पुणे: राज्यातील विधानसभा निवडणुकांचे निकाल काल (शनिवारी) जाहीर झाले. राज्यात अनपेक्षित निकाल लागला असल्याच्या चर्चा सर्वत्र सुरू आहेत. राज्यातील अनेक मतदारसंघात खूप कमी मतांच्या फरकाने विजयी झाल्याचीही उदाहरणे आहेत तर दुसरीकडे विक्रमी मतांनी विजयी झाल्याचंही चित्र आहे. अशातच एक मतदारसंघ विशेष चर्चेत आला आहे, तो म्हणजे मावळ पॅटर्न राबवलेला मावळ मतदारसंघ. मावळमध्ये यंदा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांचे उमेदवार सुनील शेळके (Sunil Shelke) यांना पाडण्यासाठी सर्वपक्षीय एकत्र आले होते. राज्यात या मावळ पॅटर्नची (Maval Pattern) चांगलीच चर्चा रंगली. मात्र, सुनील शेळके या सर्व विरोधकांचे आव्हान मोडीत काढत विक्रमी मतांनी विजयी होऊन दाखवले आहे.
अजित पवारांचे शिलेदार सुनील शेळके हे मावळ पॅटर्नवर भारी पडले. कारण शेळकेंनी बंडखोर बापू भेगडेंचा तब्बल एक लाख आठ हजार मतांनी दारुण पराभव केला. अजित पवारांपेक्षा ही अधिकच्या मताधिक्याने शेळकेंनी विजय मिळवल्याचं पाहून अजित दादा ही अवाक झाले. भाजप, शरद पवार गट, ठाकरे गट, काँग्रेस, मनसे यासंह अनेक संघटना शेळकेंना घेरलं होतं. त्यामुळं सुनील अण्णा विरुद्ध बापू अण्णा ही लढत लक्षवेधी ठरली होती. पण शेळकेंनी विकासाच्या आणि लाडक्या बहिणींच्या जोरावर मावळ पॅटर्नचं पानिपत केलं. दणदणीत विजय मिळवलेल्या शेळकेंनी अजित दादांपेक्षा अधिकचं मताधिक्य मिळवलं. विजयानंतर शेळकेंनी जेंव्हा अजित पवारांची भेट घेतली. तेंव्हा अजित पवारांनी पुण्यातील सभेवेळी नरेंद्र मोदी अन शेळकेंची विशेष भेट कशी घडली आणि आधी पराभवाच्या छायेत असणाऱ्या शेळकेंनी मतदानादिवशी लाखाच्या फरकाने निवडून येणार असल्याचा दावा केल्याचा किस्सा सांगितला.
काय म्हणाले सुनील शेळके?
सुनील शेळके मावळ मतदारसंघामधून थोड्याथोडक्या नव्हे तर एक लाखांपेक्षा जास्त मताधिक्य घेऊन निवडून आले आहेत. यानंतर सुनील शेळके यांनी अजित पवार (Ajit Pawar) यांची भेट घेतली. त्याचबरोबर त्यांचं कौतुक देखील केलंय. मात्र, सर्वपक्षीय नेत्यांनी दिलेला पाठिंबा मात्र, शेळकेंना कोणताही फटका बसला नाही. त्यांनी याउलट सर्व पक्षांनी विरोधी नेत्याला पाठिंबा दिल्यानंतर त्यांनी अजित पवारांसमोर मी एक लाख मतांच्या फरकाने जिंकून येईन. त्याच विश्वासाने सुनील शेळके यांनी एक लाखांच्या फरकाने विजय मिळवला आहे.
एक लाख मतांच्या फरकाने जिंकून येण्याचा हा विश्वास त्यांनी आधी व्यक्त केला, त्यावर बोलताना सुनील शेळके बोलताना म्हणाले, हा विजय माझ्या जनतेचा आहे. माझा बहिणींनी माझा प्रचार घरोघरी जाऊन केला होता. त्या माझ्यासाठी दारोदार फिरल्या. त्या सर्वांचा हा विजय आहे. माझ्या कार्यकर्त्यांनी मार सहन केला. शिव्या खाल्या, त्या सर्व माझ्या भावंडांचा आणि वडीलधाऱ्यांचा तो विजय आहे. निवडणूक सर्वसामान्य जनतेने हातात घेतली. त्यांनी मला प्रेम दिलं. त्यांनी मला गेल्या 5 वर्षासाठी निवडून दिलं. मी मतदारसंघात काम करण्याचा प्रयत्न केला, असं सुनील शेळके यावेळी बोलताना म्हणाले, त्याचबरोबर बोलत असताना सुनील शेळके भावूक झाल्याचं दिसून आलं.
एका लाखांच्या लीडचा अंदाज खरा ठरला त्याबाबत बोलताना सुनील शेळके म्हणाले, जो पर्यंत माझी नियत चांगली आहे. माझी नीतिमत्ता चांगली आहे. तोपर्यंत मला माझा आत्मविश्वास आहे. माझी माणसं मला सोडणार नाहीत आणि तेच आजही दिसून आलं 2019 च्या विधानसभेच्या वेळी 94 हजार मतांनी निवडून दिला होता. मी यावेळी एक लाख वीस हजार सांगितले होते आणि आपण यावेळी देखील एक लाख वीस हजारच्या जवळपास पोहोचला आहे. त्याचा मला आनंद आहे.
मला निवडणुकीला एकता पाडण्याचा प्रयत्न केला. पण मला माझा विश्वास होता. मी कोणाचं वाईट केलेलं नाही. मला जनता साथ देईल, असा मला विश्वास होता आणि जनतेने मला तशी साथ देखील दिली. माझ्या बहिणींनी माझ्या सहकाऱ्यांनी वडीलधाऱ्यांनी खूप खूप ताकद दिली. आधार दिला. मी सर्वांचा मनापासून आभारी आहे, आणि हा विजय त्या सर्वांचा आहे असं सुनील शेळके म्हणाले.
मावळ पॅटर्न बद्दल बोलताना ते म्हणाले तो मावळ पॅटर्न नव्हता तो स्वार्थी पॅटर्न होता मावळचा पॅटर्न हा विकासाचा पॅटर्न आहे मावळ तालुक्यांना विकासाला मत दिलं नव्हता विश्वासाला मत दिलं पॅटर्न आणि प्रसिद्धीला मत मावळ तालुक्यातील दिलेलं नाही मी त्या सर्वांचा आभारी आहे असंही पुढे सुनील शेळके यांनी म्हटलं आहे.