एक्स्प्लोर

Rajya Sabha Election 2026: राज्यसभा निवडणुकीसाठी उद्धव ठाकरेंची मोठी खेळी, शरद पवार गटाला वगळून थेट दिल्लीत काँग्रेसच्या हायकमांडशी चर्चा

Rajya Sabha Election 2026: राज्यसभेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीमध्ये राजकीय हालचाली वेगाने सुरू झाल्या आहेत

Rajya Sabha Election 2026: राज्यसभेच्या आगामी निवडणुकीच्या (Rajya Sabha Election 2026) पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीमध्ये (Mahavikas Aghadi) राजकीय हालचाली वेगाने सुरू झाल्या आहेत. विशेष म्हणजे शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेस यांच्यात थेट चर्चा सुरू असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. या चर्चांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला बाजूला ठेवत दोन्ही पक्षांमध्ये चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.  

Rajya Sabha Election 2026: उद्धव ठाकरेंची थेट दिल्लीत चर्चा?

सूत्रांच्या माहितीनुसार, शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी थेट दिल्लीत काँग्रेसच्या हायकमांडशी राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चर्चा सुरू केली आहे. भारत निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार महाराष्ट्रातील 7 राज्यसभा जागांसाठी 16 मार्च 2026 रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीत विजयी होण्यासाठी एका उमेदवाराला 27 मतांचा कोटा आवश्यक आहे.

Rajya Sabha Election 2026: मविआकडे 50 आमदार

सध्याच्या आकडेवारीनुसार महाविकास आघाडीकडे 50 आमदारांचे बळ आहे. त्यामुळे सात पैकी किमान एक जागा मविआला मिळणे जवळपास निश्चित मानले जात आहे. मात्र त्या जागेवर कोणत्या पक्षाचा उमेदवार असणार यावरून आघाडीत अंतर्गत चर्चा सुरू झाली आहे.

Rajya Sabha Election 2026: राज्यसभा आणि विधान परिषद दोन्ही निवडणुकांवर चर्चा

सूत्रांच्या माहितीनुसार काँग्रेस आणि ठाकरे गटामध्ये केवळ राज्यसभेच्या जागांवरच नव्हे तर विधान परिषदेच्या आगामी निवडणुकांवरही चर्चा सुरू आहे. मे महिन्यात विधान परिषदेच्या 9 जागा रिक्त होणार असून त्यासाठी निवडणूक होणार आहे. या निवडणुकीत एका उमेदवाराला 29 मतांचा कोटा लागणार आहे. त्यामुळे या 9 पैकी किमान एक जागा महाविकास आघाडीला मिळण्याची शक्यता मानली जात आहे. महत्त्वाचे म्हणजे, या चर्चांबाबत सध्या तरी काँग्रेस आणि ठाकरे गटाने शरद पवार यांच्या गटाशी औपचारिक चर्चा केलेली नसल्याची माहिती समोर येत आहे. 

Rajya Sabha Election 2026: शरद पवार पुन्हा राज्यसभेत?

राज्यसभेच्या ज्या सात जागांसाठी निवडणूक होत आहे त्यामध्ये शरद पवार यांची जागाही रिक्त होत आहे. मात्र ते पुन्हा राज्यसभेवर जाणार का, किंवा पक्ष दुसऱ्या नेत्याला संधी देणार का याबाबत अद्याप स्पष्टता नाही.

Rajya Sabha Election 2026: महायुतीला संख्याबळाचा फायदा

दरम्यान, विधानसभेतील संख्याबळ पाहता भारतीय जनता पक्ष, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्या महायुतीकडे स्पष्ट बहुमत आहे. त्यामुळे राज्यसभेच्या 7 पैकी सुमारे 6 जागा महायुतीच्या खात्यात जाण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे.

Rajya Sabha Election 2026: आघाडीत तणाव वाढणार?

राज्यसभा आणि विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या या हालचालींमुळे महाविकास आघाडीत अंतर्गत तणाव वाढण्याची शक्यता राजकीय वर्तुळात चर्चेत आहे. पुढील काही दिवसांत जागावाटप आणि उमेदवारांवर अंतिम निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.

आणखी वाचा 

Sanjay Raut on Rajya Sabha Election 2026: शरद पवारांच्या राज्यसभेसाठी आग्रही असणाऱ्या संजय राऊतांची भूमिका अचानक 'लवचिक'? आदित्य आणि उद्धव ठाकरेंचाही उल्लेख करत नेमकं काय म्हणाले?

एबीपी माझा वृत्तवाहिनीमध्ये मागील 7 वर्षांपासून कार्यरत
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मोदीजी, आपण शांततेसाठी पुढाकार घ्यावा, अण्णा हजारेंचं पंतप्रधानांना पत्र; युद्ध परिस्थितीवर भाष्य, परखड भूमिका
मोदीजी, आपण शांततेसाठी पुढाकार घ्यावा, अण्णा हजारेंचं पंतप्रधानांना पत्र; युद्ध परिस्थितीवर भाष्य, परखड भूमिका
Parbhani Zilla Parishad : परभणी जिल्हा परिषदेत सत्तेसाठी राष्ट्रवादीची मोठी खेळी, भाजपला बाजूला ठेवत सर्व पक्ष आले एकत्र, नेमकं काय घडलं?
परभणी जिल्हा परिषदेत सत्तेसाठी राष्ट्रवादीची मोठी खेळी, भाजपला बाजूला ठेवत सर्व पक्ष आले एकत्र, नेमकं काय घडलं?
Aaditya Thackeray: राज्यसभेसाठी दावा, जागा शरद पवारांना सुटली, फॉर्म भरायला दांडी का? आदित्य ठाकरेंनी सगळंच सांगितलं
राज्यसभेसाठी दावा, जागा शरद पवारांना सुटली, फॉर्म भरायला दांडी का? आदित्य ठाकरेंनी सगळंच सांगितलं
महाराष्ट्रानं दिलेलं प्रेम, विश्वास आणि पाठबळ हेच आयुष्याच्या ऊर्जेचे खरे स्रोत, शरद पवारांनी मित्रपक्षांचे मानले आभार 
महाराष्ट्रानं दिलेलं प्रेम, विश्वास आणि पाठबळ हेच आयुष्याच्या ऊर्जेचे खरे स्रोत, शरद पवारांनी मित्रपक्षांचे मानले आभार 
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Womens Day Special Talk With Mayor : महिला दिन विशेष 'माझा'च्या मंचावर महिला महापौरांची 'महा'पॉवर
Bhiklya Ladkya Dhinda : तारपा वाजवणारा पद्मश्री आयुष्याचे धडे देणारा तत्त्वज्ञानी Majha Katta वर
AI Film on Shivaji Maharaj : संभाजीनगरच्या गृहिणीची कमाल, AI ने थेट शिवरायांवर सिनेमा बनवला!
Donald Trump on Iran : बलाढ्य अमेरिकेवर इराण भारी? Special Report
Mojtaba Khamenei Iran :  मोजतबा खामेनींच्या नावाला अमेरिकेचा विरोध Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 08 मार्च 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 08 मार्च 2026 | रविवार
पुणेकरांसाठी डबल डेकर पुल सुरू, वाहतूक कोडींपासून सुटका; ब्रिजला अजित दादांचे नाव? पाहा फोटो
पुणेकरांसाठी डबल डेकर पुल सुरू, वाहतूक कोडींपासून सुटका; ब्रिजला अजित दादांचे नाव? पाहा फोटो
Abhishek Manu Singhvi: कोणतंही कर्ज नाही, फक्त पाच वर्षात 1 हजार 516 कोटींची वाढ; वरिष्ठ वकिल अभिषेक मनु सिंघवी यांची संपत्ती किती हजार कोटींच्या घरात?
कोणतंही कर्ज नाही, फक्त पाच वर्षात 1 हजार 516 कोटींची वाढ; वरिष्ठ वकिल अभिषेक मनु सिंघवी यांची संपत्ती किती हजार कोटींच्या घरात?
CM नितीश कुमार राज्यसभेवर जाणार, लेक निशांतने स्वीकारलं जदयुचं सदस्य; राजकीय प्रवेश होताच म्हणाला...
CM नितीश कुमार राज्यसभेवर जाणार, लेक निशांतने स्वीकारलं जदयुचं सदस्य; राजकीय प्रवेश होताच म्हणाला...
India vs New Zealand, Final T20 World Cup: 'अभिषेक शर्मा आणि वरुण चक्रवर्तीला बाहेर ठेवा' वर्ल्डकप फायनलला काही तास बाकी असतानाच गंभीर गुरुजी अन् कॅप्टन सूर्याला थेट सल्ला!
'अभिषेक शर्मा आणि वरुण चक्रवर्तीला बाहेर ठेवा' वर्ल्डकप फायनलला काही तास बाकी असतानाच गंभीर गुरुजी अन् कॅप्टन सूर्याला थेट सल्ला!
डोंबिवलीच्या महिलांचा वर्ल्ड रेकॉर्ड; सांगलीचा विश्वविक्रम मोडला, महिला दिनी 9,111 विद्यार्थीनींची एकत्र लेझीम
डोंबिवलीच्या महिलांचा वर्ल्ड रेकॉर्ड; सांगलीचा विश्वविक्रम मोडला, महिला दिनी 9,111 विद्यार्थीनींची एकत्र लेझीम
इराक लक्षात ठेवा! खोटारट्यावर आधारित युद्ध नकोत; थेट इराणवरील अमेरिका-इस्रायली हल्ल्यांविरोधात व्हाईट हाऊससमोर एल्गार
इराक लक्षात ठेवा! खोटारट्यावर आधारित युद्ध नकोत; थेट इराणवरील अमेरिका-इस्रायली हल्ल्यांविरोधात व्हाईट हाऊससमोर एल्गार
Pune News : अजितदादांना आज खूप मिस करतोय, शहरातल्या पहिल्या उद्घाटन सोहळ्याला ते नाहीयेत; डबल डेकर पुलाला अजित पवारांचे नाव द्यावं, मुरलीधर मोहोळ यांची मागणी
अजितदादांना आज खूप मिस करतोय, शहरातल्या पहिल्या उद्घाटन सोहळ्याला ते नाहीयेत; पुण्यातील डबल डेकर पुलाला अजित पवारांचे नाव द्यावं, मुरलीधर मोहोळ यांची मागणी
Embed widget