Satara ZP Election Result 2026 सातारा : सातारा जिल्हा परिषदेच्या 65 गटांची मतमोजणी सुरु आहे. सुरुवातीच्या अपडेटनुसार साताऱ्यात भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं खातं उघडलं आहे. पाटण तालुक्यातील तारळे जिल्हा परिषद गट, महाबळेश्वर तालुक्यातील तळदेव गट, मकरंद पाटील, शशिकांत शिंदे यांच्या नेतृत्त्वात राष्ट्रवादी काँग्रेसनं साताऱ्याच्या खेड जिल्हा परिषद गटात विजय मिळवला आहे. लिंब जिल्हा परिषद गटातून भाजपचे सर्जेराव सावंत विजयी झाले आहेत.
शिवसेनेनं खातं उघडलं, शंभूराज देसाईंचं वर्चस्व कायम
तारळे जिल्हा परिषद गट आणि तारळे पंचायत समिती गण आणि मुरुड पंचायत समिती गणातून शिवसेनेचे उमेदवार विजयी झाले आहेत. तारळे जिल्हा परिषद गटातून स्वप्नाली पाटील विजयी झाल्या आहेत. तारळे पंचायत समिती गणातून सविता पवार प्रकाश जाधव विजयी झाल्या आहेत.
सातारा जिल्ह्यातील मतदारांनी 67.80 टक्के मतदान केलं आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचा कारभारी निवडण्यासाठी जिल्ह्यातील 21 लाख 94 हजार 110 मतदारांपैकी 14 लाख 87 हजार 554 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला
तळदेवमध्ये मकरंद पाटील यांना धक्का
मंत्री मकरंद पाटील यांना तळदेवमध्ये धक्का बसला आहे. महाबळेश्वर तालुक्यातील तळदेव गटात शिवसेनेचे शिंदे गटाचे उमेदवार अजित सपकाळ विजयी झाले आहेत. अजित सपकाळ हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे जवळचे कार्यकर्ते आहेत.
साताऱ्यात भाजपनं खातं उघडलं
सातारा जिल्हा परिषदेच्या लिंब गटाचा निकाल हाती आला आहे. लिंब गटातून सर्जेराव सावंत विजयी झाले आहेत. लिंब गणातून भाजपचेच प्रभाकर पवार विजयी झाले. कोंडवे गणातून महेश गाडे विजयी झाले आहेत.
खेड जिल्हा परिषद गटात राष्ट्रवादी काँग्रेसचे कामेश कांबळे विजयी झाले आहेत. त्यांनी भाजपच्या संदीप शिंदे यांचा पराभव केला आहे.
कराड तालुका - सातारा जिल्हा (चौथ्या फेरी अखेरची आकडेवारी)
उंब्रज जिल्हा परिषद गट भाजप आघाडीवर
महागाव पंचायत समिती गणात काँग्रेसचे संग्राम पवार बाराशे मतांनी आघाडीवर
उंब्रज पंचायत समिती गणात भाजप 23 मतांनी आघाडीवर
विंग जिल्हा परिषद गटात तिन्ही जागांवर भाजप उमेदवार आघाडीवर
कार्वे जिल्हा परिषद गटातील ठिकाणी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमेदवार आघाडीवर
काले जिल्हा परिषद गटातील कालवडे गणात राष्ट्रवादी अजित पवार गट आघाडीवर तर अन्य दोन जागांवर भाजप उमेदवार आघाडीवर
रेठरे बुद्रुक जिल्हा परिषद गटात किती ठिकाणी भाजप आघाडीवर
वारुंजी जिल्हा परिषद गटात काँग्रेसच्या उमेदवार सुनंदा पाटील आघाडीवर
कराड पंचायत समिती वारूंजी गणात पाचशे मताने काँग्रेस उमेदवार 500 मतांनी आघाडी तर कोयना वसाहत गणात काँग्रेस उमेदवार आघाडीवर
तांबवे जिल्हा परिषद गटात आणि सुपने भाजप आघाडीवर तांबवे गणात शिवसेना उमेदवार
कोपर्डे हवेली जिल्हा परिषद गटात तिन्ही अपक्ष उमेदवारांनी घेतली आघाडी
