मुंबई : राज्यात आमचे सरकार आले तर आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचं (Chhatrapati Shivaji Maharaj) मंदिर उभारू, ही आमची भूमिका आहे. मात्र देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी या संकल्पनेची चेष्टा केलीय.  देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा छत्रपती शिवरायांचा अपमान केला. यावेळी बोलताना त्यांनी छत्रपती शिवरायांचा पुतळा आधी मुंब्र्यात उभारा, असे सांगण्यात आले. त्यांना मी सांगू इच्छितो की, आम्ही मुंबईतच नाही तर पाकिस्तानात छत्रपती शिवरायांचे मंदिर उभारू. किंबहुना मुंब्राच्या प्रवेशद्वारावर छत्रपती शिवरायांचा भला मोठा पुतळा आहे, हे देवेंद्र फडणवीस यांना ठाऊक आहे का?
 
तुम्ही या देशातील मुसलमानांना बदनाम करत आहात. बटेंगे तो कटेंगे असे सांगत फिरत आहात. मात्र तुमचे हे धोरण येथे चालत नाही. तुम्ही शिवरायांचा गैरवापर करत आहात. देवेंद्र फडणवीस तुमचे पूर्वज मोगलांची चाकरी करत होते आणि महाराष्ट्राशी गद्दारी करत होते. त्यामुळे ही फडणवीसी  महाराष्ट्रात दाखवू नका, अशी घणाघाती टीका शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर केली आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांना शहरी नक्षलवादाने घेरले आहे, अशी टीका राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. त्यांच्या या टीकेला प्रत्युत्तर देत राऊत यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे.


सरकारचा स्वाभिमान दिल्ली दरबारी गहाण- संजय राऊत 


राज्यात आमचे सरकार आले तर आम्ही शिवाजी महाराजांचं मंदिर उभारू, आमच्यासाठी हा मुद्दा अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण या राजवटीमध्ये ज्या पद्धतीने छत्रपती शिवरायांचा अपमान झाला. सिंधुदुर्गात महाराजांचा पुतळा भ्रष्टाचारामुळे तुटून पडला. छत्रपती शिवाजी महाराजांचा स्वाभिमान देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवारांनी दिल्ली दरबारी गहाण ठेवला आहे. म्हणून ते वारंवार दिल्लीला जाऊन झुकत आहेत. त्यासाठी छत्रपतींचे मंदिर आम्ही प्रत्येक जिल्ह्यात उभारू, असे उद्धव ठाकरे सांगत आहे आणि त्यावर लोक प्रतिसाद देत आहे. मात्र यामुळे विरोधकांच्या पोटात दुखणे हे स्वाभाविक आहे. असेही संजय राऊत म्हणाले. 


शरद पवार दिल्लीच्या राजकरणामुळे व्यथित- संजय राऊत


शरद पवार हे संसदीय राजकारणातले भीष्म पितामह आहेत. गेल्या 60 वर्षापासून ते राजकारणात कार्यरत आहेत. विधानसभा, लोकसभा, राज्यसभा अश्या सर्व ठिकाणी ते काम करत आहेत. मात्र गेल्या काही काळापासून त्यांच्या मनात निवृत्तीबाबत विचार येत आहेत. माझ्याकडे देखील त्यांनी हा विचार बोलून दाखवला होता. आम्ही त्यांना सांगितले की हा विचार देखील मनात आणू नका, वय नाही अनुभव हा विषय आहे. पवार साहेबांच्या प्रदीर्घ अनुभव आहे, त्याचा फायदा समाजाला आणि नवी येणाऱ्या लोकांना होत असतो. मात्र ते व्यातिथ आहेत, जे राजकारण दिल्लीच्या लोकांनी केले आहे, त्यामुळे ते व्यथित  आहेत. असे मतही संजय राऊत यांनी बोलताना व्यक्त केले आहे.


हे ही वाचा