Sanjay Shirsat On BJP : भाजपच्या आयडोलॉजिचा फटका पडला नाही. काही गणितं चुकली, सर्व्हे नावाचं भूत जे डोक्यात गेलेलं ते आता निघेल. एका मतदारसंघात 12 सर्व्हे याने होतं नाही. नागरिकांची मतं ही महत्वाची आहेत. आम्हाला ओव्हर कॉन्फिडन्स नडला, असे शिवसेना आमदार संजय शिरसाट म्हणाले.
भाजपच्या दबावतंत्राला बळी पडणार नाही. ही निवडणूक सामंजस्यातून लढवली गेली. आता त्यांना दोन्ही पक्षाचं ऐकावं लागेल. झाल ते गेलं यापुढे सर्वांच्या संमत्तीने उमेदवार दिले, प्रयत्न केले तर सरकार यायला काही अडचण नाही, असेही शिरसाट म्हणाले. मोदींच्या नावावर किंव चेहरयामुळे खालची नेते मंडळी सुस्थावली गेली. काही लोकांची वक्तव्यही अतिउत्साही होती. सरकार आने वाली हे बोलो कुच्छबी... असं चालणार नाही. तुम्ही बोलता हे लोकं एकत असते त्यानुसार ते मत बनवतं असतात, लोकांची मत मतपेटीपर्यंत न्यायची असतील तर त्यांच्यात जावं लागेल. वादग्रस्त वकतव्याबाबत नेत्यांनी सावधगिरी बाळगली पाहिजे, असे संजय शिरसाट म्हणाले.
गणित चुकलं त्याचा फटका बसला
लोकसभेला झालेल्या चुका या विधानसभेला होणार नाहीत, विधानसभेला उमेदवारही लवकर जाहिर होईल, यादीही लवकर जाहिर केली जाईल, असेही ते म्हणाले. आमच्यावर तसा दबाव नव्हता मात्र केंद्रात सत्ता हवी भाजप एक पाऊल पुढे आहे. मोदींना पंतप्रधान बनवायचं आहे. त्यांची आयडोलॉजी वापरली तर फायदा होईल. म्हणून त्यांच्या मर्जीनुसार आमचा कल त्यांच्याकडे झुकला. मात्र त्याचं गणित चुकलं त्याचा फटका बसला. मात्र ते मान्यही त्यांनी केलं, असेही शिरसाट यांनी सांगितले.
10 तारखेनंतर अनेकांचा पक्षप्रवेश -
आम्ही लोकसभेच्या गडबडीत असल्यामुळे आम्ही काही प्रवेश थांबवले आहेत. या 10 तारखेनंतर अधिवेशनापूर्वी आम्ही काही महत्वाचे प्रवेश करणार आहोत. आम्ही अर्थहिन विधानं करणार नाही, प्रॅक्टीकली करून दाखवू, असे संजय शिरसाट म्हणाले.
संजय राऊतांवर हल्लाबोल -
संजय राऊत यांना सरकार पढायला फार वेळ आहे. आमच्या उठावानंतर ते अनेक तारखा देत होते. आता बंद झालं बोलणं, जे आहे ते पाडू शकले नाहीत. दिल्लीत यांना मोजतयं कोण ? असा टोला संजय शिरसाट यांनी लगावला.
आमदार फूटू नयेतस म्हणून संजय राऊतांनी असा दावा केलाय. त्यामुळे तुम्ही जाऊ नका तेच आपल्याकडे येत आहेत.असं उलटं गणित मांडण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे. या अनुशंगाने ते वक्तव्य केलं आहे. परंतु त्यांच्यामुळे पक्षाचा सत्यानाश केला आहे, असे शिरसाट म्हणाले.
संजय राऊतांची विधान पाहिलीत तर ते NDA तं सामिल तर होणार नाही ना? असा प्रश्न उपस्थित होतं आहे. उद्धव ठाकरे NDA तं का येऊ शकत नाहीत, ते जर काँग्रेस राष्ट्रवादीसोबत जाऊ शकतात तर आमच्यासोबत का येऊ शकत नाहीत. NDA तर त्यांचा घरचाच पक्ष होता. संजय राऊत सारखे चमचे जेव्ह पक्षातून बाहेर पडतील तेव्ह त्या पक्षाचं सर्व चांगलं होईल, असे शिरसाट म्हणाले.