Satara ZP Election Winner List 2026: सातारा जिल्हा परिषद निवडणूक निकाल, विजयी उमेदवारांची यादी, सातारा जिल्हा परिषद त्रिशंकू
Satara ZP Election Winner List 2026: सातारा जिल्हा परिषदेच्या 65 गटांचा निकाल जाहीर झाला आहे. यामध्ये भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला आहे.

Satara ZP Election Winner List 2026 सातारा : सातारा जिल्ह्याचं मिनी मंत्रालय असलेल्या सातारा जिल्हा परिषदेवर कोण बाजी मारणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. सातारा जिल्ह्यातील मतदारांनी 67.80 टक्के मतदान केलं आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचा कारभारी निवडण्यासाठी जिल्ह्यातील 21 लाख 94 हजार 110 मतदारांपैकी 14 लाख 87 हजार 554 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला.
सातारा जिल्हा परिषदेसाठी यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध काँग्रेस अशी लढत व्हायची. 2012 आणि 2017 ला राष्ट्रवादी काँग्रेसनं विजय मिळवला होता. यावेळी भाजपनं ताकदीनं निवडणूक लढवली आहे. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊन सातारा जिल्हा परिषद निवडणूक लढल्या. अजित पवार यांच्या अपघाती निधनामुळं प्रचार साधेपणानं पार पडल्याचं पाहायला मिळालं. सातारा जिल्ह्यात भाजप सर्वात मोठा पक्ष ठरलाय. सातारा जिल्हा परिषदेचा निकाल त्रिशंकू लागला आहे.
सातारा जिल्हा परिषद पक्षीय बलाबल:
भाजप : 27
राष्ट्रवादी काँग्रेस : 20
शिवसेना : 15
शिवसेना (ठाकरे) :00
काँग्रेस : 01
इतर: 02
Satara ZP Election Winner List 2026: सातारा जिल्हा परिषद गटनिहाय निवडणूक विजयी उमेदवार यादी
सातारा तालुका
पाटखळ: शुभांगी जाधव (राष्ट्रवादी काँग्रेस )
लिंब: सर्जेराव सावंत (भाजप)
खेड: कामेश कांबळे (राष्ट्रवादी काँग्रेस)
कोडोली(ओबीसी महिला): निता खरात (भाजप )
कारी : राजू भोसले (भाजप)
शेंद्रे: पूजा मोरे (भाजप)
वर्णे: राजेंद्र शेळके (स्वाभिमानी शेतकरी संघटना)राष्ट्रवादी पाठिंबा
नागठाणे: अजित साळुंखे (भाजप)
कराड तालुका
पाल:माधवराव काळभोर (भाजप)
उंब्रज:रणजीत जाधव (भाजप)
मसूर:लालासो जगदाळे (भाजप)
कोपर्डे हवेली: विद्या रामकृष्ण वेताळ (अपक्ष)
सैदापूर : सागर शिवदास (भाजप)
तांबवे: धनंजय ताटे (भाजप)
विंग(ओबीसी महिला) :शैलजा शिंदे (भाजप)
कार्वे: विजया थोरात (राष्ट्रवादी काँग्रेस)
रेठरे बुद्रुक: प्रियांका साळुंखे (भाजप)
काले (ओबीसी महिला) : मनीषा पाटील (भाजप)
येळगाव : उदयसिंह पाटील (राष्ट्रवादी काँग्रेस )
वारुंजी : सुनंदा पाटील (काँग्रेस)
पाटण तालुका
गोकुळ तर्फ हेळवाक:अशोक पाटील ( शिवसेना)
तारळे: स्वप्ना अभिजीत पाटील (शिवसेना)
म्हावशी:राजेश पवार (भाजप)
मल्हार पेठ(ओबीसी महिला) :विजया कुंभार (शिवसेना)
मारुल हवेली (ओबीसी महिला): योगिता गिरी (शिवसेना)
मंद्रुळकोळे: मृणाल पाटील (शिवसेना)
काळगाव: सुनीता चाळके (शिवसेना )
कोरेगांव तालुका
पिंपोडे बुद्रुक :अमित चव्हाण (भाजप)
वाठार स्टेशन(ओबीसी महिला) :जयश्री भोसले (राष्ट्रवादी काँग्रेस)
सातारा रोड : सारिका फाळके (शिवसेना)
कुमठे : हणमंत जगदाळे (शिवसेना)
एकंबे :राजश्री भोसले (राष्ट्रवादी काँग्रेस)
वाठार किरोली :संध्या रजनी भोसले पाटील (राष्ट्रवादी काँग्रेस)
जावळी तालुका
म्हसवे: वसंतराव मानकुमरे (भाजप)
कुडाळ (ओबीसी महिला): जयश्री गिरी (भाजप)
कुसुंबी: कविता ओंबळे (शिवसेना)
वाई तालुका
यशवंतनगर : दिनकर शिंदे (राष्ट्रवादी काँग्रेस)
बावधन : ऋतुजा शिंदे (राष्ट्रवादी काँग्रेस)
ओझर्डे : वृषाली चव्हाण (राष्ट्रवादी काँग्रेस)
भुईंज: दिलीप बाबर (भाजप)
खंडाळा तालुका
शिरवळ : उदय कबुले (राष्ट्रवादी काँग्रेस)
भादे : संतोष साळुंखे (राष्ट्रवादी काँग्रेस )
खेड बुद्रुक : ऋषिकेश धायगुडे (भाजप)
फलटण तालुका
तरडगाव :गिरीश बनकर (शिवसेना)
साखरवाडी पिंपळवाडी : रुपाली सरगर (शिवसेना)
विडणी : ज्योती गौतम मोरे (शिवसेना)
गुणवरे :ऋतुजा अभिजीत जगताप (राष्ट्रवादी काँग्रेस)
बरड :वैशाली संदीप कांबळे (शिवसेना)
कोळकी : सह्यादी कदम (शिवसेना)
वाठार निंबाळकर : विष्णू किसन लोखंडे (भाजप)
हिंगणगाव :किरण निलेश नलवडे (भाजप)
खटाव तालुका
बुध: लता कर्णे (राष्ट्रवादी काँग्रेस)
कातर खटाव: धनंजय जाधव (भाजप)
खटाव: डॉ. प्रिया शिंदे (भाजप)
निमसोड: संदीप मांडवे (राष्ट्रवादी काँग्रेस)
औंध(ओबीसी महिला) : मनिषा फडतरे (राष्ट्रवादी काँग्रेस)
पुसेसावळी: तेजस्विनी कदम (भाजप)
मायणी: सुरज पाटील (भाजप)
माण
आंधळी: सोनल गोरे (भाजप)
बिदाल :अलका जगदाळे (भाजप)
मार्डी:सोनाली पोळ (राष्ट्रवादी काँग्रेस)
गोंदवले बुद्रुक :शीतल रणपिसे (राष्ट्रवादी काँग्रेस)
कुकुडवाड : अनिल देसाई (राष्ट्रवादी काँग्रेस)
महाबळेश्वर
तळदेव जिल्हा परिषद गट : अजित सपकाळ (शिवसेना)
भिलार जिल्हा परिषद गट : संजय केळगणे (राष्ट्रवादी काँग्रेस)
महाबळेश्वर तालुका पंचायत समिती गण
तळदेव पंचायत समिती गण : संजय शेलार (शिवसेना)
वाडा कुंभरोशी पंचायत समिती गण : संजय मोरे (शिवसेना)
भिलार जिल्हा परिषद गट : संजय केळगणे राष्ट्रवादी काँग्रेस
मेटगुताड पंचायत समिती गण : शकुंचला चोरमले राष्ट्रवादी काँग्रेस
सातारा तालुका पंचायत समिती निकाल :
पाटखळ पंचायत समिती गण : राहुल शिंदे (भाजप)
शिवथर पंचायत समिती गण : राजेश पवार (राष्ट्रवादी काँग्रेस)
लिंब गट जिल्हा परिषद गट : सर्जेराव सावंत (भाजप)
लिंब पंचायत समिती गण : प्रभाकर पवार (भाजप)
कोंडवे पंचायत समिती गण : महेश गाडे (भाजप)
खेड जिल्हा परिषद गट : कामेश कांबळे (राष्ट्रवादी काँग्रेस)
खेड पंचायत समिती गण : कोमल अजित गायकवाड (राष्ट्रवादी काँग्रेस)
क्षेत्र माहुली पंचायत समिती गण : राणी अजय पवार (राष्ट्रवादी काँग्रेस
कोडोली पंचायत समिती गण : राहुल कापले (राष्ट्रवादी काँग्रेस)
संभाजीनगर पंचायत समिती गण : विजया साळुंखे ( भाजप)
परळी पंचायत समिती गण : वसंतराव भंडारे (भाजप)





















