बीड : परळी नगरपरिषदेत (Parali Municipal Council Election) राष्ट्रवादी काँग्रेस(NCP), शिवसेना (Shivsena) आणि एमआयएम (MIM) असा गट स्थापन करण्यात आला होता. याबाबतची माहिती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी एक्सवर पोस्ट करत दिली होती. या युतीबाबत (MIM Alliance with Shivsena NCP) तिन्ही पक्षांवर विरोधकांनी टीकेची झोड उठविली होती. याटीकेनंतर शिवसेनेने पत्रकार परिषद घेतआपली भूमिका स्पष्ट केलीय. परिणामी, एमआयएमची साथ न सोडल्यास आपण या गटामधून बाहेर पडू, असा इशाराही दिला होता. यानंतर रविवारी एमआयएमच्या नगरसेविका आयेशा मोहसीन शेख यांनी राष्ट्रवादीचे गटनेते वैजनाथ सोळंके यांना पत्र पाठवले असून आपण या गटामधून बाहेर पडत असल्याचे म्हटले आहे. तसेच या पत्राची एक प्रत बीडचे जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांना देखील पाठवण्यात आली आहे. (Parali Municipal Council Election)
MIM Alliance with Shivsena NCP : एमआयएम सारख्या जातीवादी पक्षाला बाहेर काढा किंवा आम्हाला
बीडच्या परळी नगरपरिषदेत गटनेता निवडीवरून शिवसेना शिंदे गट आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीत संघर्ष सुरू झाल्याचेबघायलामिळाला. एमआयएम सारख्या जातीवादी पक्षाला सोबत घेतलं याची किंचितही आम्हाला जाणीव होऊ दिली नाही. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आम्ही सांगू इच्छितो, तुम्हाला शिवसेनेसोबत युती ठेवायची असेल तर एमआयएम सारख्या जातीवादी पक्षाला बाहेर काढा किंवा आम्हाला गटातून बाहेर जाण्याची परवानगी द्या, असा आक्रमक पवित्रा शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख सचिन मुळूक यांनी घेतला.
दरम्यान, जिल्हाधिकाऱ्यांसमोर सह्या केल्या त्यावेळी कोणत्याही पक्षाचा उल्लेख केलेला नाही. एमआयएमला आम्ही जवळ केले नाही. हिंदुत्वाला कुठल्याही प्रकारे तडा जाऊ देणार नाही. एक तर तुमच्या सोबत शिवसेना राहील किंवा एमआयएम आम्ही दोघेही या गटात राहू शकत नाही, अशी स्पष्ट भूमिका शिंदे गटाने घेतली आहे. तर अंबादास दानवे यांचे डोकं चंद्रकांत खैरे यांनी रिकामे केले. अशी टीका देखील मुळुक यांनी यावेळी केली.
परळी नगरपालिकेतील सध्याचं संख्याबळ
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) – 16
भाजप – 7
शिवसेना (शिंदे गट) – 2
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) – 2
काँग्रेस – 1
एमआयएम – 1
अपक्ष – 6
हेही वाचा
