बीड : धनंजय मुंडे यांच्या खोटेपणाचा आपल्याला कंटाळा आला आहे. माझ्या आयुष्यातील ही सर्वात वाईट घटना असून मी या प्रकराणामुळे अस्वस्थ झाले आहे अशा शब्दात परळीच्या भाजप उमेदवार पंकजा मुंडे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केलेल्या आक्षेपार्ह वक्त्व्याबाबत  पंकजा मुंडे यांनी प्रतिक्रया दिली.


पंकजा मुंडे म्हणाल्या, माझ्या जीवनातील सर्वात वाईट प्रचार करणारी  आणि शॉक देणारी ही निवडणूक आहे. या प्रकारानंतर अनेक जणांनी आपली भेट घेतली यावेळी लोकांच्या मनातही मला धनंजय मुंडेंबाबत तिरस्काराची भावना दिसून आली. लोकांसह मी देखील त्यांच्या खोटेपणाचा तिरस्कार करते. प्रत्येक निवडणुकीत वेगळा अनुभव असतो.  लोकांनी देखील याचा बोध निवडणुकीतून घेणं गरजेचे आहे. जग फार वाईट आहे आणि रक्ताची नाती सगळ्यात जास्त घाव घालतात हा बोध मी या निवडणुकीतून घेतला आहे.

पाहा काय म्हणाल्या पंकजा मुंडे



पहिल्यांदा असं वाईट बोलायचं आणि त्यानंतर खोटंही बोलायचं हे चुकीचं आहे. आपल्या भाषणादरम्यान त्यांनी हे वक्तव्य करावं आणि त्यावर त्यांच्या गँगनं टाळ्याही वाजवाव्यात यामुळं फक्त मला नाही तर माझ्या घरच्यांना देखील शॉक बसला. माझा रक्ताचा भाऊ असं बोलल्यामुळे मी अस्वस्थ झाले आहे, असही त्या म्हणाल्या.

मुंडे म्हणाल्या, सध्या घोर कलियुग असून सध्या राजकारण खालच्या थराला गेलं आहे. पत्रकार परिषद म्हणून चार माणसांना बोलवून बाईट द्यायचा याला काय म्हणायचं. सध्या अत्यंत विकृत राजकारण पहायला मिळतंय. हे फार विकृत राजकारण आहे. या राजकरणासाठी इथली पिढी  कधीच क्षमा करणार नाही.