Sada Sarvankar On Amit Thackeray मुंबई: मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांचे पुत्र अमित ठाकरे (Amit Thackeray) माहीम विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढणार आहे. त्यामुळे सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात अमित ठाकरेंची चांगलीच चर्चा रंगली आहे. माहीम विधानसभेतून मनसेकडून अमित ठाकरे, शिवसेना शिंदे गटाकडून विद्यामान आमदार सदा सरवणकर, शिवसेना ठाकरे गटाकडून महेश सावंत यांच्यात लढत होणार आहे. अमित ठाकरे रिंगणात उतरल्याने महायुतीमधील अनेक नेत्यांनी अमित ठाकरेंना पाठिंबा देण्याबाबत भूमिका मांडली आहे. मात्र, सदा सरवणकर (Sada Sarvankar) यांनी कोणत्याही परिस्थितीत निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेण्यास नकार दिला आहे. सदा सरवणकर यांनी 'एबीपी माझा'ला मुलाखत दिली. यावेळी सदा सरवणकर यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. 


सदा सरवणकर (Sada Sarvankar) म्हणाले की, मी उद्या सकाळी 10 वाजता उमेदवारीचा अर्ज भरणार आहे. त्यामुळे माझी भूमिका स्पष्ट आहे. माहीमधील जनतेला न्याय देणं ही आजच्या काळाची गरज आहे. मी उमेदवारी अर्ज भरणार आणि विजयी देखील होणार, असा विश्वास सदा सरवणकर यांनी व्यक्त केला. आम्ही 365 दिवस या मतदारसंघात काम करतो.   मी तीन वेळा नगरसेवक, तीन वेळा आमदार म्हणून निवडणून आलो आहे.एकनाथ शिंदेंनी आर्शिवाद दिले आहेत. एकनाथ शिंदे आणि माझी भेट नियमीत भेट होती. मला राज ठाकरेंना फोन आलेला नाही, अशी माहिती देखील सदा सरवणकर यांनी दिली. आशिष शेलार आणि दीपक केसरकर  यांनी जे मत व्यक्त केलं ते त्याचं वैयक्तिक मत आहे, असंही सदा सरवणकर यांनी म्हटलं आहे. 


अमित ठाकरेंनी निवडणूक लढवण्याचा निर्णय दिल्लीतून- संजय राऊत


ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी अमित ठाकरेंच्या उमेदवारीवरुन एक खळबळजनक दावा केला आहे. अमित ठाकरेंनी निवडणूक लढवण्याचा निर्णय दिल्लीतून झाला, अशी माझ्याकडे माहिती आहे. शिंदे गटाने कुठे लढावं, कुठे लढू नये, हा निर्णय गृहमंत्री अमित शाह घेतात,  दिल्लीतून घेतले जातात. त्यामुळे जे सर्व निर्णय दिल्लीतून घेतले जातात. जो पक्ष अमित शाह यांचा गुलाम आहे.  पक्षाने स्वाभिमानाच्या गोष्टी करु नये, अशी टीका संजय राऊतांनी केली. संजय राऊतांच्या या दाव्यानंतर अमित ठाकरे नेमकी कोणती प्रतिक्रिया देणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.


राज ठाकरेंवर सदा सरवणकर काय म्हणाले?, Video: