Sanjay Raut on Kripashankar Singh: भाजप नेते आणि माजी मंत्री कृपाशंकर सिंह मुंबईचा महापौर उत्तर भारतीय करण्यासाठी जिद्दीला पेटले आहेत. मीरा-भाईंदरमधील उत्तर भारतीय समुदायाच्या एका कार्यक्रमात कृपाशंकर सिंह यांनी म्हटले होते की, इतक्या मोठ्या संख्येने उत्तर भारतीय नगरसेवक निवडून येतील की एक उत्तर भारतीय महानगरपालिकेचा महापौर होईल. यानंतर ठाकरेंची शिवसेना, मनसेनं भाजपवर जोरदार हल्ला चढवला आहे. आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी कृपाशंकर सिंह यांचा व्हिडिओ शेअर करत हल्लाबोल केला आहे.
भाजपचं ठरलं मुंबईचा महापौर उपराच!
संजय राऊत यांनी ट्विट करत म्हटलं आहे की, भाजपचं ठरलं मुंबईचा महापौर उपराच! मराठी माणसा…जागा हो! तत्पूर्वी त्यांनी पत्रकार परिषदेतही राऊत यांनी भाजपवर सडकून प्रहार केला. ते म्हणाले की, मुंबईमध्ये मराठी महापौर होऊ द्यायचा नाही हा भाजपचा अजेंडा आहे. त्यांनी असाही घणाघात केला की, मुंबई किंवा अन्यत्र मराठी महापौर होऊ द्यायचा नाही हा भाजपचा अजेंडा आहे. भारतीय जनता पक्षाचे हे कारस्थान आहे. कृपाशंकर सिंह यांच वक्तव्य आणि वातावरण निर्मितीवर ते म्हणाले की, वातावरण निर्माण करण्यासाठी भाजपने कृपाशंकर सिंह यांची नेमणूक केली आहे. कृपाशंकर सिंह यांचा उल्लेख करताना म्हटले आहे की, कृपाशंकर सिंह भाजपचा बोलका पोपट आहे. भाजपच्या कार्यपद्धतीबद्दल बोलताना ते म्हणाले की, ते आधी वातावरण निर्मिती करतात चाचपडून पाहतात.
मराठी माणसाच्या डोक्यात दगड घालायचा ठरवलंय
राऊत यांनी आरोप केला की भाजपने मुंबईमध्ये मराठी माणसाच्या डोक्यात दगड घालायचा ठरवलं आहे. ते म्हणाले की, भाजपला मुंबई महापालिका जिंकण्यासाठी बाहेरचे लोक लागतात. ते म्हणाले की, भाजप आणि शिंदेगट यांसारखे पक्ष डुप्लिकेट पक्ष आहेत. भाजपला मुंबईची निवडणूक किंवा इतर महानगरपालिकांची निवडणूक जिंकण्यासाठी सुद्धा बाहेरचे लोक लागतात. एबी फॉर्म गिळण्यावरून ते म्हणाले की, यांचे नेते पैसे गिळतात, एकानं एबी फॉर्म गिळला. अशा अनेक गमती जमती यापुढे आपल्याला पाहायला मिळणार आहेत, असा टोलाही त्यांनी लगावला.
इतर महत्वाच्या बातम्या