Sharad Pawar, Maharashtra Politics : राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर पहिल्यांदाच विधानसभा निवडणूक होत आहे. यानिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार चांगलेच आक्रमक झाले आहेत. सोडून गेलेल्या दिग्गज नेत्यांच्या मतदारसंघात जात शरद पवार स्वत: या नेत्यांना पराभूत करण्याचं आवाहन करत आहेत. त्यामुळे ऐन निवडणुकीच्या काळात नेत्यांच्या टेंशनमध्ये वाढ झाली आहे. शरद पवार फक्त टीकाच करत नाहीयेत तर भाजपसोबत गेले नसते तर तुरुंगात जावं लागेल, असं या नेत्यांनी सांगितल्याचंही ते बोलत आहेत.
सहा दशकांपेक्षा जास्त राजकीय कारकीर्द असलेला हा नेता ज्यांच्यावर आगपाखड करतोय..
ते आहेत..दिलीप वळसे पाटील...मतदारसंघ आहे... आंबेगाव विधानसभा मतदारसंघ
शरद पवार इतके आक्रमक का झाले असतील..
तर त्याचं उत्तर जाणून घ्यायचं असेल तर थोडं इतिहासात जावं लागेल..
जेव्हा वळसे पाटलांकडे महाराष्ट्र शरद पवारांचे मानसपूत्र म्हणून पाहायचा...
कारण, त्यांचा राजकीय उगमच शरद पवारांमुळे झाला..
दिलीप वळसेंचा राजकीय प्रवास
घरातच त्यांना राजकारणाचे बाळकडू
उच्च शिक्षण पूर्ण केल्यानंतर शरद पवारांचे स्वीय सहाय्यक बनले
1990 आंबेगाव-शिरुर मतदारसंघातून आमदार
1990 पासून सलग सातवेळा आमदार
वैद्यकीय शिक्षण, उच्च आणि तंत्र शिक्षण, ऊर्जासह अनेक खात्यांचे मंत्री राहिलते
2009 ते 2014 दिलीप वळसे-पाटील विधानसभेचे अध्यक्ष होते
अत्यंत संयमी... शांत... अभ्यासू... आणि शरद पवारांचे अतिशय विश्वासू..
अशी ओळख असलेला हाच नेता..
अजित दादांसोबत जातो...
आणि शरद पवारांच्या विरोधात उभा राहतो..
त्यांच्या याच कृत्यानं शरद पवाराचं नाही..
तर त्यांच्या पत्नी प्रतिभा पवारही किती दुखावल्या गेल्यात..
याचा किस्सा शरद पवारांनी मतदारांसमोर सांगितला..
म्हणजेच काय..
तर दिलीप वळसेंनी साथ सोडणं..
किती धक्कादायक होतं.. हेच शरद पवारांच्या भाषणातून दिसून आलं..
फक्त दिसलं नाही तर..
महाराष्ट्रानं शरद पवारांचं शिवसेना स्टाईलनं भाषणही पाहिलंय..
((पाडा पाडा पाडा...))
आता इतका आक्रमक हल्ला झाल्यावर..
वळसे पाटलांकडूनही उत्तर येणारच..
पण, तसं झालं नाही..
शेवटच्या सभेत बोलू म्हणत वळसे पाटलांनी दोन दिवस वेळ मारुन नेली..
अखेर एबीपी माझाच्या कॅमेऱ्यावर त्यांनी भावना मोकळ्या केल्या..
पवारांना मान्य नेसल तर ठिक.. मी स्वत: कधीही म्हटलं नाही की मी शरद पवारांचा मानसपुत्र आहे , लोक म्हणायचे
जर शरद पवार म्हणत असतील तर कौटुंबिक संबंध नसतील. शरद पवारांनी असं म्हटल्याने माझ्या कुटुंबाला देखील त्रास झाला.
पवार आणि वळसे
म्हणजे गुरू शिष्यात राजकीय कुस्ती सुरू झालीय
आखाडा कोण आणि कोणत्या मुद्द्यावर मारतो
याची महाराष्ट्राला उत्सुकता असणार आहे
Special Report Pawar VS Dilip Walse : 'गुरू'चा कोप, शिष्य भावूक; पवारांच्या टीकेवर वळसे काय म्हणाले?
इतर महत्त्वाच्या बातम्या
शरद पवारांना गरिबांची नावं अन् श्रीमंतांची कामं लक्षात राहतात; राज ठाकरेंचा भुजबळांवरही निशाणा