Gokul Election:कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळच्या निवडणुकीसाठी अखेर रणशिंग फुंकण्यात आलं आहे. गोकुळची निवडणूक बिनविरोध होणार अशा चर्चा रंगल्या असतानाच दोन्हीकडून आज पॅनेलची घोषणा करण्यात आल्याने एक प्रकारे गोकुळच्या निवडणुकीसाठी आता खऱ्या अर्थाने धुळा उडणार आहे. आज महायुतीकडून पहिल्यांदा गोकुळसाठी 25 जणांची उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली. राजर्षी शाहू  शेतकरी समविचारी आघाडीकडून सुद्धा 25 जणांच्या उमेदवारीची घोषणा करण्यात आली.   

Continues below advertisement

राधानगरी तालुक्यातील समीकरणे बदलण्याची चिन्हे

दुसरीकडे महायुतीचं पॅनेल घोषित झाल्यानंतर महायुतीला तगडा धक्का बसला आहे. अजित पवार गटातील गोकुळचे माजी संचालक किसन चौगले यांना उमेदवारी नाकारण्यात आल्यानंतर त्यांनी आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वातील राजर्षी शाहू शेतकरी समविचारी आघाडीमध्ये जाहीर प्रवेश केला. त्यानंतर त्यांना उमेदवारी सुद्धा देण्यात आल्याने राधानगरी तालुक्यातील समीकरणे बदलण्याची चिन्हे आहेत. दुसरीकडे पी. एन. पाटील गटाला सुद्धा अवघी एका जागेवर बोळवण करण्यात आल्याने करवीर तालुक्यामध्ये मोठा असंतोष महायुतीमध्ये दिसून येण्याची शक्यता आहे.

सात विद्यमान संचालकांना संधी

कार्यकर्त्यांकडून याबाबतच्या भावना सोशल मीडियामध्ये व्यक्त केल्या जात आहेत. गॅरेजवर बसून पी. एन. पाटील यांना कोणतीही घासाघीस न करता 6 जागा मिळत होत्या, मात्र महायुतीमध्ये असून सुद्धा अवघी 1 जागा वाट्याला आल्याने पी. एन. पाटील गटाची घोर निराशा झाल्याची भावना समर्थकांकडून व्यक्त केली जात आहे. त्यामुळे आता येत्या काही दिवसांमध्ये पी. एन. पाटील गटाची नाराजी महायुतीला भोवणार का? याच्याकडे सुद्धा लक्ष असेल.  दुसरीकडे, राजर्षी शाहू समविचारी आघाडीचे उमेदवार घोषित करताना सतेज पाटील यांनी 7 विद्यमान गोकुळ संचालकांना पुन्हा एकदा संधी दिली आहे, तर तब्बल 18 चेहरे नव्याने रिंगणामध्ये उतरले आहेत. त्यामुळे काटाजोड लढत अपेक्षित आहे. 

Continues below advertisement

 

राजर्षी शाहू शेतकरी समविचारी आघाडी
   
सर्वसाधारण गट
अ.क्र.नांवगांव
1पाटील चुयेकर शशिकांत आनंदरावमु. पो. चुये, ता. करवीर
2चौगले बाबासाहेब श्रीपतीमु. पो. केर्ली, ता. करवीर
3पाटील उदय निवासरावमु. पो. सडोली खालसा, ता. करवीर
4देवकर बाबासाहेब विष्णूमु. पो. गाडेगोंडवाडी, ता. करवीर
5पाटील आबा उर्फ सत्यजित सुरेशमु. पो. कसबा बीड, ता. करवीर
6तायशोटे अभिजित प्रभाकरमु. पो. राधानगरी, ता. राधानगरी
7चौगले किसन बापूसोमु. पो. चाफोडी, ता. राधानगरी
8मोरे रणधीर विजयसिंहमु. पो. सरवडे, ता. राधानगरी
9घोरपडे सचिन दौलतरावमु. पो. वाघापूर, ता. भुदरगड
10जाधव विश्वजीत दिनकररावमु. पो. तिरवडे, ता. भुदरगड
11देसाई राहुल बजरंगमु. पो. गारगोटी, ता. भुदरगड
12पाटील दादासाहेब वसंतरावमु. पो. सातार्डे, ता. पन्हाळा
13पाटील विकास पांडुरंगमु. पो. गोगवे, ता. शाहुवाडी
14बोरगांवे भिमगौंडा कल्लाप्पामु. पो. कोथळी, ता. शिरोळ
15गुरबे विद्याधर बाबूरावमु. पो. नेसरी, ता. गडहिंग्लज
16डोंगरे सुभाष बळवंतमु. पो. जरळी, ता. गडहिंग्लज
17पाटील विशाल गोपाळरावमु. पो. तांबुळवाडी, ता. चंदगड
18पाटील विश्वजीत रणजितसिंहमु. पो. मुरगूड, ता. कागल
19पाटील शहाजी केशवमु. पो. लिंगनूर दुमाला, ता. कागल
20इंगवले विश्वासराव आनंदरावमु. पो. हातकणंगले, ता. हातकणंगले
   
महिला राखीव गट
अ.क्र.नांवगांव
1रेडेकर अंजना केदारीमु. पो. पेढ्रेवाडी, ता. आजरा
2डोंगळे भाग्यश्री धीरजमु. पो. घोटवडे, ता. राधानगरी
   
इतर मागासवर्गीय गट
अ.क्र.नांवगांव
1खोत शशिकांत शामरावमु. पो. कणेरीवाडी, ता. करवीर
   
अनुसुचित जाती-जमाती गट
अ.क्र.नांवगांव
1आवळे राजु जयवंतरावमु. पो. भांडवडे, ता. हातकणंगले
   
भटक्या जाती / विमुक्त जमाती गट
अ.क्र.नांवगांव
1शेळके बयाजी देवूमु. पो. वेसरफ, ता. गगनबावडा

 

 
पंचवार्षिक निवडणूक - २०२६ | छत्रपती शाहू शेतकरी विकास आघाडी
     
अ.क्र.गट प्रवर्ग (Category)अनु क्र.नांव (Name)तालुका (Taluka)
१सर्वसाधारण गट1श्री. राजेश नृसिंगराव पाटीलचंदगड
2श्री. विश्वास नारायण पाटील—आबाजीकरवीर
3श्री. अरूण गणपतराव डोंगळेराधानगरी
4श्री. राहुल पांडूरंग उर्फ पी एन पाटीलकरवीर
5श्री. अजित शंतनू नर्केपन्हाळा
6श्री. संभाजी रंगराव पाटीलकरवीर
7श्री. अजित पांडूरंग पाटीलकरवीर
8श्री. विरेंद्र संजय मंडलिककागल
9श्री. कर्णसिंह संजयसिंह गायकवाडशाहूवाडी
10श्री. अमरसिंह यशवंत पाटीलपन्हाळा
11श्री. युवराज दत्ताजीराव पाटीलकागल
12श्री. मदन बाबुराव देसाईभुदरगड
13श्री. अंबरीषसिंह संजय घाटगेकागल
14श्री. चेतन अरूण नर्केपन्हाळा
15श्री. अशोक काशिनाथ चराटीआजरा
16श्री. रणजीत कृष्णाराव उर्फ के. पी. पाटीलभुदरगड
17श्री. सतीश भिमगोंडा पाटीलगडहिंग्लज
18श्री. रणजीत दिलीप पाटीलशिरोळ
19श्री. दिपक भरमू पाटीलचंदगड
20श्री. प्रतापसिंह शंकरराव पाटीलकरवीर
२अनुसूचित जाती—जमाती1डॉ. श्री सुजित वसंतराव मिणचेकरहातकणंगले
३विमुक्त जाती / भटक्या जमाती / वि.मा.प्रवर्ग1श्री विश्वास शंकर जाधवपन्हाळा
४इतर मागासवर्गीय1श्री नविद हसनसाहेब मुश्रीफकागल
५महिला राखीव1सौ. शौमिका अमल महाडीककरवीर
2सौ. अर्चना आनंदराव उर्फ ए. वाय. पाटीलराधानगरी

इतर महत्वाच्या बातम्या