Mohan Bhagwat On Voting : लोकशाहीच्या रचनेमध्ये मतदान महत्त्वाची बाब आहे, ते सर्व नागरिकांच कर्तव्यही आहे. आपल्याला जो योग्य वाटतो, त्या उमेदवाराला मत देणे हे महत्त्वाचे आहे. मतदानाच्या दिवशी हे सर्वांचे पहिले कर्तव्य आहे, म्हणून मी पहिले येऊन मतदान केले. जनहिताचा विचार करून मतदान केलं पाहिजे. अशी प्रतिक्रिया सरसंघचालक मोहन भागवत (Mohan Bhagwat) यांनी दिली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंचालक डॉ.मोहन भागवत यांनी सकाळच्या पहिल्या सत्रात नागपूरच्या (Nagpur News) महाल परिसरात भाऊजी दप्तरी शाळा (नाईट हाय स्कूल) येथे मतदान केल आहे. सरसंघचालक मोहन भागवत प्रभाग 22 चे मतदार आहेत. मोहन भागवत यांच्यासोबत प्रभाग 22 चे भाजप उमेदवार श्रीकांत आगलावे हे देखील उपस्थित होते. श्रीकांत आगलावे हे स्वतः संघाचे स्वयंसेवक असून भाजपकडून यंदा निवणुकीच्या रिंगणात आहे.

Continues below advertisement

Mohan Bhagwat : अराजक म्हणजे राजा नसणे, ही स्थिती सर्वात वाईट

दरम्यान, मतदान करण्याबद्दल निवडणूक आयोग ही सांगत असते, आम्ही ही सांगत असतो, याचा परिणाम जेव्हा होईल तेव्हा होईल. मात्र नोटा म्हणजे सर्वांना आपण रिजेक्ट करतो. अवेलेबलमधून बेस्ट निवडले पाहिजे. असेही सरसंघचालक मोहन भागवत म्हणाले. अराजक म्हणजे राजा नसणे, ही स्थिती सर्वात वाईट आहे. हे महाभारत मध्येही सांगितले आहे. त्यामुळे अवेलेबलमधून बेस्ट निवडले पाहिजे. जेव्हा आपण कोणालाही निवडत नाही (नोटा करतो) तेव्हा आपण नको असलेल्यालाच मदत करत असतो. त्यामुळे उपलब्ध उमेदवारांमधून बेस्ट निवडायला हवा, असा सल्लाही मोहन भागवत यांनी दिलाय.

Continues below advertisement

Nagpur Municipal Corporation Election 2026: मुस्लिम वस्त्यांमध्ये मतदानाचा मोठा उत्साह

नागपूरात मुस्लिम वस्त्यांमध्ये मतदानाचा मोठा उत्साह दिसून येत आहे. सकाळच्या सत्रात मोमीनपुरा परिसरात विविध मतदान केंद्रावर मुस्लिम मतदारांच्या मतदानासाठी रांगा दिसून येत आहेत. विशेष म्हणजे महिला मोठ्या संख्येने मतदानासाठी बाहेर पडल्या आहेत. सर्वांनी मतदान केलाच पाहिजे, महिलांनी तर आवर्जून मतदान केले पाहिजे, असे मत मुस्लिम मतदारांनी व्यक्त केले आहे.

दुसरीकडे, मतदान का करावे, आपल्या मतदानाने काय फरक पडते! असे संशय महानगरातील मतदारांच्या मनात असेल तर त्यांनी नागपूरच्या अब्दुल उस्मान यांच्याकडे पाहिले पाहिजे. अर्धांगवायूचा झटका आल्यानंतर, संपूर्ण शरीर जवळपास निकामी झाल्यानंतरही ते पत्नीसोबत व्हीलचेअर बसून मतदानासाठी पोहोचले. अब्दुल गेले दोन वर्ष अर्धांग वायूमुळे कामावर जाऊ शकत नाही, कुटुंबाची हलाखीची परिस्थिती झाली, तरीही आज अब्दुल उस्मान सकाळीच मतदानाचा कर्तव्य बजावण्यासाठी मतदान केंद्रावर आले.. (अर्धांगवायू असल्यामुळे अब्दुल उस्मान यांना बोलता येत नाही..) आम्ही आमचे कर्तव्य पूर्ण केले. मात्र आमच्याबद्दल कोणीही काहीही केले नसल्याची भावना यावेळी त्यांच्या पत्नीने व्यक्त केली.