Pune Bypoll The Strelema Exit Pollद स्ट्रेलेमा या संस्थेने पुण्यातील कसबा पेठेच्या निवडणुकीविषयी केलेला अंदाज खरा ठरला असून चिंचवडचा अंदाजही खरा ठरण्याच्या मार्गावर आहे. कसब्यात काँग्रेसचे रविंद्र धंगेकर हे विजयी झाले आहेत. स्ट्रेलेमा या संस्थेने रविंद्र धंगेकर यांना 54 टक्के मतं मिळतील असा अंदाज व्यक्त केला होता. तर या निवडणुकीत रविंद्र धंगेकर यांना 53 टक्के मतं मिळाली आहे. 30 वर्ष सत्ता असणाऱ्या कसब्यातील भाजपच्या गडाला धंगेकर यांनी खिंडार पाडली आहे. रवींद्र धंगेकर 11 हजार 040 मतांनी विजयी झाले असून त्यांनी भाजपच्या हेमंत रासने (Hemant Rasane) यांचा पराभव केला आहे.

द स्ट्रेलेमाच्या अंदाजाप्रमाणे रविंद्र धंगेकर हे 11 टक्के मतांच्या फरकाने जिंकतील असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. आता लागलेल्या निकालानुसार रविंद्र धंगेकरांनी 8 टक्के मताधिक्यांनी विजय प्राप्त केला आहे. त्यामुळे द स्ट्रेलेमाचा अंदाज खरा ठरल्याचं दिसून येतंय. 

द स्ट्रेलेमाचा एक्झिट पोल ठरला खरा

द स्ट्रेलेमा (The Strelema, Pune) या संस्थेने जाहीर केलेल्या एक्झिट पोलमध्ये कसब्यात भाजपला धक्का मिळणार आहे. या ठिकाणी भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांचा पराभव होणार असून काँग्रेसचे रवींद्र धंगेकर हे 15 हजार 077 मताधिक्यांनी विजयी होतील असं सांगितलं होतं. तर चिंचवडची जागा भाजप राखणार असून त्या ठिकाणी अश्विनी जगताप या 32 हजार 351 मतांनी विजयी होतील असा अंदाज व्यक्त केला होता. चिंचवडमध्ये राष्ट्रवादीचे उमेदवार नाना काटे यांना 93 हजार 003 मतं तर अपक्ष उमेदवार 60 हजार173 मतं मिळणार असल्याचं सांगितलं होतं. 

द स्ट्रेलेमा संस्थेचा एक्झिट पोल आणि निवडणुकीचा निकाल

उमेदवाराचं नाव द स्ट्रेलेमा एक्झिट पोल  पोटनिवडणुकीचा निकाल निकालातील फरक
रवींद्र धंगेकर (काँग्रेस) 54 % 53 % 1 %
हेमंत रासने (भाजप) 43 % 45 % -2 %
इतर 3 % 2 % 0
विजयी मताधिक्य 11 % 8 % 3 %


द स्ट्रेलेमाचे सहसंस्थापक सुशीलकुमार शिंदे यांनी याबाबत प्रतिक्रिया देत म्हटलं आहे की, "कसबा विधानसभा सोबतच पंढरपूर आणि कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीतही आमचे अंदाज तंतोतंत बरोबर आले होते. आम्ही कोणत्याही निवडणुकीसाठी एक्झिट पोल वर्तवत असताना 'द स्ट्रेलेमा' या संस्थेच्या माध्यमातून एक सिस्टम तयार केलेली आहे. या प्रक्रियेत आमच्याकडे रिसर्चर, सोशिओलॉजिस्ट, सायकॉलिजिस्ट, डेटा अनॅलिस्ट सोबतच सर्वेक्षणाचा अनुभव असलेले व्यवस्थापक आहेत. या टीमच्या माध्यमातून आम्ही तयार केलेल्या प्रश्नावलीतून प्रोबॅबिलिटी प्रपोशनल सॅम्पलिंच्या आधारे मतदारांच्या मनातील योग्य कल जाणून घेत असतो. आमचे एक्झिट पोल तंतोतत बरोबर येण्याचे श्रेय हे आमच्या वैविध्यपूर्ण पण निवडणुकांचे अंदाज बरोबर सांगणाऱ्या अनुभवी टीमला जाते."

महत्त्वाच्या इतर बातम्या :

भाजपचा पारंपारिक मतदारसंघ काँग्रेसनं हिसकावला; कसबा पोटनिवडणुकीत रवींद्र धंगेकर यांचा ऐतिहासिक विजय