सोलापूर : विजयसिंह मोहिते पाटलांचा आग्रह आणि देशातल्या मंडळींमुळे आपण माढ्यातून निवडणूक लढवणार असल्याची घोषणा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली.
शरद पवार लढणार नाहीत आणि पुन्हा विजयसिंह मोहिते पाटील उमेदवार होतील, अशी आशा राष्ट्रवादीतल्या एका गटाला होती. विद्यमान खासदार विजयसिंह मोहिते पाटलांच्या समर्थकांचा बबनदादा शिंदे गटाला मोठा विरोध आहे. या विरोधाच्या पार्श्वभूमीवर शरद पवारांना स्वतःची उमेदवारी घोषित करावी लागली.
त्याआधी शरद पवारांनी राष्ट्रवादीमधल्या सगळ्या गटांना एकत्रित करण्याचे प्रयत्न केले. राष्ट्रवादीचे आमदार बबनदादा शिंदे यांच्या घरी डिनर डिप्लोमसी केली. माजी सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख, विद्यमान खासदार विजयसिंह मोहिते पाटील, मोहिते पाटलांचे कट्टर विरोधक संजय शिंदे यांच्यासह राष्ट्रवादीचे सर्व गट-तट पवारांच्या या सहभोजनासाठी उपस्थित होते.
स्नेहभोजनानंतर झालेल्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यामध्ये पवारांनी हात वर करुन कार्यकर्त्यांना विचारलं आणि स्वतःची उमेदवारी घोषित केली.
दरम्यान, शरद पवारांचं राजकीय कर्तृत्व पाहता माढा मतदारसंघातून शरद पवार विजयी होतील असा सर्व राजकीय तज्ज्ञांना अंदाज आहे. 2009 साली शरद पवार खासदार झालेच होते, पण 2009 आणि 2019 मध्ये फरक आहे, याकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही
Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
माढ्यातून लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात, शरद पवारांची घोषणा
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
21 Feb 2019 08:11 PM (IST)
विद्यमान खासदार विजयसिंह मोहिते पाटलांच्या समर्थकांचा बबनदादा शिंदे गटाला मोठा विरोध आहे. या विरोधाच्या पार्श्वभूमीवर शरद पवारांना स्वतःची उमेदवारी घोषित करावी लागली.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -