वायनाड : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी उत्तर प्रदेशच्या अमेठी आणि केरळच्या वायनाडमधून लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. वायनायमध्ये राहुल गांधींना थोडी अडचण निर्माण होण्याची शक्यता आहे. कारण याठिकाणी राहुल गांधी यांच्या विरोधात तीन असे उमेदवार आहेत की ज्यांची नावं राहुल गांधींच्या नावाशी मिळती-जुळती आहेत.


राहुल गांधी यांच्याविरोधात वायनाडमधून के ई राहुल गांधी, त्रिसूरचे के एम शिवप्रसाद गांधी आणि अगीला इंडिया मक्कल कझगम पार्टीचे सदस्य कोयंबतूरचे के के राहुल गांधी हे निवडणूक लढवणार आहेत. नावातील साम्यामुळे राहुल गांधी यांना निवडणुकीत फटका बसण्याची शक्यता आहे.


या उमेदवारांनी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार के ई राहुल गांधी यांनी भाषाविज्ञान यामध्ये एमफिल केलं असून ते सामाजिक कार्यात सक्रीय आहेत. त्यांच्याकडे 5000 रुपये रोख रक्कम आणि बँकेत 515 रुपये आहेत. या व्यतिरिक्त त्यांकडे कोणतीही स्थावर मालमत्ता नाही.


के. राहुल गांधी हे पत्रकार आहेत, तर त्यांची पत्नी डॉक्टर आहे. के राहुल गांधी यांचं उत्पन्न 1 लाख 99 हजार रुपये आहे, तर त्यांच्या पत्नीचं उत्पन्न 20 लाख रुपये आहे.तिसरे उमेदवार के एम शिवप्रसाद गांधी संस्कृतचे शिक्षक आहेत, त्यांची पत्नी कॉम्युटर ऑपरेटर आहे.


राहुल गांधी यांच्यासह सारख्याच नावाचे आणखी तीन उमेदवार रिंगणात असल्याचे मतदारांमध्ये संभ्रम निर्माण होण्याची शक्यता आहे आणि याचा फटका राहुल गाधींनी बसण्याची शक्यता आहे.


VIDEO | राहुल गांधींच्या बायोपिकमध्ये हिरॉईन कोण असेल?