एक्स्प्लोर

आमदार संतापला! आमचा जन्म केवळ समर्थन द्यायला झालाय का? निवडणुकीच्या संदर्भात MIM ची मोठी घोषणा 

राज्यसभेच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. 10 राज्यातील एखूण 37 रिक्त जागांसाठी 16 मार्च रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे.

Rajya Sabha Elections 2026 : राज्यसभेच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. 10 राज्यातील एखूण 37 रिक्त जागांसाठी 16 मार्च रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. महाराष्ट्राचा विचार केला तर महाविकास आघाडी एकत्र आली तरच त्यांचा एक उमेदवार विजयी होऊ शकतो. दरम्यान, अशातच बिहारमधील एमआयएमच्या आमदारानं मोठं वक्तव्य केलं आहे. एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष आणि आमदार अख्तरुल ईमान यांनी बिहारमधून राज्यसभा लढवण्याची तयारी सुरु केली आहे. आमचा जन्म केवळ समर्थन द्यायला झालाय का? असा सवाल देखील ईमान यांनी केलाय. त्यामुळं बिहारमध्ये एमआयएम राज्यसभेच्या निवडणुकीत उडी घेण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

एमआयएमकडून बिहारमधून राज्यसभा लढवण्याची तयारी सुरु 

एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष आणि आमदार अख्तरुल ईमान यांनी दिलेल्या माहितीनुसार, एमआयएमनं बिहारमधून राज्यसभा लढवण्याची तयारी सुरु केली आहे. ज्या पक्षांना सरकारविरोधात लढायचं आहे, ज्यांना दलितांचं हित हवं आहे, त्यांनी ओवैसींचं हात बळकट करावेत, असं आवाहन ईमान यांनी केलं. बिहारमध्ये एमआयएमचे 5 आमदार  देखील आहेत. गेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये एमआयएमनं बिहारच्या सीमांचल भागात ताकद दाखवली आहे. त्यामुळं यावेळची राज्यसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय एमआयएमने घेतला आहे. आमचा जन्म केवळ समर्थन द्यायला झालाय का? मला कोण पाठिंबा देईल असा प्रश्न तुम्ही का विचारत नाही, असे प्रश्न ईमान यांनी विचारले. राज्यसभा निवडणुकीतील पाठिंब्याबद्दल प्रसारमाध्यमांनी विचारले होते. यावर ईमान यांनी प्रत्युत्तर दिले आहे. राज्यातील पक्षांचे राज्यसभेत प्रतिनिधी आहेत. तिथे आमचा एकही सदस्य नाही. त्यामुळे आम्हाला तिथे प्रतिनिधीत्व हवं आहे, असे ईमान म्हणाले. बिहारच्या विधानसभेत एकूण 243 आमदार आहेत. हे आमदार राज्यसभेसाठी मतदान करतील. पाच जागा रिक्त होत आहेत. एका उमेदवाराला विजयासाठी 41 मतांचा कोटा आहे. सध्याच्या घडीला एनडीएकडे 202 आमदारांचं बळ आहे. त्यांच्या आधारे सत्ताधारी युती 4 जागा सहज जिंकू शकते. त्यानंतरही त्यांच्याकडे बरीच मतं शिल्लक राहतात. त्यांनी पाचवा उमेदवार दिल्यास क्रॉस व्होटिंग होऊ शकतं.

राज्यसभेसाठी 16 मार्च रोजी मतदान होणार, महाराष्ट्राच्या वाट्याला सात जागा

राज्यसभेच्या एकूण 37 जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. 5 मार्चपर्यंत अर्ज करता येणार आहे. तर 16 मार्च रोजी मतदान होणार आहे. सध्याच्या खासदारांचा कार्यकाळ हा येत्या 2 एप्रिल रोजी संपणार आहे. महाराष्ट्राच्या वाट्याला सात जागा आहेत. भाजपचे चार तर मित्र पक्ष शिंदेसेना आणि अजितदादांच्या राष्ट्रवादीचे प्रत्येकी एक खासदार राज्यसभेवर निवडल्या जातील. या चार जागांसाठी भाजपमध्ये चुरस दिसून येत आहे.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मोदीजी, आपण शांततेसाठी पुढाकार घ्यावा, अण्णा हजारेंचं पंतप्रधानांना पत्र; युद्ध परिस्थितीवर भाष्य, परखड भूमिका
मोदीजी, आपण शांततेसाठी पुढाकार घ्यावा, अण्णा हजारेंचं पंतप्रधानांना पत्र; युद्ध परिस्थितीवर भाष्य, परखड भूमिका
Parbhani Zilla Parishad : परभणी जिल्हा परिषदेत सत्तेसाठी राष्ट्रवादीची मोठी खेळी, भाजपला बाजूला ठेवत सर्व पक्ष आले एकत्र, नेमकं काय घडलं?
परभणी जिल्हा परिषदेत सत्तेसाठी राष्ट्रवादीची मोठी खेळी, भाजपला बाजूला ठेवत सर्व पक्ष आले एकत्र, नेमकं काय घडलं?
Aaditya Thackeray: राज्यसभेसाठी दावा, जागा शरद पवारांना सुटली, फॉर्म भरायला दांडी का? आदित्य ठाकरेंनी सगळंच सांगितलं
राज्यसभेसाठी दावा, जागा शरद पवारांना सुटली, फॉर्म भरायला दांडी का? आदित्य ठाकरेंनी सगळंच सांगितलं
महाराष्ट्रानं दिलेलं प्रेम, विश्वास आणि पाठबळ हेच आयुष्याच्या ऊर्जेचे खरे स्रोत, शरद पवारांनी मित्रपक्षांचे मानले आभार 
महाराष्ट्रानं दिलेलं प्रेम, विश्वास आणि पाठबळ हेच आयुष्याच्या ऊर्जेचे खरे स्रोत, शरद पवारांनी मित्रपक्षांचे मानले आभार 
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Modi vs Mamta : राष्ट्रपतींचा बंगाल दौरा, वादाचा भोवरा Special Report
Satara Bavdhan Bagad Yatra : साताऱ्यातील बावधनमधील बगाड यात्रा सातासुमद्रापार  Special Report
Mumbai Metro Womens Day : महिला दिनानिमित्त, CSMT मेट्रो स्थानकाची जबाबदारी महिलांकडे
Womens Day Special Talk With Mayor : महिला दिन विशेष 'माझा'च्या मंचावर महिला महापौरांची 'महा'पॉवर
Bhiklya Ladkya Dhinda : तारपा वाजवणारा पद्मश्री आयुष्याचे धडे देणारा तत्त्वज्ञानी Majha Katta वर

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Team India Champions T20 World Cup 2026 : टीम इंडिया पुन्हा चॅम्पियन! मोडले सर्व 'महारेकॉर्ड'; अशी ऐतिहासिक कामगिरी करणारा भारत पहिलाच संघ ठरला
टीम इंडिया पुन्हा चॅम्पियन! मोडले सर्व 'महारेकॉर्ड'; अशी ऐतिहासिक कामगिरी करणारा भारत पहिलाच संघ ठरला
IND vs NZ : जेम्सची ओव्हर हॅट्र्टीक, 16 व्या षटकात भारताच्या तीन विकेट; टीम इंडियाच्या धावांच्या गतीला ब्रेक
जेम्सची ओव्हर हॅट्र्टीक, 16 व्या षटकात भारताच्या तीन विकेट; टीम इंडियाच्या धावांच्या गतीला ब्रेक
Ind vs NZ: संजू सॅमसनचा वादळी तडाखा; मैदानावार 6,6,6 षटकारांचा पाऊस, शतक हुकलं पण न्यूझीलंडला धुव्वादार ठोकलं
संजू सॅमसनचा वादळी तडाखा; मैदानावार 6,6,6 षटकारांचा पाऊस, शतक हुकलं पण न्यूझीलंडला धुव्वादार ठोकलं
उदय शेट्टी, मजनुभाईचा 'वेलकम 4' येतोय; सुनिल शेट्टीनेच सांगितली स्टारकास्ट, कॉमेडीचा तडका कधी रिलीज होणार?
उदय शेट्टी, मजनुभाईचा 'वेलकम 4' येतोय; सुनिल शेट्टीनेच सांगितली स्टारकास्ट, कॉमेडीचा तडका कधी रिलीज होणार?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 08 मार्च 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 08 मार्च 2026 | रविवार
पुणेकरांसाठी डबल डेकर पुल सुरू, वाहतूक कोडींपासून सुटका; ब्रिजला अजित दादांचे नाव? पाहा फोटो
पुणेकरांसाठी डबल डेकर पुल सुरू, वाहतूक कोडींपासून सुटका; ब्रिजला अजित दादांचे नाव? पाहा फोटो
Abhishek Manu Singhvi: कोणतंही कर्ज नाही, फक्त पाच वर्षात 1 हजार 516 कोटींची वाढ; वरिष्ठ वकिल अभिषेक मनु सिंघवी यांची संपत्ती किती हजार कोटींच्या घरात?
कोणतंही कर्ज नाही, फक्त पाच वर्षात 1 हजार 516 कोटींची वाढ; वरिष्ठ वकिल अभिषेक मनु सिंघवी यांची संपत्ती किती हजार कोटींच्या घरात?
CM नितीश कुमार राज्यसभेवर जाणार, लेक निशांतने स्वीकारलं जदयुचं सदस्य; राजकीय प्रवेश होताच म्हणाला...
CM नितीश कुमार राज्यसभेवर जाणार, लेक निशांतने स्वीकारलं जदयुचं सदस्य; राजकीय प्रवेश होताच म्हणाला...
Embed widget