Pune Municipal Corporation election Result :  राज्यातील 29 महापालिका निवडणुकांच्या निकालाचे अंतिम कल हाती आले आहेत. बहुतांश जिल्ह्यात भाजप पुन्हा एकदा मोठा पक्ष ठरल्याचे दिसून आलं आहे. पुण्यात देखील भाजपची सत्ता आली आहे. त्यामुळं भाजपचा महापौर होणार हे जवळफास निश्चित झालं आहे. दरम्यान, पुण्यात गणेश बीडकरु विरुद्ध माजी आमदार रवींद्र धंगेकर यांचे पुत्र प्रणव धंगेकर यांच्या लढतीकडे सर्वाचं लक्ष लाहलं होतं. यामध्ये अखेर गणेश बीडकर यांनी बाजी मारली आहे. बीडकरांनी 2017 च्या रवींद्र धंगेकर यांनी केलेल्या पराभवाचा वचपा काढला आहे. गणेश बीडतक हे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू सहकारी मानले जातात. 

रवींद्र धंगेकरांचा मुलगा प्रणव आणि रवींद्र धंगेकरांच्या पत्नी प्रतिभा यांचा पराभव

रवींद्र धंगेकरांचा मुलगा प्रणव आणि रवींद्र धंगेकरांच्या पत्नी प्रतिभा यांचा पराभव झाला आहे. पत्नीचा प्रभाग क्रमांक 23 मधुन पराभव तर मुलगा प्रणवचा प्रभाग क्रमांक 24 मधुन पराभव झाला आहे. भाजप आणि शिंदे सेनेची युती न झाल्याने प्रभाग क्रमांक 23 आणि 24 मध्ये धंगेकरांचा सामना भाजपच्या उमेदवारांसोबत झाला होता. प्रणव धंगेकरची लढत भाजपचे गटनेते गणेश बिडकर यांच्या विरुद्ध झाली.  2017 मधील नगरसेवकपदाच्या निवडणुकीत रविंद्र धंगेकरांनी गणेश बिडकरांचा पराभव केला होता. यावेळी गणेश बिडकरांच्या समोर रविंद्र धंगेकरांचा मुलगा प्रणवचे आव्हान होते. अखेर बीडकरांनी बाजी मारली आहे.  

पुणे महापालिकेत सत्ता स्थापन करण्यासाठी 82 जागांची गर

पुणे महानगरपालिका निवडणूक निकाल जाहीर होत आहे. पुणे महापालिकेच्या 162 जागांसाठी (52.59 %) टक्के मतदान झालं. पुणे महापालिकेत सत्ता स्थापन करण्यासाठी 82 जागांची गरज आहे. हा आकडा कोण गाठणार याकडे सर्वांचं लक्ष आहे. पुणे महापालिकेमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शरद पवारांची राष्ट्रवादी यांची आघाडी झाली. तर भाजप आणि शिवसेना शिंदे वेगवेगळे लढले. याशिवाय उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेसची युती पाहायला मिळाली. अपक्षांची संख्या देखील मोठी आहे. 

पुणे महापालिका निवडणुकीत भाजप हाच एक नंबरचा पक्ष ठरला आहे. भाजप सध्या 63 पेक्षा अधिक जागांवर आघाडीवर आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस 14 जागांवर आघाडीवर आहे. त्यामुळं पुणे महानगरपालिकेत भाजपचा सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा झाला आहे. पुण्यात भाजपचे वर्चस्व कायम राहिले आहे. राष्ट्रवादी दुसऱ्या नंबर वर गेला आहे. मनसेला पुण्यात खातं सुद्धा उघडता आले नाही. पुणे शहरातील अनेक प्रभागात भाजपने पॅनल जिंकले आहेत.