एक्स्प्लोर

महायुतीत पुणे शिक्षक आणि पदवीधरमध्ये बंडाची ठिणगी? इकडं एकनाथ शिंदे दिल्लीत गेले असतानाच तिकडं उमेदवारी नाकारताच शरद लाड यांचाही मोठा निर्णय, मंगेश चिवटेंनी सुद्धा शड्डू ठोकला

दोन्ही मतदारसंघ भाजपला सुटल्यानंतर भाजपकडून पुणे पदवीधर मतदारसंघातून स्मिता जाधव यांना उमेदवारी देण्यात आली, तर शिक्षक मतदारसंघातून कौस्तुभ गावडे यांना उमेदवारी देण्यात आली.

Pune Teachers and Graduates constituencies: पुणे शिक्षक मतदारसंघ आणि पुणे पदवीधर मतदारसंघामध्ये महायुतीमध्ये संघर्ष टोकाला गेला आहे का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. हे दोन्ही मतदारसंघ भाजपला सुटल्यानंतर भाजपकडून पुणे पदवीधर मतदारसंघातून स्मिता जाधव यांना उमेदवारी देण्यात आली, तर शिक्षक मतदारसंघातून कौस्तुभ गावडे यांना उमेदवारी देण्यात आली. या दोन्ही उमेदवारांचे काल पक्षप्रवेश झाल्यानंतर उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. मात्र, या दोन्ही मतदारसंघांमध्ये महायुतीकडून शह-काटशह सुरु आहे. वर्षभरापूर्वी भाजपमध्ये प्रवेश केलेल्या शरद लाड यांना भाजपकडून पदवीधर मतदारसंघामधून उमेदवारीचा शब्द देण्यात आला होता, मात्र ऐनवेळी स्मिता जाधव यांनी बाजी मारल्याने शरद लाड यांचा पत्ता कट झाला आहे. मात्र शरद लाड यांनी उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचं म्हटलं आहे. शरद लाड यांनी आपल्याला उमेदवारी अर्ज दाखल करण्याची सूचना पक्षाकडून देण्यात आल्याचा दावा केला आहे. त्यामुळे पुणे पदवीधर संघामध्ये भाजपकडून बंडखोरी अटळ मानली जात आहे का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. 

मंगेश चिवटे शिक्षक मतदारसंघात बंडखोरी करणार?

दुसरीकडे, शिक्षक मतदारसंघातून कौस्तुभ गावडे यांनी भाजपकडून उमेदवारी अर्ज दाखल केला असला, तरी शिंदे गटाचे मंगेश चिवटे यांनी कोणत्याही स्थितीत निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. या जागेवरून बराच संघर्ष महायुतीमध्ये झाल्याचं बोललं जात आहे. काल कोल्हापूरमध्ये बोलताना उद्योगमंत्री उदय सामंत यांनी "भाजपने कोणाला उमेदवारी दिली हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे," असं म्हटलं होतं आणि "मंगेश चिवटे हेच आमचे उमेदवार आहेत" असं म्हटलं होतं. त्यामुळे शक्तीप्रदर्शनाने मंगेश चिवटे यांचा उमेदवारी अर्ज उद्या दाखल करण्यात येणार आहे. दुसरीकडे आता एकनाथ शिंदे यांनी सुद्धा या उमेदवारीवरूनच दिल्ली गाठली आहे का, असा सुद्धा प्रश्न निर्माण झाला आहे. एकनाथ शिंदे आज दिल्ली दौऱ्यावर गेले असून या दौऱ्याला सुद्धा महायुतीमध्ये विधानपरिषद निवडणुकीवरून जो संघर्ष निर्माण झाला आहे, त्या संदर्भानेच ते भाजप पक्षश्रेष्ठींशी बोलण्यासाठी गेले असावेत, असा अंदाज व्यक्त होत आहे. त्यामुळे मंगेश चिवटे आणि शरद लाड यांची उमेदवारी राहिल्यास भाजपचे जे अधिकृत उमेदवार आहेत, त्यांना मात्र मोठी अडचण निर्माण होऊ शकते.   

महायुतीचेच बंडखोर उमेदवार डोकेदुखी ठरणार का?

पुणे पदवीधर आणि शिक्षक या दोन्ही महायुतीच्या मतदारसंघांमध्ये आता महायुतीचेच बंडखोर उमेदवार डोकेदुखी ठरणार का, आता असा प्रश्न निर्माण झाला आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीकडून हर्षदा देशमुख यांना उमेदवारी देण्यात आली आहे, तर शिक्षकमधून विद्यमान आमदार जयंत आसगावकर यांनाच काँग्रेसकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे आता या दुफळीचा फायदा नेमका कोणाला होणार, याचे उत्तर आता निवडणुकीच्या निकालामध्येच मिळणार आहे. पदवीधरमधून कोल्हापूरतील भैय्या माने यांनी सुद्धा जोरदार तयारी केली होती. कोणत्याही स्थितीत निवडणूक लढवण्याचा त्यांनी सुद्धा निर्णय घेतला आहे. त्यामुळे ते अर्ज दाखल करणार का, याकडे लक्ष असेल. दुसरीकडे भैय्या माने यांनी निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्याने "त्यांच्याशी आमचा संबंध संपल्याचं" वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी म्हटलं आहे. त्यामुळे दोन बंडखोर उमेदवारांमुळे विशेष करून पदवीधर मतदारसंघात मोठी अडचण निर्माण होऊ शकते.   

दरम्यान, शरद लाड यांना उमेदवारी नाकारल्याने त्यांची नाराजी लपून राहिलेली नाही. दुसरीकडे विद्यमान आमदार अरुण अण्णा लाड यांनी सुद्धा शरद लाड यांना उमेदवारी नाकारली असता याबाबत बोलण्यास स्पष्ट नकार दिला आहे. शरद लाड हे अरुण अण्णा लाड यांचे चिरंजीव आहेत. 

इतर महत्वाच्या बातम्या

गेल्या दहा वर्षांपासून एबीपी माझा मध्ये कार्यरत. पुण्यासह दिल्ली पंजाब आणि गुवाहाटी मध्ये काम करण्याची संधी मिळाल्यामुळे कृतज्ञ. वार्तांकन व्यतिरिक्त पर्यटनाचा छंद...
Read More
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Jalgaon Bank Election : जळगाव जिल्हा बँक निवडणुकीत गिरीश महाजन यांचा मार्ग मोकळा; विरोधी उमेदवाराचा अर्ज तांत्रिक कारणास्तव बाद, नेमकं काय घडलं?
जळगाव जिल्हा बँक निवडणुकीत गिरीश महाजन यांचा मार्ग मोकळा; विरोधी उमेदवाराचा अर्ज तांत्रिक कारणास्तव बाद, नेमकं काय घडलं?
Gokul Chairman Election 2026 Rajesh Patil: जोपर्यंत अजितदादा मुख्यमंत्री होणार नाही, तोपर्यंत फेटा बांधणार नाही, भीष्मप्रतिज्ञा करणारे राजेश पाटील गोकुळच्या अध्यक्षपदाचे उमेदवार, धगधगती राजकीय कारकीर्द!
अजितदादा मुख्यमंत्री होणार नाही, तोपर्यंत फेटा बांधणार नाही, भीष्मप्रतिज्ञा करणारे राजेश पाटील गोकुळच्या अध्यक्षपदाचे उमेदवार, धगधगती राजकीय कारकीर्द!
Satara Bank News: अध्यक्षपदाचा तिढा वरिष्ठांना त्रास न देता स्थानिक पातळीवरच सोडवा; शंभूराज देसाईंचा जयकुमार गोरेंना टोला, सातारा जिल्हा बँक अध्यक्षपदाबाबत नेमकं काय म्हणाले?
अध्यक्षपदाचा तिढा वरिष्ठांना त्रास न देता स्थानिक पातळीवरच सोडवा; शंभूराज देसाईंचा जयकुमार गोरेंना टोला, सातारा जिल्हा बँक अध्यक्षपदाबाबत नेमकं काय म्हणाले?
Satej Patil on Gokul Chairman Election 2026: अखेर ज्याची भीती होती तेच झालं, महायुती सरकारकडून गोकुळवर 4 सरकारी संचालकांच्या नियुक्तीला मंजुरी, बंटी पाटलांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
अखेर ज्याची भीती होती तेच झालं, गोकुळवर 4 सरकारी संचालकांच्या नियुक्तीला मंजुरी, बंटी पाटलांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
Advertisement

व्हिडीओ

Nashik Bird Election : गिधाड विरूद्ध कावळा... पक्ष्यांच्या निवडणुकीत वातावरण का तापलं? Special Report
Hotel Vaishali and Rupali Pune : हॉटेल वैशाली-रुपाली बंद,हळवे पुणेकर भरभरून बोलले
Rahul Gandhi Phone Tapping Case : वादविवादाचं आवतण 'फोन टॅपिंग'चा बाण | Special Report ABP Majha
Microsoft Outage Today : मायक्रोसॉफ्ट गंडलं, कामकाज कोलमडलं | Special Report ABP Majha
Satej Patil Coffee With Kaushik: शांत झालेल्या गोकुळमध्ये पवारांची एन्ट्री, सतेज पाटलांचे गौप्यस्फोट
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Palghar : पालघरमध्ये पोलीस कर्मचाऱ्याने जीवन संपवलं, पत्नीच्या मानसिक छळाला कंटाळून टोकाचं पाऊल? कुटुंबीयांचा आरोप 
पालघरमध्ये पोलीस कर्मचाऱ्याने जीवन संपवलं, पत्नीच्या मानसिक छळाला कंटाळून टोकाचं पाऊल? कुटुंबीयांचा आरोप 
Ashok Saraf : लोकांनी खुर्च्या तोडून टाकल्या, ट्यूबलाईट फोडल्या,ड्रायव्हरला मार मारलेलं, नाना पाटेकरांनी 'त्या' दिवशी माझा जीव वाचवलेला : अशोक सराफ
नानानं एका गावात माझा जीव वाचवलेला, तो काय चीज होता ते कोणाला कळणार नाही :अशोक सराफ
Suryakumar Yadav : सूर्यकुमार यादवची वादळी खेळी, 15 बॉलमध्ये अर्धशतक पूर्ण, सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीत मुंबईनं विजयाची वात पेटवली... 
सूर्यकुमार यादवची वादळी खेळी, 15 बॉलमध्ये अर्धशतक पूर्ण, सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीत मुंबईनं विजयाची वात पेटवली...
Mohit Ulva : फलंदाजीला मैदानात पाय ठेवला तेव्हा 8 विकेट गेलेल्या, मोहित उलवा टीम इंडियाला विजय मिळवूनच थांबला, रवींद्र जाडेजाच्या गुरुकडे प्रशिक्षण, कोण आहे मोहित उलवा?
रवींद्र जाडेजाच्या गुरुकडे प्रशिक्षण, टीम इंडियाच्या पाकवरील विजयाचा हिरो, कोण आहे मोहित उलवा?
IND vs PAK : अविश्वसनीय विजय... लेकाच्या टीमचा रोमांचक विजय, विरेंद्र सेहवागची खास पोस्ट, युवा खेळाडूंचं अभिनंदन करत म्हणाला...
अविश्वसनीय विजय... लेकाच्या टीमचा रोमांचक विजय, विरेंद्र सेहवागची अंडर 19 आशिया चषकाच्या विजेतेपदावर खास पोस्ट
Beed Georai Accident : बीडमध्ये काळजाचा थरकाप उडवणारा अपघात; कारच्या भीषण धडकेत हवाई दलातील जवानाचा मृत्यू, सख्खा भाऊ गंभीर जखमी
बीडमध्ये काळजाचा थरकाप उडवणारा अपघात; कारच्या भीषण धडकेत हवाई दलातील जवानाचा मृत्यू, सख्खा भाऊ गंभीर जखमी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 नोव्हेंबर 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 नोव्हेंबर 2026 | शनिवार
Riya Patil Gold Medal : कोल्हापूरच्या रिया पाटीलचा भोपाळमध्ये डंका, राष्ट्रीय पॅरा जलतरण स्पर्धेत दोन सुवर्णांसह रचला नवा राष्ट्रीय विक्रम
कोल्हापूरच्या रिया पाटीलचा भोपाळमध्ये डंका, राष्ट्रीय पॅरा जलतरण स्पर्धेत दोन सुवर्णांसह रचला नवा राष्ट्रीय विक्रम
Embed widget