Sanjay Raut on Devendra Fadnavis: राज्यातील सर्वाधिक हायव्होल्टेज लढत मुंबई महानगरपालिकेसाठी होत आहे. या महानगरपालिकेसाठी दुबार मतदारांचा बंदोबस्त करण्यासाठी शिवसेना ठाकरे गट आणि मनसेकडून प्रत्येक बुथसमो भगवा गार्ड नेमण्यात आला आहे. या भगवा गार्डवरून भाजपने टीका केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठेचून काढू असा इशारा दिला. यानंतर आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सुद्धा जोरदार प्रत्युत्तर देत गर्भित इशारा दिला आहे. राऊत यांनी ट्विट करत म्हटलं आहे की, दुबार किंवा बोगस मतदार पकडण्याचा प्रयत्न कोणी करत असेल तर त्याना ठेचून काढू असे फडणवीस यांनी म्हटले आहे, शिवसेना मनसेच्या भगवा गार्डवर त्यांचा रोख दिसतोय. मुख्यमंत्री साहेब, हरामच्या पैसा वाटपावरून सध्या “शहा सेनेचे” लोक भाजपच्या लोकांना ठेचताना दिसत आहेत,त्याकडे लक्ष द्या! आम्ही मुंबई आणि मराठी रक्षणासाठी रस्त्यावर आहोत, तूर्त इतकेच! जय महाराष्ट्र! असं म्हटलं आहे.
सीएम फडणवीस काय म्हणाले?
भगवा गार्डवरून फडणवीस म्हणाले की, जी कुठली ब्रिगेड त्यांनी तयार केली आहे ती काही बूथसमोर दिसत नाही. मालवणीला वगैरे दिसली नाही, असे काही अनेक बूथ आहेत ज्या ठिकाणी ती दिसत नाही ही सिलेक्टिव्ह आहे का? सिलेक्टिव्ह दहशत निर्माण करायची आता यांची क्षमताच राहिली नाही. कोणी केलं तर पोलीस ठोकून काढतील, मुंबईत दहशत खपून घेतली जाणार नाही. फडणवीस म्हणाले की, दुबार मतदार म्हणता, दुबार मतदाराचा काय माहिती आहे त्यांना? दुबार मतदार शोधण्याचं काम इलेक्शन कमिशन करेल.तुमचा जो एजंट आत बसला आहे तो एजंट बघेल. त्यांनी ऑब्जेक्शन घेतलं पाहिजे, कोणी दुबार मतदार घेतला तर आम्ही ऑब्जेक्शन घेऊ पण आम्ही मारामारी करू म्हणजे मतदान कमी झालं पाहिजे यासाठी प्रयत्न आहे.
इतर महत्वाच्या बातम्या