रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली मंडणगड विधानसभा निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे उमेदवार संजय कदम आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार योगेश कदम यांच्यात लढत होत आहे. ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार संजय कदम  यांनी योगेश कदम परभावाच्या भीतीनं वैफल्यग्रस्त झाल्याचा टोला लगावला.  दापोली मंडणगड मतदारसंघातून 40 ते 50 हजार मतांनी विजयी होणार असल्याचा विश्वास देखील संजय कदम यांनी व्यक्त केला आहे.    


महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजल्यानंतर राजकारण देखील तापू लागले आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार संजय कदम यांना पक्षाने एबी फॉर्म दिला नाही, कदाचित उमेदवार बदलू शकतो असं वक्तव्य शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार  योगेश कदम यांनी प्रसारमाध्यमांसमोर केलं होतं. योगेश कदम यांच्या त्या वक्तव्याचा चांगलाच समाचार महाविकास आघाडीचे उमेदवार संजय कदम यांनी घेतला आहे. योगेश कदम आणि रामदास कदम यांना पराभवाची भीती निर्माण झाल्यामुळे ते वैफल्यग्रस्त झाले आहेत, जनतेमध्ये गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे,असं संजय कदम म्हणाले. 


योगेश कदम यांना त्यांचा पराभव दिसू लागल्यामुळे पैशांचे वाटप साड्या वाटप असे प्रकार सुरू केले आहेत. त्यातूनही विजयाची खात्री नसल्यामुळे  आता प्रतिस्पर्धी उमेदवाराबाबत गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न त्यांनी सुरू केला आहे. दापोली विधानसभा मतदार संघातून आपला विजय निश्चित असून 40 ते 50 हजाराच्या मताधिक्याने आपण निवडून येऊ  असा विश्वास, महाविकास आघाडीचे उमेदवार संजय कदम यांनी व्यक्त केला आहे.


दापोलीत माझ्याशिवाय दुसरा उमेदवार महाविकास आघाडीनं दिलेला नाही. दापोली मतदारसंघाचा आमदार  म्हणून विधानसभेत मी जाणार असल्याचं संजय कदम म्हणाले. योगेश कदम आणि रामदास कदम यांनी कितीही गैरसमज पसरवला तरी उपयोग होणार नाही. पराभव दिसू लागल्यानं विरोधकांकडून बेताल वक्तव्य केलं जात आहे. मतदारांनी मोठ्या संख्येनं महाविकास आघाडीच्या उमेदवाराला विजयी करावं, असं संजय कदम यांनी म्हटलं. 


दापोलीत दोन्ही शिवसेनेत लढत


दापोली विधानसभा मतदारसंघात शिवसेनेकडून योगेश कदम तर ठाकरेंच्या शिवसेनेकडून संजय कदम रिंगणात आहेत. संजय कदम यांनी योगेश कदम यांनी जून 2022 मध्ये एकनाथ शिंदेंसोबत जाण्याचा निर्णय घेतल्यानंतर  उद्धव ठाकरे यांच्या पक्षात प्रवेश केला होता. तेव्हाच संजय कदम यांची उमेदवारी निश्चित झाली होती. 


इतर बातम्या : 


Patan Assembly Election : पाटणमधून निवडणूक लढण्याचं कारण सांगितलं, अपक्ष अर्ज दाखल केल्यानंतर सत्यजितसिंह पाटणकर म्हणाले...