Raj Thackeray: शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी शिवसेना भवन येथे मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या (BMC Election 2026) पार्श्वभूमीवर वचननामा प्रसिद्ध केला. विशेष म्हणजे राज ठाकरे तब्बल 20 वर्षानंतर शिवसेना भवन येथे दाखल झाले होते. यावेळी पत्रकार परिषदेत बोलताना राज ठाकरे यांनी पश्चिम बंगालमध्ये बिनविरोध निवडणुका तुम्हाला चालत नाहीत आणि महाराष्ट्रात तुम्ही करतात. सत्तेचा अमरपट्टा घेऊन कोणीच आलेले नाहीत, असे म्हणत त्यांनी भाजपवर (BJP) जोरदार हल्लाबोल केलाय. 

Continues below advertisement

राज ठाकरे म्हणाले की, 20 वर्षानंतर मला जेलमधून सुटून आल्यासारखे वाटत आहे. मी जेलमधून आल्यासारखे वाटत आहे. आज मी खूप वर्षानंतर शिवसेना भवनमध्ये आलोय. नवीन शिवसेना भवन मी पहिल्यांदा बघत आहे. माझ्या मनात कायमच्या कोरल्या गेलेल्या आठवणी जुन्या शिवसेना भवनातील आहेत. त्यामुळे कुठे काय होतं हेच मला आता समजत नाहीये. पण, जुन्या शिवसेना भवनमधील आठवणी या खूप आनंददायी होत्या. 1977 साली शिवसेना भवन झाले आणि त्याच वर्षी जनता पक्षाचे सरकार आले. त्यावेळी शिवसेना भवनवर दगडफेक झाली होती. तेव्हापासूनच्या सगळ्या जुन्या आठवणी आहेत. आज शिवसेना, महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांचा मिळून एक संयुक्त जाहीरनामा येथे प्रकाशित होत आहे. आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे यांनी जाहीरनाम्यातील गोष्टी आपल्यासमोर मांडलेल्याच आहेत, असे त्यांनी यावेळी म्हटले. 

Raj Thackeray: सत्तेचा अमरपट्टा घेऊन कोणीच आलेले नाही

राज ठाकरे पुढे म्हणाले की, पश्चिम बंगालमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका बिनविरोध झाल्या होत्या, तेव्हा भारतीय जनता पक्ष सुप्रीम कोर्टात गेला होता. आता त्याच पक्षाचे आत्ताच्या महाराष्ट्रातील गोष्टींबाबत काय म्हणणं आहे? हे त्यांनी सांगावे, असा सवाल त्यांनी भाजपला विचारला. पश्चिम बंगालमध्ये बिनविरोध निवडणुका तुम्हाला चालत नाहीत आणि महाराष्ट्रात तुम्ही करतात. सत्तेचा अमरपट्टा घेऊन कोणीच आलेले नाही. आज तुम्ही सत्तेत आल्यावर काँग्रेसने असं केले म्हणून आम्ही तसे करत आहोत, असे तुम्ही म्हणत आहात. उद्या तुम्ही जाल आणि तुम्ही जे पायंडे पाडून ठेवलेले आहेत त्याच्या दाम दुपटीने जेव्हा पुढे सुरू होईल तेव्हा कोणाकडे तक्रार करू नका, असा हल्लाबोल त्यांनी भाजपवर केला. 

Continues below advertisement

Raj Thackeray: त्यांचा भ्रम दूर झाला पाहिजे

त्यांना वाटत असेल आपण सत्तेतून कधीच बाजूला होणार नाही तर त्यांचा हा भ्रम दूर झाला पाहिजे. उद्या सत्ता परिवर्तन होईल आणि दुसरे येऊन याहून वाईट होईल, त्यावेळी आपण काय करणार याचा विचार सत्ताधाऱ्यांनी करावा. महाराष्ट्राचा, यूपी बिहार करत आहेत. महाराष्ट्राचे अशाप्रकारे वाटोळे करणे, महाराष्ट्राच्या पुढच्या पिढ्यांचे वाटोळे करणे, महाराष्ट्रात जे राजकारणात येऊ इच्छितात, त्यांची विचारसरणी बदलणे हे महाराष्ट्राच्या भवितव्यासाठी घातक आहे. या सर्व गोष्टींचा विचार राजकीय पक्षांनी करणे गरजेचे आहे, असे देखील राज ठाकरे यांनी म्हटले आहे. 

आणखी वाचा 

Raj Thackeray and Uddhav Thackeray BMC Election Manifesto: शब्द ठाकरेंचा! मुंबईकरांसाठी राज-उद्धव ठाकरेंकडून शिवशक्तीचा वचननामा जाहीर, राज ठाकरे 20 वर्षांनी शिवसेना भवनात