सातारा : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेल्या वक्तव्यावर भाष्य केलं आहे. सिंचनाच्या प्रकरणात 70 हजार कोटींचा घोटाळा हा शब्द मी वापरला नव्हता,माझा नाहक बळी घेतला, असं पृथ्वीराज चव्हाण म्हणाले. राज्य सहकारी बँक आणि  सिंचन प्रकरणात घेतलेले निर्णय राज्याच्या हिताचे होते, त्याची मला शिक्षा भोगावी लागली, असं देखील पृथ्वीराज चव्हाण म्हणाले. ते मुंबई तक सोबत बोलत होते.   


पृथ्वीराज चव्हाण काय म्हणाले?


सिंचन घोटाळा काही अजित पवारांची पाठ सोडत नाही. थोडं यामध्ये स्पष्टीकरण देणं गरजेचं आहे. सिंचनाची श्वेतपत्रिका काढण्याचा आदेश सिंचन खात्याला दिला होता, माझ्या कार्यकाळात मी 70 हजारांचा घोटाळा शब्द वापरला नव्हता. श्वेतपत्रिका म्हणजे चौकशी नाही, असं पृथ्वीराज चव्हाण म्हणाले. 


अजित पवारांच्या 2010-11 च्या आर्थिक पाहणी अहवालात  70 हजार कोटी रुपये  गेल्या 10 वर्षांच्या खर्च झाले. सिंचनाची टक्केवारी 18.0 वरुन 18.1 झाली होती. हे अजित पवारांच्या नियोजन मंडळाच्या अहवालात नमूद केलं होतं. मी नव्यानं मुख्यमंत्री म्हणून आलो होतो, त्यावेळी मला धक्का बसला. मी सिंचन खात्याला सांगितलं हे बरोबर आहे का, तुम्ही 70 हजार कोटी खर्च केले, जे अजित पवारांच्या अहवालात होतं. सिंचनाच्या टक्केवारी फार वाढ झालेली नाही. काय वस्तूस्थिती आहे, वस्तूस्थिती अहवाल सादर करा हे मी सिंचन खात्याला सांगितलं होतं.पुन्हा चुका होऊ नये हा त्यामागील उद्देश होता, असं पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलं.


नाहक माझा बळी घेतला, माझं सरकार पाडलं : पृथ्वीराज चव्हाण


पुन्हा मग त्याची चौकशी झाली, विधिमंडळात चर्चा झाली. या प्रकरणाची विदर्भ सिंचन महामंडळाच्या घोटाळ्याची खुली चौकशी व्हावी असा अहवाल एक खालून आला, तो अहवाल गृहमंत्र्यांना सादर करण्यात आला, अँटी करप्शनकडून चौकशी करण्याचे आदेश द्या असं त्यात म्हटलं होतं. मला नंतर कळलं की गृहमंत्र्यांनी आपल्या स्तरावर ती मान्यता दिली ज्याचा उल्लेख अजित पवार यांनी केला आहे, असं पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलं. 


ती फाईल माझ्याकडे आली नाही, त्यावर माझी कुठलिही सही नाही. 70 हजार कोटींच्या सिंचन प्रकरणात मी चौकशी लावली नव्हती.नाहक माझा बळी घेतला, 2014 ला माझं सरकार पाडलं आणि भाजपच्या राजवटीची मुहूर्तमेढ केली. ही वस्तूस्थिती आहे, मी अजूनही ती फाईल बघितली नाही. ती फाईल गृहमंत्र्यांच्या स्तरावरुन मान्यता मिळून खाली गेली.गृहमंत्र्यांनी कुणाला विचारला का हे माहिती नाही ते आपण त्यांना विचारु शकत नाही, असं पृथ्वीराज चव्हाण म्हणाले. 


अजित पवार जे बोलले ते खरं आहे. पु्न्हा माझा त्यात काय दोष आहे हे सांगितलं असते तर बरं झालं आहे. राज्य सहकारी बँक आणि सिंचन प्रकरण असेल मी राज्याच्या हिताचे निर्णय घेतले, त्याची शिक्षा मला भोगावी लागेल, त्याची मला काही चिंता नाही, असंही चव्हाण यांनी म्हटलं. 


70 हजार कोटींचा घोटाळा होता की 42 हजार कोटींचा घोटाळा होता? यावर नरेंद्र मोदींनी सगळं तपासून पाहिलेलं आहे, ते भोपाळमध्ये बोलले, त्यामुळं आणखी कुणी शिक्कामोर्तब करण्याची गरज नाही, असंही पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलं.    



इतर बातम्या :


'आर.आर.आबा सत्यवादी माणूस, त्यांनी केसानं गळा कापणे म्हणणे चूकच,' सिंचन घोटाळा उघडकीस आणलेल्या विजय पांढरेंचा दादांवर वार