Pratap Patil Chikhalikar : नांदेडमधील हुकूमशाही मोडून काढायची असेल तर राष्ट्रवादीच्या उमेदवारांना आशीर्वाद द्या असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी केलं आहे. नांदेडमधील मक्तेदारी संपली पाहिजे. वैयक्तिक विरोध करण्याचं काही कारण नाही असे चिखलीकर म्हणाले. ज्या पद्धतीने नांदेड विकासापासून कोसो दूर गेले आहे, ते कुठेतरी रस्त्यावर आलं पाहिजे नांदेडचा विकास झाला पाहिजे असे चिखलीकर म्हणाले. 

Continues below advertisement

पिंपरी चिंचवड आणि  नागपूरच्या  धर्तीवर नांदेडचा विकास करु

पिंपरी चिंचवड आणि  नागपूरच्या  धर्तीवर नांदेडचा विकास करु असे मत  आमदार  प्रताप पाटील चिखलीकर यांनी व्यक्त केले. मागील 70 वर्षापासून नांदेडचा विकास झालेला नाही असे चिखलीकर म्हणाले. नांदेडमध्ये फक्त डासांचा साम्राज्य आहे, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.  देवेंद्र फडणवीस यांचा दुःख दूर करण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत असे चिखलीकर म्हणाले. शिवसेना आणि राष्ट्रवादीची मिळून महापालिकेवर सत्ता येईल असा आमचा अंदाज असल्याचे चिखलीकर म्हणाले. 

नांदेड विकासापासून कोसो दूर गेलं आहे

नांदेड विकासापासून कोसो दूर गेलं आहे. कोणाशी वैयक्तीक विरोध नाही, पण नांदेडचा विकास झाला पाहिजे असे मत चिखलीकर यांनी व्यक्त केले. मतदार शेवटपर्यंत मतदान कोणाला करणार हे कळेल असं वाटत नाही. आम्ही ज्या ज्या प्रभात जातो, तिथं तिथं आणचा उमेदवार विजयी होईल असे चिखलीकर म्हणाले. 

Continues below advertisement

नांदेड–वाघाळा महानगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी

नांदेड–वाघाळा महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीने वेग घेतला आहे. प्रचाराच्या तोफा कालच थंडावल्या आहेत. उद्या मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. या निवडणुकीत केवळ प्रस्थापित राष्ट्रीय पक्षच नव्हे, तर तब्बल 14 प्रादेशिक पक्ष आणि विविध आघाड्यांनीही जोरदार तयारी करत शड्डू ठोकला आहे. एकूण 81 जागांसाठी तब्बल ४९१ उमेदवार निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. प्रचारासाठी उमेदवार सभा, कोपरा सभा, पदयात्रा तसेच वैयक्तिक गाठीभेटींवर विशेष भर देत आहेत. शेवटच्या टप्प्यात मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी सर्वच पक्षांनी प्रचाराची गती वाढवली आहे. भाजप, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांसारख्या मोठ्या पक्षांसोबतच यंदा प्रादेशिक पक्षांनीही जातीय आणि स्थानिक समीकरणे लक्षात घेऊन उमेदवार दिले आहेत. त्यामुळे काही प्रभागांमध्ये तिरंगी, तर काही ठिकाणी चौरंगी लढत होणार आहे. 

महत्वाच्या बातम्या:

शरद पवार गटात गोंधळ! अधिकृत उमेदवार सोडून स्थानिकांचा ठाकरेंच्या उमेदवाराला पाठिंबा, पाठित खंडिर खुपसल्याचा उमेदवाराचा आरोप