Sangli Municipal Corporation election results :  राज्यातील 29 महापालिका निवडणुकांच्या निकालाचे अंतिम कल हाती आले आहेत. बहुतांश जिल्ह्यात भाजप पुन्हा एकदा मोठा पक्ष ठरल्याचे दिसून आलं आहे. अशातच देशभऱ चर्चेत राहिलेल्या मुंबईत महानगरपालिकेत ठाकरे बंधूना धक्का देत भाजपने जोरदार आघाडी घेतली आहे. मुंबई महापालिकेत भाजप आणि शिवसेना युतीचा महापौर होणार हे जवळपस निश्चित झालं आहे. दरम्यान, सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेत देखील भाजपने जोरदार मुसंडी मारली आहे. सांगलीत भाजपने 39 जागांवर विजय मिळवला आहे. तर काँग्रेसला 18 जागा मिळाल्या आहेत. भाजपला सांगली महापालिकेत सत्ता स्थापन करण्यासाठी केवळ एका जागेची गरज आहे. सांगली महापालिकेत सत्ता स्थापन करण्यासाठी 40 हा बहुमताचा आकडा आहे.

सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेत कोणत्या पक्षाला किती जागा?

भाजप - 39 

शिंदे शिवसेना - 2

 काँग्रेस - 18 

अजित पवार राष्ट्रवादी - 16

शरद पवार राष्ट्रवादी  - 3 

शिंदेंची शिवसेना किंग मेकरच्या भूमिकेत

सांगली महापालिकेत सत्तेसाठी 40 आकड्यांची गरज आहे. भाजपला सत्ता स्थापनेसाठी एका जागेची आवश्यकता आहे. भाजप एका जागेसाठी कुणाची मदत घेणार याकडे सर्वाचं लक्ष लागलं आहे. भाजप एका जागेसाठी प्रामुख्याने एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षाची मदत घेण्याची शक्यता आहे. कारण दोन्ही पक्षातील नेत्यांमध्ये प्राथमिक पातळीवर चर्चा सुरु असल्याची माहिती मिळत आहे. सांगलीतील महानगरपालिकेचा महापौर कोणाचा होणार याकडे सर्व सांगलीचे लक्ष लागलं आहे. काँग्रेस, अजितदादा राष्ट्रवादी, शरद पवार राष्ट्रवादी यांना सत्ता स्थापन करण्यासाठी 1 जागेची आवश्यकता आहे. सांगली महानगरपालिकेत भाजपला 39 जागेवर यश मिळवलं मात्र सत्ता स्थापन करण्यासाठी एक जागेची आवश्यकता आहे. यामध्ये शिंदेंची शिवसेना किंग मेकर च्या भूमिकेत आहे. सांगलीमध्ये पहिल्यांदाच शिवसेनेचा झेंडा फडकला आहे. शिवसेनेच्या 2 उमेदवारांना विश्वासात घेतल्याशिवाय सांगलीतील महापौर आणि सत्ता स्थापन करता येणार नाही. 

राज्यातील 29 महापालिका निवडणुकीचे निकाल आता जवळपास स्पष्ट झाले आहेत. राज्यात भाजपनं जोरदार मुसंडी मारली आहे.  मुंबई, पुण्यासह अनेक महत्त्वाच्या माहापालिकांमध्ये भाजपला दणदणीत यश मिळताना दिसून येत आहे. मुंबईमध्ये भाजपनं शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का दिला आहे. तर पुण्यामध्ये दोन्ही राष्ट्रवादी अजित पवार गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाला हादरा देत भाजपनं स्पष्ट बहुमताकडे वाटचाल सुरू केली आहे.

महत्वाच्या बातम्या:

अंबादास अखेरचे पाच दिवस कुठे होता? स्वतःच प्लॅन करायचा, आम्हाला काहीच करुन देत नव्हता, चंद्रकांत खैरेंचा निशाणा