Ovala-Majiwada Assembly Election 2024 : ओवळा-माजिवडा विधानसभा मतदारसंघात शिवसेनेच्या प्रताप सरनाईकांनी विजय मिळवला आहे. प्रताप सरनाईक सलग चौथ्यांदा विधानसभेवर निवडून आले आहेत. याआधी शिवसेनेकडून प्रताप सरनाईक सलग तीन वर्ष निवडून आले आहेत. आता चौथ्या वेळीही मतदारांनी प्रताप सरनाईकांना कौल दिला आहे. ओवळा-माजिवडा मतदारसंघात म्हणजे ठाण्यातील उच्चभ्रू वस्ती. याच कारणामुळे ओवळा-माजिवडा उच्चभ्रूंचा मतदारसंघ म्हणूनही ओळखली जातो. या मतदारसंघाने सलग चौथ्यांदा आमदार म्हणून प्रताप सरनाईकांची निवड केली आहे. 


ओवळा-माजिवडा विधानसभा मतदारसंघ


गेल्या तीन टर्ममध्ये शिवसेनेने ओवळा-माजिवडामध्ये एकहाती सत्ता काबीज केली होची. सलग तीन वेळा आमदार बनल्याने प्रताप सरनाईकांसाठी यंदाची निवडणूक प्रतिष्ठेची होती. कारण बंडानंतर येथील मतदार प्रताप सरनाईकांचीच साथ देणार की, ठाकरे गट किंवा मनसे इथे यश मिळवणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. ओवळा-माजिवडा विधानसभा मतदारसंघात तीन वेळा आमदार प्रताप सरनाईक यांना गड राखला आहे.


ओवळा-माजिवाजा मतदारसंघाचा 2024 च्या निवडणुकीचा निकाल



  • प्रताप सरनाईक - शिवसेना, विजयी

  • नरेश मणेरा - शिवसेना ठाकरे गट

  • संदीप पाचंगे - मनसे


मतदारसंघ कसा आहे?


हा मतदारसंघ केवळ ठाणे महानगरपालिकेपुरता सीमित नाही. तर मीरा-भाईंदर महानगरपालिकेमध्ये देखील त्याचा काही भाग येतो. ठाण्यातील लोकमान्यनगर,  वर्तकनगर शास्त्रीनगर, शिवाजीनगर अशा बैठ्या चाळीच्या मध्यम आणि गरीब वर्गाच्या विभागापासून ते थेट वाघबीळ, कासारवडवली, माजिवडा, गायमुखपर्यंतचा भाग याच मतदारसंघांमध्ये येतो. तर दुसरीकडे मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या विभागातल्या चेन्ना गाव, घोडबंदर गाव, वर्सोवा, काशिमिरा, गोल्डन नेक्स्ट, नवघर हे विभाग देखील ओवळा माजिवडा याच मतदारसंघात येतात.


मतदारसंघाचा इतिहास 


2009 मतदारसंघांची पुर्नरचना करण्यात आल्यानंतर ओवळा-माजिवजा मतदारसंघ बनवण्यात आला. 2009 च्या आधी ठाणे आणि बेलापूर हे विधानसभा मतदारसंघ खूप मोठे असल्याने यांचं विभाजन करण्यात आले. मतदारसंघाची पुनर्रचना झाल्यानंतर ठाणे शहर मतदारसंघातील काही भाग आणि बेलापूर मतदारसंघातील मोठा भाग जोडून ओवळा-माजिवडा मतदारसंघ नावारुपाला आला. तेव्हापासून म्हणजेच 2009 पासून प्रताप सरनाईक यांना शिवसेनेकडून ओवळा-माजिवडा या मतदारसंघासाठी तिकीट मिळत असून त्यांनी गड कायम राखला आहे.


मतदारसंघातील सद्यस्थिती


प्रताप सरनाईक यांनी 2009 पासून ओवळा माजिवडा विधानसभा मतदारसंघात विजयाचा गड कायम राखला आहे. 2014 मध्ये शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस वेगवेगळ्या तिकिटांवर निवडणूक लढवत होते. त्यावेळी देखील प्रताप सरनाईक यांनी या मतदारसंघात एकहाती सत्ता कायम राखली. भाजपच्या संजय पांडे यांनी प्रताप सरनाईक यांना चुरशीची लढत दिल्यानंतरही प्रताप सरनाईक 2014 मध्ये मोठ्या मताधिक्क्याने निवडून आले.


2019 निकाल



  • प्रताप सरनाईक - शिवसेना (117593 मते)

  • भीमसेन चव्हाण - काँग्रेस (33585 मते)

  • संदीप पाचंगे - मनसे (21132 मते)


2014 चा निकाल



  • प्रताप सरनाईक - शिवसेना (68571 मते)

  • संजय पांडे - भाजप (57665 मते)

  • हणमंत जगदाळे - राष्ट्रवादी (20686 मते)