एक्स्प्लोर

Parbhani Election Result : परभणी जिल्हा परिषदेची चावी कुणाकडे? 54 ZP आणि 108 पंचायत समित्यांच्या जागांवर कोणाची बाजी? आज निकाल

Parbhani Election Result : परभणी जिल्हा परिषदेच्या 54 गट व पंचायत समितीच्या 108 गणांसाठी शनिवारी शांततेत मतदान पार पडले. मिनी मंत्रालयची सूत्रे नेमकी कोणाच्या हाती जाणार, याचा फैसला आज होणार आहे.

Parbhani Zilla Parishad Election Result 2026 : राज्यभरातील 12 जिल्हा परिषद (Zilla Parishad Election 2026) आणि 125 पंचायत समिती निवडणुकांचा (Panchayat Samiti Election 2026) निकालांचे यायला सुरुवात झाली आहे. एकीकडे राज्यातील घसरत चाललेल्या टक्केवारीबद्दल चिंता व्यक्त केली जात होती, मात्र जिल्हा परिषद निवडणुकांसाठी खेड्यापाड्यातील वयोवृद्धांपासून अगदी तरुणाईपर्यंत सर्वचजणांनी मतदानाला दिलेल्या सकारात्मक प्रतिसादामुळे आश्वासक चित्र पाहायला मिळालंतर दुसरीकडे राज्यात परभणी जिल्ह्यात सर्वाधिक मतदान म्हणजे 74.89 टक्के मतदान झालं आहे. परिणामी वाढलेल्या टक्केवारीने राजकीय समीकरणे ढवळणार अशी शक्यता आहे.

दरम्यान, परभणी जिल्हा परिषदेच्या 54 गट व पंचायत समितीच्या 108 गणांसाठी शनिवारी जिल्ह्यातील 1, 278 मतदान केंद्रांवर शांततेत मतदान पार पडले. जिल्हा प्रशासनाने जाहीर केलेल्या अंतिम आकडेवारीनुसार जिल्ह्यात एकूण 74.89 टक्के मतदान झाले असून, ही टक्केवारी गत निवडणुकीपेक्षा अधिक आहे. त्यामुळे मिनी मंत्रालय म्हणून जिल्हा ओळखल्या परिषदेसाठी मतदारांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याचे स्पष्ट झाले आहे. अशातच, आता सर्वांचे लक्ष आजच्या (९ फेब्रुवारी) मतमोजणी आणि अंतिम निकालाकडे लागले आहे. मिनी मंत्रालयची सूत्रे नेमकी कोणाच्या हाती जाणार, याचा फैसला आजच्या दिवशी होणार आहे. त्यामुळे या निकालाचे सर्व अपडेट्स आपण जाणून घेऊ.

पुढे आलेल्या पहिल्या कलानुसार, परभणीच्या सेलू तालुक्यातील चिकलठाणा गटातून भाजपचे उमेदवार प्रसाद डासाळकर विजयी झाले आहे. तर प्रतिस्पर्धी राष्ट्रवादीचे पुरुषोत्तम पावडे यांचा पराभव झाला असून 1600 मतांनी प्रसाद डासाळकर विजयी झाले आहे. तर शेळगाव गटातून राष्ट्रवादीचे श्रीकांत भोसले विक्रमी मतांनी विजयी झाले आहे. राष्ट्रवादीचे आमदार राजेश विटेकर यांचे बंधू श्रीकांत विटेकरांनी दणदणीत विजयी मिळवला आहे.

परभणी जिल्हा परिषद आघाडी : (Parbhani Zilla Parishad Election Result 2026)
54/54
भाजप : 24
Ncp:- 15
शिवसेना : 05
शिवसेना UBT: 06
काँग्रेस :   03
वंचित :    00
MIM:  00
अपक्ष :01

Parbhani ZP Election Winning Candidates List : परभणीतील विजयी उमेदवारांची यादी

परभणी जिल्हा परिषद 54 जागा आणि विजयी उमेदवार

विजयी उमेदवार            (पक्ष)

 शेळगाव गट- श्रीकांत विटेकर - राष्ट्रवादी (NCP) -

चिकलठाणा गट- प्रसाद डासाळकर - भाजप (BJP ) 

शिंगणापूर- पांडुरंग खिल्लारे - शिवसेना (UBT) 

झरी- दिलीप देशमुख - भाजपचे 

दैठणा- ज्योत्स्ना घाडगे- काँग्रेस 

टाकळी बोबडे जि.प. गट- सुचिता भरोसे - शिवसेना 

पिंगळी जि.प. गट - पूजा सावंत - शिवसेना

पेडगाव जि.प. गट- जितेंद्र देशमुख - काँग्रेस 

टाकळी कुंभकर्ण जि.प. गट- प्रतीक्षा जयस्वाल- शिवसेना UBT 

पोखरणी जि.प. गट- ऐश्वर्या चव्हाण- भाजप

लोहगाव जि.प. गट- अजित वरपुडकर- काँग्रेस

सिंगणापूर जि.प. गट- पांडुरंग खिल्लारे - शिवसेना UBT

सेलू तालुक्यातील पाच गटाचे विजयी उमेदवार

 वालूर- साक्षी साडेगावकर - भाजप 

चिकलठाणा- प्रसाद डासाळकर भाजप 

रवळगाव- डॉ सविता रोडगे - भाजप 

देवुळगाव- प्रीती डख - भाजप 

कुपटा- योगिता मोरे - भाजप 

पाथरी तालुक्यातील 5 गटाचे विजयी उमेदवार

लिंबा- रुक्मिणी भोसले - राष्ट्रवादी

बाभळगाव- वैजताबाई रनेर -राष्ट्रवादी 

कासापुरी- अरुण कोल्हे - राष्ट्रवादी

हदगाव- अजिंक्य नखाते - राष्ट्रवादी

देवनांद्रा- सुमनबाई उगले- शिवसेना

परभणी जिल्हा परिषद निवडणूक, गंगाखेड तालुका

भाजप - 5
राष्ट्रवादी - 1
धनुष्यबाण - 1

कोद्री जिल्हा परिषद सर्कल : पार्वती प्रल्हाद मुंडे - भाजप (विजयी)
गुंजेगाव जिल्हा परिषद गट : करुणाताई बाळासाहेब कुंडगीर- भाजप (विजयी)

मरडसगाव जिल्हा परिषद गट: शिल्पा रामराव पाटील NCP (विजयी)

धारसुर जिल्हा परिषद गट : शोभा सुभाष कदम - भाजप (विजयी)

राणीसावरगाव जिल्हा परिषद गट : सय्यद अल्ताफ भाजप (विजयी)

महातपुरी जिल्हा परिषद सर्कल : कुशावर्ती संभाजी पोले भाजप (विजयी)

इसाद जिल्हा परिषद सर्कल : सावित्री राजेश फड - धनुष्यबाण (विजयी)

मानवत मधील 4 जिल्हा परिषद गटाचे विजयी उमेदवार आणि पक्ष

रामपुरी- गीतांजली जाधव - राष्ट्रवादी 

ताडबोरगाव- वैशाली आंबेगावकर - राष्ट्रवादी

केकरजवळा- कौशल्याबाई शिंदे - शिवसेना

कोल्हा- परमेश्वर निर्वळ- भाजप

जिंतूर तालुक्यातील 10 जिल्हा परिषदेतील विजयी उमेदवार

बोरी : दिपाली चौधरी - राष्ट्रवादी (NCP)

वस्सा : मनीषा पारवे- भाजप

वझर : रोहिणी वटाणे - भाजप

वाघी धानोरा: रोहित चव्हाण - भाजप

म्हाळसा सवांगी : लता वाकळे- भाजप

आडगाव : देवराव कर्हाळे -भाजप

भोगाव राष्ट्रवादी (NCP) कृष्णा देशमुख

चार ठाणा राष्ट्रवादी (NCP) सरूबाई जाधव

वरुड भाजप संगीता थिटे

कौसडी : माणिक हरकळ - राष्ट्रवादी (NCP)

पूर्णा तालुक्यातील 6 जिल्हा परिषद गटांचा निकाल आणि विजयी उमेदवार

एरंडेश्वर : रितेश काळे - शिवसेना UBT

चुडावा : भारत घनदाट - भाजप

गौर: कल्पना देसाई - राष्ट्रवादी (NCP)

कावलगाव : अर्चना ढगे - अपक्ष

ताडकळस : केशरबाई जल्हारे - शिवसेना UBT

वझुर : बेबीताई शिवाजी कुकर - शिवसेना UBT

(टीप - जसे जसे निकाल हाती येतील, तशी यादी अपडेट होत राहील)

Parbhani ZP Election Result 2026: राज्यात सर्वाधिक मतदान परभणी जिल्ह्यात

परभणी जिल्हा परिषद निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पार पडली आहे. परभणी जिल्हा परिषदेच्या 54 गट व पंचायत समितीच्या 108 गणांसाठी शनिवारी जिल्ह्यातील 1,278 मतदान केंद्रांवर शांततेत मतदान पार पडले. जिल्हा प्रशासनाने जाहीर केलेल्या अंतिम आकडेवारीनुसार जिल्ह्यात एकूण 74.89 टक्के मतदान झाले असून, ही टक्केवारी गत निवडणुकीपेक्षा अधिक आहे. त्यामुळे मिनी मंत्रालय म्हणून जिल्हा ओळखल्या परिषदेसाठी मतदारांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याचे स्पष्ट झाले आहे. परभणी जिल्ह्यात एकूण 74.89 % एवढे मतदान झाले आहे.आता प्रशासन मतमोजणीच्या तयारीला लागले आहे.निवडणूक निर्णय अधिकारी व पोलीस अधिकारी यांच्याकडून परभणी तील मतमोजणी केंद्रांचा आढावा घेतला जात आहे.परभणी जिल्ह्यात 9 ठिकाणी मतमोजणी प्रक्रिया पार पडणार आहे. परभणीच्या गंगाखेड उपविभागीय अधिकारी कार्यालयात इथली मतमोजणी पार पडणार आहे त्याआधी प्रशासनाकडून त्याची तयारी केली जात आहे.

Parbhani Election Result : तालुकानिहाय मतदान

परभणी तालुका ८०.२७ टक्क्यांसह अव्वल ठरला. त्याखालोखाल पाथरी ७५.५९, पूर्णा ७५.२५, पालम ७४.७४, मानवत ७४.०७, जिंतूर ७३.५३, सेलू ७३.४२ व गंगाखेड ७२.८६ अशी टक्केवारी नोंदली गेली. सोनपेठ तालुक्यात सर्वात कमी ६८.६० टक्के मतदान झाले.

परभणी:- ८०.२७ %
पूर्णा:- ७५.२५% 
पालम:-७४.७४%
गंगाखेड:-७२.८६ % 
सोनपेठ:-६८.६०%
मानवत:-७४.०७%
पाथरी:-७५.५९%
 जिंतूर:-७३.५३%
 सेलू:-७३.४२ %

संबंधित बातमी:

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Bhandara : शाळेच्या भीतीने 12 वर्षीय विद्यार्थ्याचा ‘हायव्होल्टेज ड्रामा’, स्वतःच्या अपहरणाचा रचला बनाव
शाळेच्या भीतीने 12 वर्षीय विद्यार्थ्याचा ‘हायव्होल्टेज ड्रामा’, स्वतःच्या अपहरणाचा रचला बनाव
युद्धकाळ.. गुंतवणुकीची गुरुकिल्ली ‘तिच्या’ हाती; महिलांसाठी आर्थिक नियोजनाचा प्रवास, स्वावलंबनाकडून सुरक्षिततेकडे
युद्धकाळ.. गुंतवणुकीची गुरुकिल्ली ‘तिच्या’ हाती; महिलांसाठी आर्थिक नियोजनाचा प्रवास, स्वावलंबनाकडून सुरक्षिततेकडे
Video : युद्धाचा भडका, संभाजीनगरमध्ये 5 मोठे उद्योग बंद; लघुउद्योगावरही गॅस तुटवड्याचा परिणाम
Video : युद्धाचा भडका, संभाजीनगरमध्ये 5 मोठे उद्योग बंद; लघुउद्योगावरही गॅस तुटवड्याचा परिणाम
अंबरनाथमध्ये केमिकल कंपनीत आग, मोठ्या स्फोटानंतर धुराचे लोट; कामगार सैरावैरा धावले
अंबरनाथमध्ये केमिकल कंपनीत आग, मोठ्या स्फोटानंतर धुराचे लोट; कामगार सैरावैरा धावले
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Amol Mitkari On V K Singh :व्ही.के. सिंह यांचे अंडरवर्ल्ड कनेक्शन शोधा, 'ठोक दिया' याचा अर्थ काय?
Eknath Shinde Vidhan Parishad : T 20 World Cup मध्ये टीम इंडियाचा विजय, शिंदेंकडून अभिनंदन प्रस्ताव
Vijay Wadettiwar on Budget : महाराष्ट्र कंगाल झालाय,केवळ रस्ते बांधण्यासाठी बजेट आहे का?
Gold Silver Price Drop Iran Israel War : सोनं-चांदीच्या दरात मोठी घसरण;इराण-इस्रायल युद्धाचा परिणाम
Nashik Crime : Dr. Manisha Jejurkar प्रकरणी पतीचे विवाहबाह्य संबंध होते, माहेरच्यांचे गंभीर आरोप

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bhandara : शाळेच्या भीतीने 12 वर्षीय विद्यार्थ्याचा ‘हायव्होल्टेज ड्रामा’, स्वतःच्या अपहरणाचा रचला बनाव
शाळेच्या भीतीने 12 वर्षीय विद्यार्थ्याचा ‘हायव्होल्टेज ड्रामा’, स्वतःच्या अपहरणाचा रचला बनाव
युद्धकाळ.. गुंतवणुकीची गुरुकिल्ली ‘तिच्या’ हाती; महिलांसाठी आर्थिक नियोजनाचा प्रवास, स्वावलंबनाकडून सुरक्षिततेकडे
युद्धकाळ.. गुंतवणुकीची गुरुकिल्ली ‘तिच्या’ हाती; महिलांसाठी आर्थिक नियोजनाचा प्रवास, स्वावलंबनाकडून सुरक्षिततेकडे
Video : युद्धाचा भडका, संभाजीनगरमध्ये 5 मोठे उद्योग बंद; लघुउद्योगावरही गॅस तुटवड्याचा परिणाम
Video : युद्धाचा भडका, संभाजीनगरमध्ये 5 मोठे उद्योग बंद; लघुउद्योगावरही गॅस तुटवड्याचा परिणाम
अंबरनाथमध्ये केमिकल कंपनीत आग, मोठ्या स्फोटानंतर धुराचे लोट; कामगार सैरावैरा धावले
अंबरनाथमध्ये केमिकल कंपनीत आग, मोठ्या स्फोटानंतर धुराचे लोट; कामगार सैरावैरा धावले
Share Market Crash : युद्धामुळे शेअर बाजारात हाहाकार! Sensex  1, 352 अंकांनी गडगडला, शेअर बाजारात गुंतवणूकदारांचे 8.5 लाख कोटी पाण्यात
युद्धामुळे शेअर बाजारात हाहाकार! Sensex  1, 352 अंकांनी गडगडला, शेअर बाजारात गुंतवणूकदारांचे 8.5 लाख कोटी पाण्यात
राज ठाकरेंना वर्धापनदिनी लातूरकरांचे गिफ्ट; पंचायत समितीवर मनसे-भाजपची सत्ता, सभापती बिनविरोध
राज ठाकरेंना वर्धापनदिनी लातूरकरांचे गिफ्ट; पंचायत समितीवर मनसे-भाजपची सत्ता, सभापती बिनविरोध
कथित दिल्ली मद्य धोरण घोटाळा प्रकरणात हायकोर्टाची सर्व 23 आरोपींना नोटीस; सीबीआय तपास अधिकाऱ्याविरुद्ध विभागीय कारवाईलाही स्थगिती, मनी लाँड्रिंग प्रकरणात सुनावणी न करण्याचे आदेश
कथित दिल्ली मद्य धोरण घोटाळा प्रकरणात हायकोर्टाची सर्व 23 आरोपींना नोटीस; सीबीआय तपास अधिकाऱ्याविरुद्ध विभागीय कारवाईलाही स्थगिती, मनी लाँड्रिंग प्रकरणात सुनावणी न करण्याचे आदेश
इस्रायलच्या तेल साठ्यांवरील हल्ल्यानंतर इराणमध्ये तेलमिश्रीत काळाकुट्ट पाऊस, सर्वसामान्यांचे आरोग्य धोक्यात; लेबनॉनमध्ये महिला लेकरा बाळांनी रस्त्यावर रात्र काढली
इस्रायलच्या तेल साठ्यांवरील हल्ल्यानंतर इराणमध्ये तेलमिश्रीत काळाकुट्ट पाऊस, सर्वसामान्यांचे आरोग्य धोक्यात; लेबनॉनमध्ये महिला लेकरा बाळांनी रस्त्यावर रात्र काढली
Embed widget