Satara ZP Election Result 2026 सातारा : सातारा जिल्हा परिषद निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे. सातारा जिल्हा परिषदेच्या 65 गटांपैकी 27 जिल्हा परिषद गटात भाजपनं  विजय मिळवला. राष्ट्रवादी काँग्रेसनं 20 जागांवर विजय मिळवला आहे. शिवसेनेनं 15 जागांवर विजय मिळवला आहे. काँग्रेसनं एका जागेवर विजय मिळवला तर इतरांनी 2 जागांवर विजय मिळवला आहे. या निकालांमुळं साताऱ्यात त्रिशंकू चित्र निर्माण झालं आहे. साताऱ्याच्या सत्तेच्या चाव्या शिवसेनेकडे गेल्या आहेत.         

साताऱ्यात राष्ट्रवादी काँग्रेस- शिवसेना सत्तेत, भाजप विरोधात?

साताऱ्यात भाजपच्या बालेकिल्ल्यातच राष्ट्रवादी शिवसेना एकत्र येऊन भाजपला विरोधात बसवणार? का असा प्रश्न निर्माण झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना एकत्र येऊन जिल्हा परिषद मध्ये सत्ता स्थापन करणार अशा चर्चांना उधाण आलं आहे.  

जिल्ह्यामध्ये भाजपला शह देण्यासाठी राष्ट्रवादी शिवसेना एकत्र येणार? का असा सवाल निर्माण झाला आहे. भाजप 27  जागेवर विजयी होऊन मोठा पक्ष असला तरी सत्तेसाठी भाजपला मित्र पक्षातल्याच पक्षांची मदत घ्यावी लागेल. राष्ट्रवादी काँग्रेसनं 20 जागांवर विजयी तर शिवसेना 15 जागांवर विजयी झाले आहेत. त्यामुळे बहुमताचा आकडा राष्ट्रवादी शिवसेनेकडे असल्याने भाजपला सत्तेपासून लांब ठेवण्यात येईल का? असा सवाल उपस्थित झाला आहे.

मंत्री शंभूराजे देसाई यांच्या घरी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या अनुषंगाने झालेली चहा पे चर्चा यशस्वी झाली आहे.चर्चेसाठी रामराजे नाईक निंबाळकर राष्ट्रवादीचे मंत्री मकरंद पाटील, खासदार नितीन काका पाटील यांसारखे मातब्बर नेतेमंडळी मंत्री शंभूराज देसाई यांच्या घरी भेटीला गेले होते.

मंत्री शंभूराज देसाई,मंत्री मकरंद पाटील, आणि राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्या निर्णयाकडे संपूर्ण साताऱ्याचे लक्ष लागलं आहे. 

महायुतीतील पक्षांमध्येच जिल्हा परिषद निवडणुकीत संघर्ष

सातारा जिल्ह्यात विधानसभा लोकसभेनंतर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये युतीतील प्रमुख तीन पक्षांमध्ये मोठी चुरस पाहायला मिळाली होती. नगरपालिका, पंचायत समिती निवडणुकीमध्ये स्वबळाचे वारे भाजपकडून वाहू लागले त्यानंतर भाजपने राष्ट्रवादी अजितदादा पक्षाचे मंत्री मकरंद पाटील यांची नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये चांगलीच कोंडी केली होती. वाई विधानसभा मतदारसंघांमध्ये भाजपने वाई नगरपालिकेवर झेंडा फडकवला आणि मंत्री मकरंद पाटील यांना शह दिला होता. त्यानंतर पंचायत समिती जिल्हा परिषदच्या निवडणुकीमध्ये शिवसेनेचे मंत्री शंभूराज देसाई यांना टार्गेट करण्यात आले होते. सातारा जिल्ह्यातील युतीमध्ये असलेल्या मित्रपक्षांमध्येच पक्ष वाढवण्याची स्पर्धा सुरू झाली  होती. एकमेकांची जिरवा जिरवी करण्याचं काम मंत्र्यांकडून सुरू झाले होते. राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या मंत्र्यांना भाजपच्या मंत्र्यांनी त्यांच्याच विधानसभा मतदारसंघांमध्ये जाऊन टार्गेट केले होते.

सातारा जिल्हा परिषद पक्षीय बलाबल:

भाजप : 27

राष्ट्रवादी काँग्रेस : 20

शिवसेना : 15

शिवसेना (ठाकरे) :00

काँग्रेस : 01

इतर: 02

सातारा जिल्हा (पंचायत समिती) एकूण 130 गण अंतिम आकडेवारी

सातारा 16

भाजप - 10 राष्ट्रवादी - 5शिवसेना - 1

जावली 6

भाजप - 3राष्ट्रवादी - 1शिवसेना-2

वाई 08

भाजप - 3राष्ट्रवादी -5

महाबळेश्वर 4

राष्ट्रवादी -2शिवसेना-2

खंडाळा 6

भाजप - 1राष्ट्रवादी -5

फलटण - 16

भाजप - 5राष्ट्रवादी-3शिवसेना-8

माण -10

भाजप - 5राष्ट्रवादी -5

खटाव -14 

भाजप - 8राष्ट्रवादी-6

कोरेगाव 12

भाजप - 1राष्ट्रवादी- 9शिवसेना- 2

कराड - 24

भाजप - 16काँग्रेस -2राष्ट्रवादी - 4राष्ट्रवादी शरद पवार-1शिवसेना-1

पाटण-14

भाजप - 1शिवसेना-13

पंचायत समिती एकूण गण 130

भाजप- 53 राष्ट्रवादी-45शिवसेना-29काँग्रेस-   02श.प. गट 01