चंद्रपूर : मला पक्षाचा एबी फॉर्म मिळाला होता, मात्र खासदार प्रतिभा धानोरकर (Pratibha Dhanorkar) यांनी आपल्या आर्थिक ताकतीचा वापर करून आणि वर्तमान जिल्हा प्रमुखांशी संगनमत केल्याने माझा एबी फॉर्म परत घेण्यात आला. असा आरोप करत शिवसेना उबाठा गटाचे जिल्हा प्रमुख आणि वरोरा विधानसभेचे अपक्ष उमेदवार मुकेश जीवतोडे (Mukesh Jiwtode) यांनी मोठा गौप्यस्फोट केलाय.
महाविकास आघाडीत (Mahavikas Aghadi) वरोरा विधानसभा (Warora-Bhadravati Assembly Constituency) काँग्रेसच्या वाट्याला गेल्याने मुकेश जीवतोडे यांनी बंडखोरी करत अपक्ष म्हणून उमेदवारी दाखल केली आहे. खासदार प्रतिभा धानोरकर यांचे सख्खे बंधू प्रवीण काकडे यांना काँग्रेस पक्षाची उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे नाराज झालेल्या जीवतोडे यांनी प्रतिभा धानोरकर या मतदारसंघात आपली घराणेशाही राबवत असल्याचाही आरोप केलाय. चंद्रपूर जिल्ह्यात शिवसेना जिवंत ठेवायची असेल तर विधानसभा लढणं आणि जिंकणं आवश्यक आहे, त्यामुळे आम्ही हा बंड नव्हे तर उठाव केल्याचा देखील जीवतोडे यांनी दावा केलाय.
सहा जागांवर भाजप आणि काँग्रेस यांच्यात थेट लढत
चंद्रपूर मतदारसंघातून किशोर जोरगेवार यांना उमेदवारी मिळाली आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील सहाही विधानसभा जागांवर भाजप आणि काँग्रेस यांच्यात थेट लढत होणार आहे. भाजप आणि काँग्रेस यांच्यात थेट लढत होणारा चंद्रपूर राज्यातला एकमेव जिल्हा आहे. तर काँग्रेसकडून प्रविण पडवेकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. प्रविण पडवेकर यांनी चंद्रपूर महानगरपालिकेची निवडणूक लढवली होती.
किशोर जोरगेवार यांनी 75 हजार मतांनी विजय प्राप्त केला. सुरुवातीला किशोर जोरगेवार भाजपात होते. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी पक्षाकडे तिकीट मागितले. मात्र, पक्षाने त्यांना उमेदवारी दिली नाही. त्यामुळे त्यांनी शिवसेनेच्या माध्यमातून निवडणूक लढविली. तेव्हा दुसऱ्या क्रमांकाची 51 हजार मते त्यांना मिळाली होती. आताच्या निवडणुकीत त्यांनी कॉंग्रेसमध्ये प्रवेश घेतला. मात्र, काँग्रेसनेही त्यांना नाकारले. त्यामुळे अपक्ष म्हणून ते रिंगणात होते. चंद्रपूर मतदारसंघात 2019 साली भाजप विरुद्ध काँग्रेस आणि अपक्ष किशोर जोरगेवार अशी लढत झाली होती. मात्र या लढतीत किशोर जोरगेवार यांनी 1 लाख 17 हजार मतं घेत भाजपचा पराभव केला तर दुसरीकडे काँग्रेसचं डिपॉझिट देखील जप्त झालं होतं. यावेळी किशोर जोरगेवार आणि काँग्रेस यांच्यात मुख्य लढत होणार आहे.
भाजप उमेदवार करण देवतळे यांनी फोडला प्रचाराचा नारळ
उमेदवारांना निवडणूक चिन्ह वाटप होताच राज्यभरात उमेदवारांच्या अधिकृत प्रचाराला सुरुवात झाली आहे. चंद्रपूर जिल्ह्यातल्या वरोरा मतदारसंघात देखील आज सकाळी भाजप उमेदवार करण देवतळे यांनी आपल्या प्रचाराचा शुभारंभ केला. वनोजा येथील गणपती मंदिरात त्यांनी कार्यकर्त्यांसह प्रचाराचा नारळ फोडत पूजा केली. यावेळी महायुतीतले घटक पक्ष असलेले राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे प्रमुख नेते आणि पदाधिकारी देखील त्यांच्यासोबत उपस्थित होते. करण देवतळे हे माजी कॅबिनेट मंत्री संजय देवतळे यांचे सुपुत्र असून वयाच्या अवघ्या 29 व्या वर्षी पक्षाने त्यांना वरोरा मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. सरकारने केलेली विकास कामं आणि देवतळे घराण्याचं या भागात असलेला प्रभाव यावरच आपण निवडणूक लढविणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय.
हे ही वाचा