचे मित्रपक्ष असलेल्या शिंदेंच्या शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा प्रत्येकी 1 नगरसेवक विजयी झालाये. तर दोन अपक्ष विजयी झालेयेत. यात आशिष पवित्रकार हा भाजपचा बंडखोर अपक्ष आहेय. तर दुसरा अपक्ष हा भाजपने पुरस्कृत केलेले चांद भोजा चौधरी आहेय. त्यामूळे भाजपने आपण सहज महापालिकवर सत्ता स्थापन करण्याचा विश्वास व्यक्त केलाय.