मुंबई : शिवसेना-भाजप युतीचं घोडं अवघ्या 10 जागांमुळे अडल्याची सूत्रांची माहिती आहे. काल उशिरा रात्री मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी तब्बल साडेतीन तास चाललेल्या बैठकीत युतीच्या जागांबाबत तोडगा निघू शकलेला नाही. त्यामुळे युतीच्या घोषणेचा आजचा मुहूर्त पुन्हा एकदा टळला आहे.


या बैठकीला मुख्यमंत्र्यांसह भाजपचे महाराष्ट्र प्रभारी भुपेंद्र यादव, चंद्रकांत पाटील आणि विनोद तावडे उपस्थित होते. या चर्चेचा तपशील राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांना दिला जाईल. मात्र आता अंतिम निर्णय मुख्यमंत्री, उद्धव ठाकरे आणि अमित शाह घेतील.


पक्षांतर बंडाळी टाळण्यासाठी युतीची घोषणा लांबणीवर पडल्याचं आणखी एक प्रमुख कारण सांगितलं जात आहे. युती नाही झाली तर दोन्ही पक्षातील इच्छूक उमेदवारांना एका जागेवर संधी मिळू शकते. मात्र युती झाल्यास एका पक्षातील इच्छूक उमेदवाराला त्या जागेवर पाणी सोडावं लागेल. त्यामुळे नाराजीनाट्य, बंडखोरी किंवा पक्षांतरणामुळे भाजप-शिवसेनेच्या नेत्यांची डोकेदुखी वाढू शकते. त्यामुळे पक्षाचे एबी (AB) फॉर्म वाटप करताना वाद टाळण्यासाठी युतीच्या घोषणेची घाई नको, असा सूर वरिष्ठ पातळीवर असल्याचं कळतंय.


VIDEO |  144 जागा न दिल्यास युती तुटण्याची शक्यता, विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं शिवसेना नेते दिवाकर रावतेंची 'तोंडी परीक्षा'




केंद्रात मोदी व भाजपची वाढलेली ताकद, विरोधी पक्षातल्या बड्या नेत्यांचं झालेलं इनकमिंग आणि 2014 मधला भाजपचा महाराष्ट्रातला स्ट्राईक रेट पाहता भाजप 50-50 वर कधीच तयार होणार नाही असं दिसतंय. त्यातूनच सध्या भाजप-सेनेदरम्यान जागापाटपाचे अनेक फॉर्म्युले पुढे येतायत.


फॉर्म्युला 1


भाजप- 135


शिवसेना- 135


मित्रपक्ष- 18


----------------------------


फॉर्म्युला 2


भाजप- 171


शिवसेना- 117


मित्रपक्ष- भाजपच्या कोट्यातून


--------------------------------


फॉर्म्युला 3


भाजप- 162


शिवसेना- 126


मित्रपक्ष- भाजपच्या कोट्यातून


------------------------------------


फॉर्म्युला 4


भाजप- 150


शिवसेना-120


मित्रपक्ष- 18


-------------------------------------


फॉर्म्युला 5


भाजप- 145


शिवसेना-125


मित्रपक्ष- 18


संबंधित बातम्या