Prithviraj Chavan on Shivsena : "शिवसेना पक्ष फोडायला राजमान्यता होती. शिवसेना पक्ष फोडणे या साठी सर्व यंत्रणा त्याचा दिमतीला होती.सैनिकी ऑपरेशन सारखं हे ऑपरेशन राबविण्यात आलं.त्यामुळे भ्रष्टाचार मुक्त सरकार देणार म्हणणाऱ्या मोदी यांचे न खाऊंगा न खाने दुंगा हे वाक्य किती हास्यास्पद होतं हे यावरून स्पष्ट होते आहे", असं काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण म्हणाले. ते सातारा येथील पत्रकार परिषदेत बोलत होते. 

Continues below advertisement

 मोदी यांचे न खाऊंगा न खाने दुंगा हे वाक्य किती हास्यास्पद होतं 

शिवसेना पक्ष फोडायला राजमान्यता होती अशी टीका राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे.शिवसेना पक्ष फोडणे या साठी सर्व यंत्रणा त्याचा दिमतीला होती.सैनिकी ऑपरेशन सारखं हे ऑपरेशन राबविण्यात आलं.त्यामुळे भ्रष्टाचार मुक्त सरकार देणार म्हणणाऱ्या मोदी यांचे न खाऊंगा न खाने दुंगा हे वाक्य किती हास्यास्पद होतं हे यावरून स्पष्ट होते आहे, असा टोलाही पृथ्वीराज चव्हाण यांनी लगावला. 

एका बाजूला महिलांना 1500 रुपये देवून खुश करून मते मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू असताना दुसरीकडे जया थोरात यांच्या विषयी भाजपच्या बड्या नेत्यांनी चुकीची वक्तव्य करायची आणि त्याची माफी देखील मागितली जात नाही. त्यावरून भाजपची मानसिकता समजते, अशी टीका देखील पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे.

Continues below advertisement

मी मुख्यमंत्री असताना घोटाळा हा शब्द देखील याबाबत वापरला नव्हता

सिंचन घोटाळ्याबाबत माझ स्पष्टीकरण मी दिलं आहे. माझ्यावर आरोप होता की मी FIR केला,मी चौकशी लावली मात्र हे खरं नाही मी फक्त याची श्वेतपत्रिका काढायला लावली होती. मी मुख्यमंत्री असताना घोटाळा हा शब्द देखील याबाबत वापरला नव्हता. अँटी करप्शन कडून या प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे अशी शिफारस खालून आली. त्याला गृहमंत्र्यांनी मान्यता दिली. मात्र अद्याप ची फाईल मी पाहिलेली नाही. मात्र याची शिक्षा मला भोगावे लागली. माझं सरकार पाडलं गेलं. माझा कोणताही भाग  नसताना मात्र हे सगळं मला भोगावं लागलं. सिंचन घोटाळ्याबाबत भोपाळ मध्ये भाषणात मोदींनी भ्रष्टाचार झाल्याचे स्वतः सांगितले आहे. त्यामुळे यात वेगळा पुरावा द्यायची गरज नाही अस देखील चव्हाण यांनी स्पष्ट केलं आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

Kudal Assembly constituency : अर्जाची छाननी सुरु असताना कुडाळमध्ये ठाकरे अन् शिंदेंचे सैनिक भिडले, निवडणूक निर्णय अधिकारी दालन सोडून बाहेर पडल्या