Sada Sarvankar on Amit Thackeray :  माहीम विधानसभा मतदारसंघ (Mahim Assembly constituency) सध्या चांगलाच चर्चेत आला आहे. माहीम विधानसभा मतदारसंघातून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्यांचे पुत्र अमित ठाकरे यांना उमेदवार दिली आहे. तर दुसरीकडे शिंदेंच्या शिवसेनेने विद्यमान सदा सरवणकर (Sada Sarvankar ) यांना पुन्हा एकदा मैदानात उतरवलं आहे. याशिवाय ठाकरेंच्या शिवसेनेने महेश सावंत यांना संधी दिली आहे. दरम्यान, राज ठाकरेंचे पुत्र पहिल्यांदा निवडणुकीच्या मैदानात उतरल्यानंतर महायुतीमधील काही नेत्यांचा त्यांना पाठिंबा देण्याचा सूर आहे. दरम्यान, सदा सरवणकर यांनी या संदर्भात पहिली प्रतिक्रिया दिली आहे. ते एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते. 


सदा सरवणकर काय काय म्हणाले? 


सदा सरवणकर म्हणाले, आशिष शेलार आणि राज साहेबांची एक चांगली मैत्री आहे. आता मैत्रीसाठी त्यांनी जर काहीतरी स्वतंत्र बोलले असतील तर तो त्यांचा भाग आहे. मी सोमवारी जाऊन अर्ज भरणार आहे.  केसरकर साहेब मी कधीकधी भेटत असतो. 


महायुतीचा उमेदवार म्हणून आमचा मेळावाही झालाय


एकनाथ शिंदेवर माझा विश्वास आहे. त्यांनी एबी फॉर्म दिलाय. आशिष शेलार आणि राज ठाकरेंची चांगली मैत्री आहे. महायुतीचा उमेदवार म्हणून आमचा मेळावाही झालाय. निवडणूक अर्ज भरू नका म्हणून माझ्यासाठी एकही फोन नाही. मला कोणाचीही अद्याप विनंती नाही, असंही सदा सरवणकर यांनी स्पष्ट केलं. 


राज ठाकरेंचीही मित्र आहेत, मात्र युतीधर्म आहे


पुढे बोलताना सदा सरवणकर म्हणाले, मी लढणारा शिवसैनिक आहे. मी मागच्या दरवाज्याने येणार नाही. मी लढणारा कार्यकर्ता आहे. मला मागच्या दरवाजाने येणार नाही. माझ्यावर कोणताच प्रेशर नाही. मी लोकांना सहज भेटणारा लोकप्रतिनिधी आहे. मी 30 वर्ष केलेलं काम हे विजयी करण्यासाठी भरपूर आहे. माझ्या विभागात शिवसेना मोठी झाली पाहिजे. मी जनतेचा आशिर्वाद घेणार आहे. शेलार माझे चांगले मित्र आहेत, राज ठाकरेंचीही मित्र आहेत. मात्र युतीधर्म आहे. आम्ही एकनाथ शिंदे यांच्यावर पुर्ण विश्वास टाकलाय. ते नक्की विचार करतील. संघर्षातून आम्ही शिवसेना उभी केली आहे. मी निवडणूक लढवणार आणि माघार घेणार नाही. 




इतर महत्त्वाच्या बातम्या 


Sanjay Raut on Amit Thackeray : अमित ठाकरेंना पाठिंबा देण्याबाबत संजय राऊत यांचं मोठं वक्तव्य; माहीममध्ये मोठा ट्वीस्ट येण्याची शक्यता