जयपूर दर पाच वर्षांनी राजस्थानमधील सत्तापालटाचा सिलसिला कायम राहिला आहे. राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे विजयी झाल्या असल्या, तरी त्यांना आपल्या नेतृत्वात सरकार राखण्यात अपयश आलं आहे. काँग्रेसने प्रदेशाध्यक्ष सचिन पायलट यांच्या नेतृत्वात राजस्थानात एकहाती सत्ता मिळवली आहे.

काँग्रेसचा युवा चेहरा आणि राजस्थान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सचिन पायलट यांच्या नेतृत्वात पक्षाने राजस्थानात चमकदार कामगिरी बजावली आहे. राजस्थानात सत्तास्थापन करतानाच सचिन पायलट यांनी टोंक मतदारसंघातही विजय मिळवला.

गेल्या वीस वर्षांत कुठल्याच पक्षाला राजस्थानमध्ये सलग दोन टर्म सत्ता काय राखता आलेली नाही. काँग्रेस आणि भाजप यांची राजस्थानात आलटून पालटून सत्ता येत असते. ही परंपरा मोडून काढण्याची संधी वसुंधरा राजे यांनी गमावली. राजस्थानने वसुंधरा राजे यांना सपशेल नाकारलं.

राजस्थानमध्ये विधानसभेच्या 200 जागा असून 199 जागांसाठी मतदान झाले. राजस्थानात काँग्रेसने बहुमताचा आकडा पार करत आत्तापर्यंतच्या कलांनुसार 101 जागांवर आघाडी घेतली आहे. तर भाजपने 70 जागांवर आघाडी घेतली आहे.

Election Results Live Update

  • 4.00 वाजेपर्यंतचे कल : भाजप 70, काँग्रेस+102, इतर 27

  • राजस्थानात 'पायलट' यांच्या नेतृत्वात काँग्रेसची 'भरारी'

  • काँग्रेस बहुमताजवळ, अशोक गहलोत यांच्याकडून चहाचं वाटप

  • भाजप-काँग्रेसमध्ये चुरस वाढली, भाजप 86 आणि काँग्रेस 92 जागा

  • भाजपला आत्मचिंतन करण्याची गरज : सचिन पायलट

  • काँग्रेस आघाडीवर परंतु बहुमतपासून दूर, सत्ता स्थापनेसाठी सचिन पायलट आठ अपक्षांच्या संपर्कात

  • झालरापाटन मतदारसंघातून वसुंधरा राजे विजयी

  • भाजप 80, काँग्रेस+96, इतर 23

  • काँग्रेसमुक्तीची भाषा करणारे मुक्त होतील : अशोक गहलोत

  • भाजप 81, काँग्रेस+95, इतर 23

  • भाजप 80, काँग्रेस+101, इतर 18

  • राजस्थानमध्ये काँग्रेसला बहुमत, सुरुवातीच्या कलांनुसार काँग्रेसच्या शतक पार जागा

  • भाजप 80, काँग्रेस+97, इतर 17

  • सुरवातीच्या कलानुसार राजस्थानात काँग्रेसला बहुमत

  • भाजप 78, काँग्रेस+92, इतर 14

  • राजस्थान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सचिन पायलट आघाडीवर, भाजपचे युनूस खान मागे

  • राजस्थानात काँग्रेस बहुमतापासून फक्त 10 जागा दूर

  • राजस्थानमध्ये भाजप सरकारचे सात मंत्री पिछाडीवर

  • भाजप 70, काँग्रेस+85, इतर 8

  • जयपूरमध्ये काँग्रेसचा फटाके फोडून जल्लोष साजरा

  • भाजप 55, काँग्रेस+77, इतर 2

  • भाजप 42, काँग्रेस+60, इतर 2

  • राजस्थानात कॉंग्रेसत अर्धशतक पूर्ण

  • राजस्थान : भाजप 30, काँग्रेस+51, इतर 2

  • राजस्थान : भाजप 17, काँग्रेस+38, इतर 0

  • राजस्थानचा पहिला कल भाजपच्या बाजूने, वसुंधरा राजे आघाडीवर, सचिन पायलटही पुढे

  • राजस्थानमध्ये मतमोजणीला सुरुवात, सुरुवातीला पोस्टल मतांची मोजणी


वसुंधरा राजेंची प्रतिष्ठा पणाला

राजस्थानात मुख्यमंत्री वसुंधराराजे शिंदे तर काँग्रेसकडून सचिन पायलट आणि अशोक गहलोत यांची प्रतिष्ठा पणाला लागलीय. विधानसभेच्या 200 पैकी 199 जागांसाठी राजस्थानात निवडणूक झाली. विविध संस्थांच्या एक्सिट पोलमध्ये राजस्थानात काँग्रेसलाच झुकतं माप देण्यात आलं आहे.

राज्यात मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांच्याबद्दल नाराजी असल्याचे दिसून आले. काँग्रेसकडून अशोक गहलोत आणि सचिन पायलट यांनी सत्ता काबीज करण्यासाठी कसून परिश्रम घेतले आहेत. तर सत्ता कायम ठेवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाचे अध्यक्ष अमित शाह यांनी प्रचारसभांचा धडाकाच लावला होता.

राजस्थानमध्ये 200 मतदारसंघ असून 199 जागांसाठी मतमोजणी होणार आहे. येथे बहुमतासाठी 100 जागांची आवश्यकता आहे. राज्यात 7 डिसेंबरला एकूण 74.21 टक्के मतदान झाले. राज्यात एकूण एकूण 3374 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

राजस्थान 2013 चं पक्षीय बलाबल (200)

भाजप – 163

काँग्रेस – 21

बसप – 3

राष्ट्रीय जनता पक्ष - 4

अपक्ष – 9