Sanjay Raut : मिरजच्या (Miraj) जागे संदर्भात माझे नुकतेच काँग्रेसच्या नेत्यांसोबत बोलणे झाले आहे. तसेच दक्षिण सोलापूरचा (South Solapur) विषय हा संपत जमा आहे. परांडा येथील विषय देखील लवकरच संपेल. मात्र दक्षिण सोलापूर मध्ये शिवसेनेचे आणि महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार हे अमर पाटीलच असणार आहेत. काँग्रेसचा उमेदवारांना कुठल्याही प्रकारचा एबी फॉर्म अद्याप दिलेला नाही. काही ठिकाणी काही उमेदवारांनी एबी फॉर्म भरले असतील मात्र त्या एबी फॉर्म पक्षाची मान्यता नाही. मिरजमध्ये शिवसेनेचे उमेदवार तानाजी सातपुते हे महाविकासा आघाडीचे उमेदवार असतील. त्यामुळे काँग्रेस पक्ष त्यांच्यासाठी प्रामाणिकपणे काम करेल असा शब्द त्यांनी आम्हाला दिला आहे. असे स्पष्टीकरण शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी दिले आहे.
परांडा संदर्भात आमची चर्चा झाली होती. मात्र त्या ठिकाणी काही गैरसमज झाल्यामुळे दोन उमेदवारी अर्ज भरण्यात आले. हे कोणीही ठरवून केलेले नाही. तर त्यातून आम्ही लवकरच मार्ग काढू. शिवसेना हा आघाडी धर्म पाळणारा पक्ष आहे. आजही जिथे समाजवादी पक्षाचे उमेदवार आहे तेथे आम्ही फॉर्म अथवा उमेदवार उभे केले नाहीत. मुळे आमची भूमिका समन्वयाचीच आहे आणि राहील असेही संजय राऊत म्हणाले
अद्वय हिरे यांच्यावर दादा भुसे यांच्याच गुंडांकडून हल्ला- संजय राऊत
अद्वय हिरे यांच्यावर दादा भुसे यांच्याच गुंडांकडून हल्ला करण्यात आला. प्रचार करत असताना त्यांच्याजवळ गावठी पिस्तूलसह लोखंडी शस्त्र होती. त्यामुळे अद्वैत हिरे त्यांना ठार मारण्याचा हा प्रयत्न होता. त्यात आमचे पाच शिवसैनिक जखमी झाले आहेत. असे असताना पोलिसांनी त्या संदर्भात अजूनही ठोस कारवाई केलेली नाही. हे प्रकरण केवळ मालेगाव पूर्त मर्यादित नाही. तर पोलिस यंत्रणेचा वापर करून अशा प्रकारे हल्ले होत राहणार असतील तर महाराष्ट्रात त्यांना निवडणुका शांत पद्धतीने करायच्या नाहीत हे दिसून येत आहे. या राज्याच्या पोलिस महासंचालिका रश्मी शुक्ला यांची निवडणुकीच्या आधी बदली करावी अशी मागणी आम्ही केली होती. आमची मागणी याकरताच होती की सध्या घडीला पोलीस यंत्रणा राजकीय कामाला झोपली आहे एका पक्षाच्या कामाला जंपली आहे. त्यामुळे निवडणुका स्वच्छ वातावरणात होणार नाही. हा आमचा अंदाज होता तो आता खरा होताना दिसत आहे. अशी टीकाही खासदार संजय राऊत यांनी केली.
रश्मी शुक्ला यांची तातडीने बदली करा- संजय राऊत
अद्वय हिरे या प्रकरणातून थोडक्यात बचावले. त्यांना या प्रकरणात रिवाल्वर लावण्यात आलं. आमच्या शिवसैनिकांनी दादा भुसे यांच्या गुंडांना ओल्ड त्यामुळे हिरे त्यातून बचावले. राज्यातील कायदा सुव्यवस्था ची आजची परिस्थिती आहे. राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे कुठल्यातरी जीप वर बसून कुठे ना कुठे फिरताना दिसत असतात. दुसरीकडे केंद्रीय गृहमंत्री राज्य राज्यांमध्ये फिरून आपण कसे जिंकणार याची तयारी करत आहेत. मात्र तुम्ही अशा पद्धतीने निवडणुका लढणार आहात का किंवा लढवल्या जाणार आहेत का? त्यामुळे देशाच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना आमचे आवाहन आहे की राज्याच्या पोलिस महासंचालिका रश्मी शुक्ला यांची तातडीने बदली करावी. तसेच राज्याचे ज्या पद्धतीने गुंडशाही सुरू आहे त्यावर तातडीने कारवाई करण्याचे आदेश देण्यात यावे. अशी मागणी संजय राऊत यांनी केली आहे.
हे ही वाचा